चालू घडामोडी (12 सप्टेंबर 2017)
सातवे विश्व मराठी साहित्य संमेलन इंडोनेशियात :
- बाली, इंडोनेशिया आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी येथे केले.
- सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर सुरु झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ लहाने यांनी विस्ताराने मांडणी केली.
- संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड, संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, प्रमोद गायकवाड, माजी महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, ज्येष्ठ अधिकारी शिवाजी भोसले या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
- वैद्यकशास्त्रावर मराठीत अनेक पुस्तके आली असली, तरी अद्यापही तिथे संधी आहेत. त्याचप्रमाणे, अवयवदानासारख्या चळवळीची आज आवश्यकता आहे. आरोग्यावरची आपली तरतूद अनेक छोट्या आणि विकसनशील देशांपेक्षा कमी आहे. ती तरतूद वाढवली पाहिजे. सार्वजनिक आरोग्य अधिक सशक्त झाले पाहिजे, असेही त्यांनी मांडले.
भारतीय नौदलच्या महिला अधिकारी पहिल्यांदाच जगभ्रमंतीवर :
- ‘नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेने जगप्रवासाला रवाना झाला.
- भारतात पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांसह सुरु होणारा हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे. ही आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे.
- भारत सरकारचा ‘नारी शक्ती’ला असलेला भक्कम पाठींबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
- भारत देशासाठी हा गौरवास्पद व ऐतिहासिक क्षण असल्याचे मत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले.
- पहिला भारतीय वैयक्तिक जागतिक जलप्रवास 19 ऑगस्ट 2009 ते 19 मे 2010 या काळात आयएनएसव्ही म्हादईसोबत निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे यांनी केला होता.
- तसेच पहिला भारतीय विनाथांबा वैयक्तिक जगप्रवास कमांडर अभिलाष टॉमी यांनी 1 नोव्हेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत केला होता.
- आयएनएसव्ही तारिणीवरील या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.
दहशतवादाविरोधात अफगाणिस्तानला भारताचा पूर्ण पाठिंबा :
- अफगाणिस्तानवर ‘लादण्यात’ आलेल्या दहशतवादाविरोधात त्या देशाचा लढा सुरू असून त्या लढय़ास भारताचा पाठिंबा असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. अफगाणिस्तानसमवेत असलेल्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.
- अपगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांचे मोदी यांनी स्वागत केले. अफगाणिस्तान सरकार आणि तेथील जनतेला भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
- रब्बानी यांनी मोदी यांच्याशी चर्चा करताना अफगाणिस्तानातील स्थितीची माहिती दिली. रब्बानी दुसऱ्या भारत-अफगाणिस्तान परस्पर सहकार्य परिषदेला हजर राहण्यासाठी भारतात आले आहेत.
- तसेच परिषदेत रब्बानी म्हणाले की, भारत आणि अफगाणिस्तानने सुरक्षा सहकार्य अधिकाधिक बळकट करण्याचे ठरविले आहे. अफगाणिस्तान राष्ट्रीय संरक्षण दलास सहकार्य करण्याचेही भारताने मान्य केले आहे.
सारस्वत बँकेची सैनिकांसाठी विशेष कर्जयोजना :
- शतक महोत्सवी वर्षानिमित्त सारस्वत बँकेतर्फे भारतीय सैनिकांसाठी विशेष कर्जयोजना राबवण्यात येणार आहे.
- सैनिकांसोबतच दिव्यांगांसाठीही आर्थिक योजनांची घोषणा 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमात केली जाईल, असे बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
- तसेच या कार्यक्रमात भूदलासह नौदल, हवाईदल, तटरक्षक दल आणि निमलष्करी दलातील सैनिकांसाठी विशेष कर्जयोजना जाहीर केली जाईल. सोबतच दिव्यांग व्यक्तींसाठी आर्थिक योजना जाहीर होतील.
- येत्या वर्षभरात टोल नाक्यावरील ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन’च्या स्वयंचलित वजावटीत सारस्वत बँक ‘फास्ट टॅग’ या उत्पादनाद्वारे सामील होईल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
- 100 व्या वर्षात पदार्पण करणा-या सारस्वत बँकेच्या 283 शाखांचे जाळे महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत पसरले आहे.
- 31 मार्च 2017 अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय 55 हजार 273 कोटी रुपये इतका होता.
दिनविशेष :
- सवाई गंधर्व – (19 जानेवारी 1886 (जन्मदिन) – 12 सप्टेंबर 1952 (स्मृतीदिन)) हिदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक सवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील एक होत. त्यांचे पूर्ण नाव “रामचंद्र गणेश कुंदगोळकर” आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा