चालू घडामोडी (12 जुलै 2016)
भारत-केनियात संरक्षण सहकार्य करार :
- भारत आणि केनियाने परस्परांमधील संबंधांना चालना देताना विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासंबंधीच्या सात करारांवर (दि.11) स्वाक्षरी केल्या.
- तसेच यामध्ये संरक्षण आणि सुरक्षेसह दुहेरी कर आकारणी टाळण्याच्या मुद्यांचा समावेश आहे.
- केनियाचे अध्यक्ष उहुरू केन्याता यांच्याशी चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लघू आणि मध्यम संस्था आणि कापड कारखान्यांच्या विकासासाठी केनियाला 44.95 दशलक्ष डॉलरची कर्जसवलत जाहीर केली.
- दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी भारत केनियामध्ये एक कॅन्सर रुग्णालयही उभारणार आहे.
- बहुमुखी विकास सहकार्य हा आमच्या द्विपक्षीय संबंधाचा मुख्य आधारस्तंभ आहे, असे मोदी यांनी केन्याता यांच्यासह आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
- दोन्ही देश, प्रदेश आणि संपूर्ण जगासमोर दहशतवाद आणि कट्टरता हे एकसारखेच आव्हान आहे, यावर आमची सहमती झाली. आम्ही सायबर सुरक्षा, उत्तेजकांचा विळखा आणि मानवी तस्करीचा समावेश असलेली आमची सुरक्षा भागीदारी दृढ करण्यावर सहमती दर्शविली आहे.
- संरक्षण सहकार्य करारांतर्गत कर्मचाऱ्यांची देवाण-घेवाण, तज्ज्ञांचा सल्ला, प्रशिक्षण, हायड्रोग्राफीमध्ये सहकार्य, सागरी सुरक्षा आणि उपकरणांचा पुरवठा या बाबींचा समावेश आहे.
- केनियामधील कॅन्सरच्या रुग्णालयालाही भारत पूर्ण आर्थिक मदत करेल.
खासींचे अस्तित्व इ.स.पूर्व 1200 पासून :
- मेघालयातील खासी ही जमात इ.स.पूर्व 1200 पासून अस्तित्वात आहे.
- री-भोई जिल्ह्यात मिळालेल्या प्राचीन शिळा याची साक्ष देतात.
- येथील काही औजारेही हे संकेत देतात की, राज्यातील सर्वात मोठ्या जमातींपैकी एक असणाऱ्या खासी जमातीला मोठा इतिहास आहे.
- पुरातत्त्ववेत्ता मार्को मित्री आणि नॉर्थ ईस्टर्न हिल्स युनिव्हर्सिटीचे शिक्षक यांच्या एका दलाने एनएच-40 जवळ सोहपेटबनेंगच्या लुमावबुह गावात एका जागेची पाहणी केली. त्यानंतर येथे खोदकाम करण्यात आले.
- तसेच याबाबत बोलताना मित्री म्हणतात की, आम्हाला येथून शिळा आणि लोखंडाच्या काही वस्तू आढळून आल्या. हा पहाडी भाग दीड कि.मी. भागात पसरलेला आहे.
- येथील 20 औजारे आणि अन्य साहित्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याच्या अहवालानुसार हे साहित्य 12 व्या शतकातील आहे.
- आदिवासींच्या प्रथेशी नाते सांगणाऱ्याही काही वस्तू यात आहेत.
- 2004 मध्ये प्रथम याचा शोध लागला; पण या संशोधनाची खात्री करण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागला आहे.
- 200 वर्षांपूर्वी या भागात वस्ती असल्याच्या खुणा मिळाल्या आहेत.
- ब्रिटिश आर्कियोलॉजीकल रिपोर्टस्ने 2009 मध्ये मित्री यांचे ‘आऊटलाईन ऑफ नियोलिथिक कल्चर ऑफ खासी अॅण्ड जैन्तिया हिल्स’ हे संशोधन प्रसिद्ध केले होते.
ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान थेरेसा मे :
- थेरेसा मे या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान असतील, अशी माहिती विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी दिली.
- कॅमेरॉन हे (दि.13) राजीनामा देणार आहेत.
- ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ’10, डाउनिंग स्ट्रीट’ येथे पत्रकारांशी बोलताना कॅमेरॉन म्हणाले, की (दि.12) आपली शेवटची कॅबिनेटची बैठक घेणार आहेत.
- त्यानंतर (दि.13) ते हाउस ऑफ कॉमन्समध्ये उपस्थित राहतील आणि त्यानंतर ते राणी एलिझाबेथ-द्वितीय यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त करतील.
- ब्रिटनमध्ये 23 जून रोजी झालेल्या सार्वमतामध्ये ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने नागरिकांनी कौल दिला होता. त्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा कॅमेरॉन यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती.
- मार्गारेट थॅचर यांच्यानंतरच्या 59 वर्षीय थेरेसा मे या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान असणार आहेत.
आता मोबाईल ॲपवरही कर लागणार :
- ॲपल आणि गुगलवर मोबाईल ॲप्लिकेशन किंवा ॲप खरेदी करणं आता महाग होण्याची शक्यता आहे.
- मोबाईल ॲप्लिकेशन्सवर समतुल्यीकरण अधिभारांतर्गत (इक्वलायजेशन लेवी) अतिरिक्त कर लावण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
- तसेच त्यामुळे अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल ॲप्लिकेशन्स महाग होण्याची शक्यता आहे.
- या वर्षाअखेरपर्यंत याबाबत नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे.
- समतुल्यीकरण अधिभारांतर्गत 1 जून 2016 पासून लागू करण्यात आला आहे. यानुसार देशाबाहेर रजिस्टर असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ऑनलाइन जाहिरातींवर 6 टक्के समतुल्यीकरण अधिभार लागू केला जात आहे.
-
- तसेच या अतिरिक्त कराचा भार कंपन्या साहजिक ग्राहकाकडून वसूल करण्याच्या तयारीत आहेत. परिणामी ॲपच्या किमती 7 ते 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
पारदर्शी व्यवहारात भारतीय कंपन्या जगात सर्वोत्कृष्ट :
- पारदर्शी व्यवहाराच्या निकषावर भारतीय कंपन्या जगात सर्वोत्कृष्ट असून, चीनमधील कंपन्या या यादीत तळाला असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
- ‘ट्रान्स्फरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. या संस्थेने जगात वेगाने विकसित होणाऱ्या 15 देशांतील एकूण शंभर कंपन्यांची पाहणी केली.
- भारत आणि चीनसह ब्राझील, मेक्सिको आणि रशिया या देशांमधील कंपन्यांचाही यामध्ये समावेश होता.
- तसेच त्या-त्या देशांच्या कंपनी कायद्याचे पालन करत एकूण व्यवहार आणि गुंतवणुकीबाबत पारदर्शकता हा निकष तपासला गेला.
- तपासल्या गेलेल्या भारताच्या सर्व 19 कंपन्यांना संस्थेने 75 टक्क्यांहून अधिक गुण देत यादीत त्यांना वरचे स्थान दिले.
- सर्वेक्षणात घेतलेल्या चाचणीमध्ये त्यांना सरासरी दहापैकी फक्त 1.6 गुण मिळाले.
- देशातील कमजोर आणि कालबाह्य कायदे हे त्याचे प्रमुख कारण असल्याचेही दिसून आले.
- तपासल्या गेलेल्या शंभर कंपन्यांमध्ये सर्वांत जास्त 37 कंपन्या चीनमधीलच होत्या आणि सर्वांत खराब कामगिरीही त्यांचीच होती.
- भारत सरकारकडून कायद्याची होणारी कडक अंमलबजावणी, कागपदत्रांची सखोल छाननी, उपकंपन्यांच्या व्यवहारांवरही नजर यामुळे पारदर्शकतेत वाढ झाली आहे.
- भारतीय कंपन्यांमध्ये भारती एअरटेल या कंपनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
बांगलादेशकडून ‘पीस टीव्ही’चा परवाना रद्द :
- भारतीय धर्म उपदेशक डॉ. झाकिर नाईक यांच्या ‘पीस टीव्ही’वर बंदी घालण्यात आल्यानंतर (दि.11) बांगलादेश सरकारने ‘पीस टीव्ही’ला देण्यात आलेला ‘डाउनलिंक’साठीचा परवाना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.
- ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात सहभागी झालेल्या काही दहशतवाद्यांनी नाईक यांच्या प्रक्षोभक भाषणांमधून प्रेरणा घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर ‘पीस टीव्ही’वर बंदी घालण्याचा निर्णय बांगलादेश सरकारने (दि.10) घेतला होता.
- तसेच या निर्णयापाठोपाठ ‘पीस टीव्ही’चा ‘डाउनलिंक’ परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याचे बांगलादेश सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले.
- कॅबिनेट समितीच्या बैठकीत ‘पीस टीव्ही’वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दिनविशेष :
- किरिबाटी, साओ टोमे व प्रिन्सिप स्वातंत्र्य दिन.
- 1864 : इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक यांचा जन्म.
- 1864 : जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा