Current Affairs (चालू घडामोडी)

Current Affairs of 12 July 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 जुलै 2018)

सरकारकडून नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी :

  • केंद्र सरकारने नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांना मंजुरी दिली त्यामुळे भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युझर्सबरोबर कोणताही भेदभाव केला जाणार नाही तसेच इंटरनेटच्या वापरावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
  • बऱ्याच काळापासून भारतामध्ये नेट न्यूट्रॅलिटीचा मुद्दा चर्चेमध्ये होता. दूरसंचार आयोगाने ट्रायच्या नेट न्यूट्रॅलिटी संबंधींच्या शिफारशींना मंजुरी दिली. यामुळे इंटरनेट सेवा पुरवठादारांना यापुढे इंटरनेटचा स्पीड आणि कंटेट यामध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही.
  • इंटरनेट वापरण्याच्या समानतेच्या तत्वावर अतिक्रमण होऊ नये अशी ट्रायने नोव्हेंबर 2017 मध्ये शिफारस केली होती. इंटरनेट हे मुक्त माध्यम असून त्यात कुठलाही भेदभाव होता कामा नये अशी ट्रायची भूमिका होती.
  • ट्रायने आपल्या शिफारशी माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे पाठवल्या होत्या. फक्त टेलिमेडिसीन सारख्या काही सेवांना ट्रायने आपल्या निर्णयातून वगळले आहे. हे नवीन क्षेत्र असून तिथे इंटरनेट स्पीड गरजेचा असल्याचे सरकारचे मत आहे.
  • इंटरनेटचा वापर करण्यासाठी शुल्क देणाऱ्या कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा कंपनीला पक्षपात करून प्राधान्य न देता सर्वच उपभोक्त्यांना समान वागणूक दिली जाईल, हे नेट न्यूट्रॅलिटीचे तत्त्व आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जुलै 2018)

भारताने तेल उत्पादक देशांना दिला इशारा :

  • कच्चा तेलाच्या किंमती कमी करा किंवा तेल खरेदी कमी करावी लागेल असा इशारा भारताने ओपेक या तेल उत्पादक देशाच्या संघटनेला दिला आहे.
  • कच्चा तेलाची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. भारतातील सर्वात मोठी तेल रिफायनरी असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे चेअरमन संजीव सिंह म्हणाले कि, मागच्या दीड महिन्यात कच्च तेलाचे दर ज्या गतीने वाढली तीच गती कायम राहिली तर भारतीय ग्राहक इलेक्ट्रीक वाहने, गॅस अशा कमी खर्चाच्या पर्यायांकडे वळतील.
  • मागणी आणि किंमत यामध्ये फरक करता येणार नाही. भारतासारख्या देशात किंमतीवर विशेष लक्ष दिले जाते. किंमती अशाच वाढत राहिल्या तर लगेच त्याचे परिणाम दिसणार नाहीत पण दीर्घकालीन नक्कीच त्याचे परिणाम दिसून येतील असे संजीव सिंह म्हणाले.
  • तसेच लीबिया, कॅनडा आणि वेनेजुएला या देशांमध्ये तेल उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे तेलाच्या दरांमध्ये पाच टक्के वाढ झाली आहे.

देशातील पहिली ‘इंटरनेट टेलीफोनी’ सेवा सुरु :

  • सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने देशात पहिल्यांदाच इंटरनेट टेलीफोनी सेवेची सुरूवात केली आहे.
  • या सेवेअंतर्गत बीएसएनएलचे ग्राहक मोबाइल अॅपद्वारे देशभरात कोणत्याही फोन क्रमांकावर कॉल करु शकतात. यासाठी बीएसएनएल ग्राहकांनी केवळ मोबाइल अॅप Wings डाउनलोड करण्याची गरज आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही सेवा लॉन्च केली.
  • यापूर्वी, जर समोरच्या व्यक्तीकडे तुम्ही वापरत असलेले अॅप असेल तरच अॅपद्वारे फोन कॉल करणे शक्य व्हायचे. पण बीएसएनएलच्या Wings अॅपद्वारे देशातील कोणत्याही फोन नंबरवर कॉल करता येणार आहे. याद्वारे कॉल करण्यासाठी सिमकार्डची गरज लागत नाही. या आठवड्यापासूनच या सेवेसाठी नोंदणी सुरू होत असून 25 जुलैपासून ही सेवा सुरू होईल.
  • Wings अॅपद्वारे बीएसएनएलचे ग्राहक देशातील कोणत्याही नेटवर्कच्या क्रमांकावर बीएसएनएल वाय-फाय किंवा अन्य कोणत्याही सर्विस प्रोवायडरद्वारे कॉल करु शकतात. अॅपद्वारे कॉलिंगला यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे.
  • मात्र, बीएसएनएलची ही सेवा मोफत नसेल, सामान्य कॉलचे नियम याला लागू असतील. कारण, ज्या टेलिकॉम कंपन्या इंटरनेट टेलीफोनी सेवा पुरवतात त्यांनी कॉल इंटरसेप्शन आणि मॉनिटरिंगचीही व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश टेलिकॉम आयोगाने दिले आहेत.

भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर :

  • फ्रान्सला मागे टाकत भारताने जगातली सगळ्यात मोठी सहावी अर्थव्यवस्था असे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीसाठी म्हणजे 2017 साठीचे अद्ययावत आकडे जागतिक बँकेने जाहीर केले असून भारतीय अर्थव्यवस्थेने सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • फ्रान्सचा जीडीपी 2.582 लाख कोटी डॉलर्स असून भारताचा जीडीपी 2.597 लाख कोटी रुपये असल्याचे जागतिक बँकने नमूद केले आहे. बलाढ्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून मागोमाग चीन, जपान, जर्मनी व ब्रिटन हे देश आहेत.
  • या वर्षाच्या सुरूवातीला आंतरराश्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 2018 मध्ये 7.4 टक्क्यांच्या गतीने वाढेल असा अंदाज वर्तवला होता. तर 2019 मध्ये ही वाढ 7.8 टक्के असेल असाही अंदाज आहे. वाढीच्या वेगाचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा (2018 मध्ये 6.6 टक्के व 2019 मध्ये 6.4 टक्के) जास्त गतीने वाढेल असा अंदाज आहे.

दिनविशेष :

  • सन 1920 मध्ये पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.
  • राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना 12 जुलै 1982 मध्ये झाली.
  • सन 1985 या वर्षी पी.एन. भगवती भारताचे 17वे सरन्यायाधीश झाले.
  • सन 1995 मध्ये अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
  • महाराष्ट्र भूषण हा पुरस्कारसुनील गावसकर‘ यांना 12 जुलै 1999 मध्ये प्रदान झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जुलै 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago