Current Affairs of 12 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 एप्रिल 2016)

भारत आणि मालदीवमध्ये सहा करार :

  • मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांनी (दि.11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.
  • भारत आणि मालदीव यांच्यामध्ये सहा करारही या वेळी करण्यात आले.
  • गयूम हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
  • संरक्षण सहकार्यासह करांची पुनरुक्ती टाळणे, करांबाबत माहिती देणे, अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले.
  • तसेच यानंतर झालेल्या दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत भारत आणि मालदीवमध्ये सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याची आत्यंतिक आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट केले.
  • पंतप्रधान मोदी आणि गयूम यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.
  • तसेच त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
  • करारातील ठळक मुद्दे :-

  • संरक्षण मंत्रालयाच्या पातळीवरून सहकार्य वाढविणार
  • भारतातर्फे मालदीवमध्ये पोलिस अकादमी आणि संरक्षण मंत्रालयासाठी इमारत बांधली जाणार
  • आरोग्य आणि पर्यटन सेवा वाढविण्यासाठी प्रयत्न
  • आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे एकाच वस्तूवर दोन वेळा बसणारा कर टाळणार
  • मालदीवमधील प्राचीन मशिदी आणि इतर ऐतिहासिक वास्तूंचे भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे जतन
  • दक्षिण आशियाई उपग्रहासाठी एकमेकांना सहकार्य
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 एप्रिल 2016)

आर अश्विन ग्लोबलचा ब्रँड अँबॅसेडर :

  • आरोग्य क्षेत्रातील अत्पादनांमध्ये आघाडीवर असणाऱ्या मन्ना फुड्सने ‘ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर’ म्हणून अश्विनची निवड केली आहे.
  • गोलंदाजीत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याने आर. अश्विनने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे.
  • अश्विन हा मुन्ना फूड्स ब्रँडचा पहिलावहिला बँड अँबॅसेडर असल्याचे कंपनीने सांगितले.
  • राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या आपल्या ब्रँडिंगसाठी लोकप्रिय सेलिब्रिटींना करारबद्ध करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.
  • मुन्ना फूड्सने पुदुचेरीसह दक्षिण भारतात सक्षमपणे आपले पाय रोवले आहेत.
  • मागील वर्षी त्यांनी ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही विस्तार केला.
  • तसेच, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान, सौदी अरेबियासह संपूर्ण मध्य-पूर्वेत ‘मन्ना‘ची उत्पादने निर्यात केली जातात.
  • सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत जिथे भारतीय लोकसंख्या जास्त आहे अशा देशांमध्ये ‘मन्ना‘चा चांगला व्यवसाय आहे.
  • मूळचा चेन्नईचा असलेला आर. अश्विन सर्वांत वेगाने बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे.
  • देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडूकडून खेळतो, तर आयपीएल स्पर्धेत तो ‘रायझिंग पुणे सुपरजायंट्स‘मधून खेळत आहे.

विश्वनाथन आनंदला ‘हदयनाथ जीवन गौरव’ पुरस्कार :

  • हदयेश आर्टस या संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा हदयनाथ जीवन गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला दिला जाणार आहे.
  • राज्यपालचे विद्यासागर राव यांच्या हस्ते विश्वनाथन आनंदला दिनांक 12 एप्रिल 2016 रोजी सांयकाळी 7 वाजता दिनानाथ मंगेशकर नाटयगृह, विलेपार्ले (प), मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • कार्यक्रमाला शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पं हदयनाथ मंगेशकर, रघुनंदन गोखले, आमिर खान, हदयेश आर्टसचे अध्यक्ष  अविनाश प्रभावळकर व इतर निमंत्रित उपस्थित राहतील.
  • भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन ए आर रेहमान यांना यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राज ठाकरे दहा दिवसांच्या दौऱ्यावर :

  • दुष्काळी स्थितीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहेत.
  • तसेच या दौऱ्यात ते दुष्काळी भागाची पाहणी करणारी आहेत.
  • ते मराठवाड्यातील लातूर, बीड. उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद जिल्ह्याला भेट देणार आहेत.
  • 19 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान त्यांचा दुष्काळ दौरा आयोजित करण्यात आला आहे.
  • 10 दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यात राज ठाकरे रोजगार हमी योजनेच्या कामास भेट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियास तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांना भेटी देणार आहेत.
  • शेतकरी, शेतमजूर यांच्याशी संवाद साधून ग्रामीण भागातील समस्या ते जाणून घेणार आहेत.

आता खासगी मेडिकल कॉलेजेसना प्रवेश परीक्षा द्यावी लागणार :

  • मेडिकलच्या अॅडमिशनच्या प्रवेशासाठी असलेली परीक्षा किंवा नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) पुन्हा सुरू होण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
  • तीन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सदर प्रवेश परीक्षेवर बंदी घालण्यात आली होती.
  • मात्र, या निर्णयाचा पुनर्विचार करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली आहे आणि एकप्रकारे एमबीबीएस, बीडीएस व एमडी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत दिले आहेत.
  • 2012 मध्ये मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने NEET सुरू केली होती, परंतु खासगी महाविद्यालयांनी याविरोधात याचिका दाखल केली आणि कोर्टाकडून ही परीक्षा त्यांच्यासाठी अनिवार्य नसल्याचा निकाल लागला होता.
  • मात्र, मेडिकल काऊन्सिलने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी याचिका केली होती.
  • सुप्रीम कोर्टाने जुना आदेश मागे घेत या प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्याचे मान्य केले आणि NEET ला संजीवनी दिल्याची चर्चा आहे.
  • देशभरात 600 वैद्यकीय महाविद्यालये असून ती सगळी यामुळे प्रवेश परीक्षेमध्ये येणार आहेत.
  • वैद्यकीय शिक्षण नियंत्रित करण्याचे अधिकार मेडिकल काऊन्सिलला नसल्याचा सुप्रीम कोर्टाचे जुना आदेश असून आता तो आदेश मागे घेतल्याने एकप्रकारे प्रवेश परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाघांच्या जागतिक आकडेवारीत वाढ :

  • जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढली आहे.
  • रशियापासून ते व्हिएतनामच्या जंगलामध्ये ही व्याघ्रगणना करण्यात आली असून वाघांची संख्या 3890 वर पोहोचली आहे.
  • संवर्धन गट आणि प्रत्येक देशाच्या सरकारने व्याघ्रगणनेत सहभाग घेतला होता आणि त्याच आधारे ही आकडेवारी समोर आल्याची माहिती वन्यजीन संवर्धन गटाने दिली आहे.
  • 2010 मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या 3200 होती.
  • महत्वाची गोष्ट म्हणजे वाघांची संख्या वाढण्यामध्ये भारताचं खूप मोठं योगदान असून अर्ध्यापेक्षा जास्त वाघ भारतामध्येच आहे.
  • भारतामधील जंगलांमध्ये एकूण 2226 वाघ आहेत.
  • 19 व्या शतका जगभरातील जंगलात एकूण एक लाख वाघ होते.
  • दिल्लीमध्ये 13 देशातील प्रतिनिधींची (दि.12) बैठक होणार आहे त्याअगोदरच ही जागतिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

दुबईत होणार सर्वात उंच इमारतीची निर्मिती :

  • सुप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा उंच इमारतीची निर्मिती करण्याची तयारी दुबईमध्ये सुरू आहे.
  • बुर्ज खलिफा इमारत जगातील सध्याची सर्वात उंच इमारत आहे.
  • मात्र, दुबई क्रिक हार्बर परिसरातील एका नवीन टॉवरचा सहा वर्ग किलोमीटरचा मास्टर डेव्हलपमेंट प्लॅन हा 828 मीटर उंच असलेल्या बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा काहीसा उंच असल्याची माहिती विकासक एम्मारने दिली आहे.
  • इमारतीच्या उंचीबाबत इतक्यात काही सांगणार नसल्याचे एम्मार प्रॉपर्टीजचे संचालक मोहम्मद अलाबर म्हणाले.
  • इमारतीच्या उद्घाटनावेळी तिच्या उंचीबाबतची माहिती जाहीर करण्यात येईल.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 एप्रिल 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago