Current Affairs of 13 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 एप्रिल 2016)

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण :

  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते (दि.12) 56 दिग्गजांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • राष्ट्रपती भवनात हे कार्यक्रम पार पडले. यावेळी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी निवड करण्यात आलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
  • पद्म पुरस्कारांची यादी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली होती.
  • पहिल्या टप्प्यात 28 मार्च रोजी 56 मान्यवरांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • तसेच, इतर पुरस्कारार्थींचा (दि.12) पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
  • दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारला तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने पद्मश्री आणि सानिया मिर्झाने पद्मभूषण पुरस्कार स्विकारला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 एप्रिल 2016)

भारत-पाक सीमेवर पाचस्तरीय सुरक्षा योजना :

  • हल्ले, सीमेवरील घुसखोरी, तस्करी आणि अकस्मात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने भारत-पाक सीमेवर पाचस्तरीय सुरक्षा योजना (कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम) लागू करण्यास मंजुरी दिली आहे.
  • अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने वर्षभर 24 तास सीमेवर कडक नजर ठेवणारी ही योजना भारत पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर कच्छपासून काश्मीरपर्यंत 2900 किलोमीटर परिसरासाठी असेल.
  • सीमेतून भारतात घुसखोरी होऊ नये यासाठी प्रत्येक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर कंट्रोल रूम स्थापन केली जाणार आहे.
  • कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास या कंट्रोल रूममधून सीमा सुरक्षा दलांना लगेच अलर्ट संदेश जारी होईल.
  • युद्धक्षेत्रात पहारा ठेवणाऱ्या रडार यंत्रणेचा वापर करण्याबरोबरच सीमेवर जागोजागी अंडरग्राऊंड सेन्सर्सही बसवले जाणार आहेत.
  • पाचस्तरीय नव्या व्यवस्थेचे वैशिष्ट्य असे की एका यंत्रणेच्या नजरेतून एखादी बाब सुटली तरी पर्यायी यंत्रणेच्या देखरेखीतून ती सुटणे शक्य नाही.

केरळमध्ये सूर्यास्त ते सूर्योदयापर्यंत फटाक्‍यांना बंदी :

  • पुट्टींगल मंदिरातील दुर्घटनेनंतर केरळ उच्च न्यायालयाने सूर्यास्त ते सूर्योदय या दरम्यान आवाज करणाऱ्या फटाक्‍यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
  • परवानगीशिवाय असे फटाके वाजविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने निकालावेळी दिले आहेत.
  • मोठा आवाज करणाऱ्या फटाक्‍यांवर बंदी घालण्याची मागणी करत न्या. चिदंबरेश यांनी दाखल केलेल्या याचिकेवर (दि.12) सुनावणी झाली.
  • पुट्टींगल मंदिरामध्ये महोत्सवादरम्यान सर्व मार्गदर्शक सूचनांचा भंग करण्यात आला होता, तसेच सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती, असे केरळ सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.
  • दरम्यान, आगीनंतर बेपत्ता झालेले मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष पी. एस. जयालाल, महासचिव कृष्णाकुट्टी पिल्लई यांच्यासह विश्वस्त प्रसाद, सोमासुंदरम पिल्लई आणि रवींद्रन पिल्लई यांनी (दि.11) मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

भारताला अमेरिकेशी लष्करी साह्यास तत्त्वत: मान्यता :

  • दोन्ही देशांच्या सैन्याला दुरुस्ती आणि साहित्याच्या पुरवठ्यासाठी एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करण्याची परवानगी देण्याचा करार (लॉजिस्टिक एक्‍स्चेंज) करण्यास भारत आणि अमेरिकेने (दि.12) तत्त्वत: मान्यता दिली आहे.
  • भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऍश्‍टन कार्टर यांनी (दि.12) संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली.
  • तसेच सागरी सुरक्षेसंदर्भात दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये नियमितस्वरूपावर चर्चा सुरू करण्यासही दोन्ही देशांनी तयारी दाखविली आहे.
  • भारत आणि अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांमध्ये नियमितस्वरूपावर चर्चा सुरू आहेत.
  • तसेच या चर्चांची व्याप्ती वाढवून पाणबुड्यांचा विषयही त्यात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • सागरी सीमेबाबत धोरणनिश्‍चितीमध्येही सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले आहे.

हॉकी स्पर्धेत भारताचा पाकवर सर्वांत मोठा विजय :

  • अझलान शाह हॉकी करंडक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर 5-1 असा मोठा विजय मिळविला.
  • मलेशियामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत इपोह येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
  • तसेच या विजयामुळे स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखत भारतीय संघाने ब्राँझपदक मिळविण्याच्या आशा कायम राखल्या आहेत.
  • सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने पाकिस्तानवर 5-1 असा मोठा विजय मिळविल्याने भारतीय संघाचे क्रमवारीतील स्थान दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे.

आधार आता स्मार्ट कार्ड स्वरुपात :

  • सरकारने आधार कार्डाला स्मार्ट कार्डमध्ये उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली असून, सध्या कागदी स्वरुपात मिळत असलेले ‘आधार कार्ड’ लवकरच ‘स्मार्ट कार्ड’ स्वरुपातदेखील नजरेस येईल.
  • तसेच नवे आधार कार्ड पीवीसी प्लॅस्टिक कोटेड असेल.
  • आधार कार्डधारकास यासाठी 60 रुपये मोजावे लागतील.
  • 60 रुपये दिल्यावर आधार कार्डाची दोन स्मार्ट प्रिंट मिळतील.
  • स्मार्ट आधार कार्ड मिळविण्यासाठी आधार कार्डसाठीची नोंदणी असणे गरजेचे आहे.
  • आधार कार्डधारक किंवा ज्यांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे, असे सर्वजण आपले आधार कार्ड पीवीसी प्लॅस्टिक कोटेड कार्डामध्ये परिवर्तित करू शकतात.

दिनविशेष :

  • 1772 : वॉरन हेस्टींग्ज यांची गव्हर्नर जनरल म्हणून कलकत्ता येथे नेमणूक झाली.
  • 1919 : जालियानवाला बागची कत्तल भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला.
  • 1939 : भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना करण्यात आली.
  • 1948 : भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 एप्रिल 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago