Current Affairs of 12 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 फेब्रुवारी 2016)

आता वर्षातून दोनदा मतदार नोंदणी :

  • युवा मतदारांना 18 वर्षांचे वय पूर्ण होताच वर्षातून दोनदा मतदारनोंदणीची संधी मिळणार आहे.
  • कायदा मंत्रालयाने त्यासाठी विधेयकाचा मसुदा तयार केला आहे.
  • सध्या निवडणूक होत असलेल्या विशिष्ट वर्षाच्या 1 जानेवारीला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाच मतदार नोंदणी करता येते.
  • तसेच यापुढे 1 जुलै रोजी वयाची पूर्तता करणाऱ्यांनाही संधी दिली जाईल.
  • निवडणूक आयोगाने ठेवलेल्या या प्रस्तावाला सरकारनेही सहमती दर्शविली आहे.
  • 1 जानेवारी रोजी मतदारयाद्यांची पुनर्रचना केली जात असल्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 च्या कलम 14 (ब) नुसार हीच तारीख योग्य मानण्यात आली होती.

भारतात ‘फ्री बेसिक्स’ कार्यक्रम बंद होणार :

  • प्रमुख सोशल नेटवर्क कंपनी फेसबुकने भारतातील आपला वादग्रस्त ‘फ्री बेसिक्स’ कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ट्रायने सेवा देणाऱ्या कंपन्यांना कन्टेन्टस्वर आधारित इंटरनेटसाठी वेगवेगळे दर आकारण्यास मनाई केल्यानंतर फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
  • फेसबुकच्या या निर्णयामुळे भारतात नेट न्यूट्रॅलिटीला प्रोत्साहन मिळणार आहे.
  • दूरसंचार ऑपरेटर्सच्या भागीदारीने लोकांना बेसिक इंटरनेट सेवा पुरविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या ‘फ्री बेसिक्स’ कार्यक्रमामुळे फेसबुकवर चौफेर टीका केली जात होती.
  • ‘फ्री बेसिक्स’मुळे काही निवडक वेबसाईटस्च बघण्याची अनुमती देण्यात आली होती.
  • इंटरनेट सर्वांसाठी खुले असावे, असा युक्तिवाद करण्यात आला होता.

चीनमध्ये शुद्ध हवेची विक्री :

  • पराकोटीच्या प्रदूषणामुळे बीजिंगसह अनेक मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना मोकळ्या हवेत श्वास घेणेही दुरापास्त झालेल्या चीनमध्ये सातासमुद्रापलिकडची बाटलीबंद शुद्ध हवा विकण्याचा धंदा सध्या तेजीत आला आहे.
  • चिनी नववर्षाच्या दीर्घकालीन सुट्या आणि त्यानिमित्त होणाऱ्या बाजारहाटाचे औचित्य साधून अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर फिरून अशी डबाबंद किंवा बाटलीबंद हवा विकणारे विक्रेते दिसत आहेत.
  • इंग्लंड व कॅनडा यासारख्या देशांमधील शुद्ध हवा भरलेली एक बाटली येथे चक्क 115 ते 500 डॉलरना म्हणजे एक हजार ते 33 हजार रुपयांना विकली जात आहे.

लान्सनायक हनुमंतप्पांचे निधन :

  • सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे 45 तापमानात बर्फाखाली गाडले गेलेले लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांची गत दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर (दि.11) संपली, सकाळी 11.45 वाजता या लढवय्या जवानाने अखेरचा श्वास घेतला.
  • 3 फेबु्रवारीला 19,600 फूट उंचीवरील सियाचीनमध्ये हिमकडे कोसळल्यामुळे ‘19 मद्रास बटालियन’चे 10 जवान बर्फाखाली गाडले गेले होते.
  • सियाचीनच्या बर्फाच्छादीत भागात बेपत्ता जवानांचा शोध घेणाऱ्या पथकाने बर्फ कापून चालविलेल्या शोधमोहिमेदरम्यान (दि.8) रात्री उशिरा हनुमंतअप्पा यांना जिवंत बाहेर काढण्यात आले होते.
  • तसेच त्यानंतर लगेच त्यांना खास एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
  • कर्नाटकच्या धारवाडच्या बेटादूर गावात राहणारे हनुमंतअप्पा 13 वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते.
  • लष्करातील आपल्या एकूण 13 वर्षांच्या सेवेपैकी सलग 10 वर्षे त्यांनी अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात कर्तव्य बजावले.
  • जोखमीच्या मोहिमांसाठी सतत सज्ज असलेला आणि उच्च ध्येयाने भारावलेला जवान अशी हनुमंतअप्पांची ओळख होती.

जगातील सर्वांत अचूक घड्याळ :

  • जर्मनीमधील तज्ज्ञांनी जगातील आतापर्यंतचे सर्वांत अचूक घड्याळ तयार केले आहे.
  • आतापर्यंत केवळ संकल्पनेतच असलेली अचूक वेळ या संशोधकांनी तयार केलेल्या नव्या अणुघड्याळाने (ऍटॉमिक क्‍लॉक) प्रत्यक्ष साधली आहे.
  • जर्मनी येथील ‘पीटीबी’ या संस्थेतील भौतिकशास्त्रज्ञांनी या ‘ऑप्टिकल सिंगल आयन’ घड्याळाची निर्मिती केली आहे.
  • हाय फ्रिक्वेन्सी ट्रॅपमध्ये भारित कणांच्या मदतीने असे अचूक घड्याळ तयार करता येईल, ही कल्पना 1981 मध्ये हान्स डेमेल्ट या संशोधकाने मांडली होती.
  • तसेच या संशोधकाला नंतर नोबेल पारितोषिकही मिळाले.
  • ‘पीटीबी’च्या संशोधकांनी एका भारित कणाचा वापर करून हे घड्याळ तयार करण्यात यश मिळविले आहे.

भव्य ‘टायटॅनिक’ पुन्हा समुद्रावर स्वार होणार :

  • जगभरात औत्सुक्‍याचा विषय ठरलेले मूळचे ‘टायटॅनिक‘ जहाज 106 वर्षांपूर्वीच बुडाले.
  • तसे त्याची कथा मांडणारा ‘टायटॅनिक’ या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर विक्रम रचले.
  • मूळ जहाज बुडाले असले तरी त्याची प्रतिकृती दोन वर्षांत तयार होणार आहे.
  • ‘टायटॅनिक’ या अभूतपूर्व जहाजाची प्रतिकृती रॉयल मरीन सर्व्हिसेस ‘टायटॅनिक-2’ या नावाने 2018 मध्ये प्रत्यक्षात येणार असून, हे जहाज सेवेतही दाखल करण्यात येणार आहे.
  • ‘टायटॅनिक’ उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले तेव्हा दीड हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.
  • ‘टायटॅनिक’च्या सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेऊन दोन वर्षांत हे परिपूर्ण जहाज बनविण्यात येणार आहे.
  • मूळच्या जहाजापेक्षा ही प्रतिकृती चार मीटरने अधिक रुंद करण्यात येणार आहे.
  • ‘टायटॅनिक-2’ या जहाजाची कल्पना ऑस्ट्रेलियन उद्योजक क्‍लाईव्ह पामर यांच्या ब्लू स्टार कंपनीने मांडली आहे.

खासगी भूसंपादनावर टीडीआर दुप्पट :

  • शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या खासगी भूसंपादनावर टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
  • भूसंपादन कायद्यात जमिनीचा मोबदला बाजार दरापेक्षा दुपटीने मिळू लागल्यानंतर टीडीआर घ्यायला कोणी समोर येत नसल्याचा अनुभव आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तसेच या निर्णयामुळे गृहबांधणी क्षेत्राला चालना मिळणार आहे.
  • राज्य शासन वा स्थानिक स्वराज्य संस्था वा प्राधिकरणाला सार्वजनिक उपयोगाची इमारत जसे शाळा, आरोग्य केंद्र, वाचनालय आदी एखाद्याने बांधून दिले तर त्याला त्या मोबदल्यात टीडीआर देण्याची तरतूदही नवीन धोरणात करण्यात आली आहे.
  • टीडीआर म्हणजे
  • तुमची जमीन संपादित केल्यानंतर त्याचा पैशांच्या स्वरूपात मोबदला न देता चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास त्याला ‘विकास हक्क हस्तांतरण’ (टीडीआर) असे म्हणतात.
  • मिळालेला एफएसआय तुम्हाला त्याच शहरात अन्यत्र वापरून जादाचे बांधकाम नियमानुसार करता येते. अतिरिक्त टीडीआर मिळाल्याने बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल, घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता असते.

गुरुत्वीय लहरींचा शोध लागला :

  • आईनस्टाईन यांचे भाकित खरे ठरले, 100 वर्षानंतर मिळाला थेट पुरावा.
  • शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी 100 वर्षांपूर्वी भाकीत केलेल्या अवकाशकालातील (स्पेसटाईम) रचनेमधील गुरुत्वीय लहरी (गॅ्रव्हिटेशनल वेव्हज्) शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या आहेत.
  • याची घोषणा (दि.11) होताच खगोलशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये अत्यानंद व्यक्त झाला.
  • विश्वामध्ये प्रचंड टक्कर होऊन निर्माण झालेल्या या गुरुत्वीय लहरींनी खगोलशास्त्रज्ञांमध्ये एकदम उत्साह निर्माण केला.
  • तसेच या लहरींमुळे अंतराळाकडे बघण्यासाठी नवी दारे उघडी होणार आहेत.

दिनविशेष :

  • 1809 – चार्लस रॉबर्ट अर्वीन यांचा जन्म.
  • 1928 – सरदार वल्लभाई पटेल यांनी बार्डोलिच्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago