Current Affairs of 12 April 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 एप्रिल 2017)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय योगदानासाठी विशेष पुरस्कार :
- शरद पवार यांच्यानंतरचे महाराष्ट्रातील दुसरे तरुण मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- तसेच गेल्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्षमतेने राज्याच्या नेतृत्व करतानाच वेळोवेळी आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाचेही प्रदर्शन घडवले आहे.
Must Read (नक्की वाचा):
जागतिक क्रमवारीत साक्षी पाचव्या क्रमांकावर :
- रिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियातील अव्वल क्रमांकाचा मल्ल संदीप तोमर यांनी जागतिक कुस्ती क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळवले आहे.
- साक्षी पाचव्या, तर संदीप सातव्या स्थानी आहे. साक्षीने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत 58 किलो गटात ब्रॉंझपदक जिंकले होते.
- संदीपला पुरुष विभागात 57 किलो गटात सातवे स्थान आहे. 13 महिलांसह एकूण 24 आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाइल मल्ल पहिल्या दहा खेळाडूंत आहेत.
- ऑलिंपिक आणि युरोपियन विजेता जॉर्जियाचा व्लादिमीर खिंचेगाशेविली (58 किलो), रशियाचा विश्वविजेता मगोमेद कुर्बानिलेव (70 किलो) आणि कॅनडाची ऑलिंपिक विजेती एरिका वेब (महिला 57 किलो) आपापल्या गटात अव्वल स्थानी आहेत.
प्रतिभा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान :
- देशाचे राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
- प्रतिभाताई पाटील यांनी 2007 ते 2012 या काळात देशाच्या राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता.
- आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या ‘लोकमत’च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे.
- युपीएएल प्रस्तुत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
- तसेच या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना गौरवण्यात आले.
मानवी मोहिमेसाठी भारताचे एक पाऊल पुढे :
- गेल्या दहा वर्षांहूनही अधिक काळ ज्या स्वप्नवत अशा मानवी अवकाश मोहिमेची स्वप्ने एकविसाव्या शतकातील महत्त्वाकांक्षी भारताला पडत आहेत, त्या मानवी अवकाश मोहिमेच्या दृष्टीने आपण नुकतेच एक पाऊल पुढे टाकले आहे.
- प्रत्यक्षात जरी येत्या काही वर्षांनी ‘इंडियन ह्युमन स्पेसफ्लाईट प्रोग्रॅम’ कार्यान्वित होणार असला, तरी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या किचकट तंत्रज्ञानापैकी एक अशा ‘पॅड ॲबॉर्ट टेस्ट’ या चाचणीचे पहिल्या टप्प्यावरील संशोधन नुकतेच यशस्वीपणे सुरू झाले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) सूत्रांनी या कामगिरीविषयी माहिती दिली.
- रशियाचे अंतराळवीर आणि अंतराळात प्रवास करणारे जगातील पहिले मानव ठरलेले युरी गागारीन यांनी पहिल्यांदा आपली अंतराळ सफर केली ती 1961 मध्ये. 56 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ही सफर यशस्वीपणे पार पडली होती. त्यासाठी 12 एप्रिल हा दिवस ‘इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट’ म्हणून राष्ट्रसंघातर्फे साजरा केला जातो.
बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नागपुरातून अमेरिकेला :
- नागपुरात तयार करण्यात आलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अमेरिकेच्या ‘ब्रॅन्डीज युनिव्हर्सिटीच्या गोल्डफर्ब लायब्ररी’त बसविण्यात येणार आहे.
- नागपूरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी हा पुतळा तयार केला आहे. 8 एप्रिल रोजी तो विमानाने अमेरिकेत पोहोचला असून 29 एप्रिल रोजी अनावरण होणार आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती 14 एप्रिल रोजी भारतासह जगात साजरी होत आहे. त्यानिमित्ताने हा पुतळा बसविण्यात येणार आहे.
- पुतळा हुबेहूब बाबासाहेबांसारखा असावा, यासाठी एका चमूने बऱ्याच मूर्तिकारांशी संपर्क साधला होता. नागपुरातील प्रसिद्ध शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले.
- तसेच दोन फूट उंच व ब्राँझचा असलेला हा पुतळा तयार करण्यास मूर्ती यांना दीड महिन्याचा कालावधी लागला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा