चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2016)
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी मंजुळा चेल्लूर :
- मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.जे. वाघेला सेवानिवृत्त झाल्यावर लगेच या पदावर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली.
- मुंबई हायकोर्टाच्या 150 वर्षांच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असणार आहेत.
- विधी व न्याय मंत्रालयाने 10 ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून कोलकता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आल्याचे जाहीर केले.
- न्या. चेल्लुर या मुंबई उच्च न्यायालयाच्या 41 व्या मुख्य न्यायाधीश असतील.
- तसेच त्यांच्यापूर्वी 1994 मध्ये निवृत्त न्या. सुजाता मनोहर यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविले होते.
राज्यसभेत मातृत्व रजा विधेयक मंजूर :
- प्रस्तुतीनंतर महिला कर्मचाऱ्यांना 26 आठवडे (6 महिने) पगारी रजा देण्याची महत्त्वाची तरतूद असलेले मातृत्व रजा दुरुस्ती विधेयक 2016 राज्यसभेने (दि.11)मंजूर केले.
- तसेच हे विधेयक तांत्रिकदृष्ट्या श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत असले तरी त्याचा थेट संबंध महिला व बालविकास मंत्रालयाशी असल्याने विरोधकांच्या हल्ल्याने प्रचंड भांबावलेले श्रममंत्री बंडारू लक्ष्मण यांच्या मदतीला मंत्री मेनका गांधी यांनी साथ दिली.
- भारतीय लेबर कॉन्फरन्सने सध्याच्या 12 ऐवजी 24 आठवड्यांच्या मातृत्व रजेची शिफारस केली होती. केंद्राने त्यात आणखी दोन आठवड्यांची वाढ केली आहे.
- किमान 50 कामगार असलेल्या प्रत्येक कंपनीला या कायद्याची अंमलबजावणी व पाळणाघराची व्यवस्था करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
- रजेशिवाय संबंधित मातांना दरमहा साडेतीन हजार रुपये बोनस देण्याचीही तरतूद यात आहे.
सारस्वत बँकेचे नवे अध्यक्ष गौतम ठाकूर :
- सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदी गौतम एकनाथ ठाकूर यांची तर उपाध्यक्षपदी शशिकांत साखळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
- बँकेच्या सर्वसाधारण बैठकीत संचालकांची निवड झाल्यानंतर मंडळाच्या पहिल्या बैठकीत गौतम ठाकूर व शशिकांत साखळकर यांची निवड झाली.
- संचालक मंडळावर मधु मंगेश कर्णिक, एस.एन. सवाईकर, पी.एन. जोशी, किशोर रांगणेकर, अमित पंडित, हेमंत राठी, डॉ. अनुराधा सामंत, सुनील सौदागर, एन. जी. पै, समीर शिरोडकर, अनिल आंबेसकर, सतीश लोटलीकर, किरण उमरुटकर, सुनील भांडारे यांची निवड झाली.
देशभरात लागू होणार 57 हजार पाणी योजना :
- विविध राज्यांत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी 57,400 योजना सुरू करण्यात येणार आहेत.
- तसेच या योजनांसाठी 2015 आणि 2016 मध्ये 4,300 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती सरकारतर्फे लोकसभेत देण्यात आली.
- पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, की पिण्याच्या पाण्यासाठी राज्यांना मोठा निधी देण्यात आला आहे.
- या योजना पूर्ण झाल्यास देशातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. जम्मू-काश्मिरात 1838 योजना असल्याचेही सांगाण्यात आले.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद कालवश :
- पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांच निधन झाल्याचं वृत्त पाकिस्तानमधल्या डॉन या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
- हनीफ मोहम्मद हे 81 वर्षाचे होते.
- हनीफ मोहम्मद यांनी 1952-53 ते 1969-70 या कालावधीत एकूण 55 कसोटी सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना 12 शतके झळकवली होती.
- हनीफ मोहम्मद यांनी 1967 साली ब्रिजटाऊनमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध करियरमधील सर्वोत्तम 337 धावांची खेळी केली.
- क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळीमध्ये हनीफ यांच्या या खेळींचा समावेश केला जातो.
दिनविशेष :
- 1833 : शिकागो शहराची स्थापना.
- 1919 : विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1972 : ग्यानेंद्र पांडे, भारतीय क्रिकेटर यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा