चालू घडामोडी (13 एप्रिल 2017)
हरभजन सिंग चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सदिच्छादूतपदी निवड :
- भारतीय स्पिनर हरभजन सिंग याची चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
- चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 साठी एकूण आठ क्रिकेटपटूंची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली असून यामध्ये हरभजन सिंगचा समावेश आहे. यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा एक जून ते 18 जूनदरम्यान पार पडणार आहे.
- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठ सदिच्छादूतांमध्ये हरभजन सिंग याच्यासोबत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा हबिबूल बशर, इंग्लंडचा इयान बेल, न्यूझीलंडचा शेन बॉण्ड, ऑस्ट्रेलियाचा माईक हसी, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्थिम यांचा समावेश आहे.
भास्कर समुहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल कालवश :
- दैनिक भास्कर समुहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल (वय 73) यांचे 12 एप्रिल रोजी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
- भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवालजी यांच्या निधनाने मोठा धक्का बसला. त्यांनी हिंदी पत्रकारितेला नवा आयामच दिला नाही तर नव्या उंचीवर नेऊन पोहचविले.
- पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक स्तंभ राहिलेल्या रमेशजींनी हिंदी प्रिंट मीडियाला जनमानसात लोकप्रियता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठविली.
भारत खरेदी करणार इस्राईलकडून क्षेपणास्त्रे :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैमध्ये इस्राईलच्या दौऱ्यावर जात असून, द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारत इस्राईलशी दोन संरक्षण करार करणार आहेत.
- तसेच यात रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, नौदल हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे अशा 8 हजार क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा समावेश आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या लष्करी हार्डवेअरचा भारत सर्वांत मोठा खरेदीदार देश आहे.
- दोन्ही देशांना बाह्य दहशतवादाचा धोका आहे. तसेच, अमेरिका आणि इस्राईलचे मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता मोदी इस्रायलशी संबंध वाढविण्यावर भर देत आहेत.
- भारत इस्राईलकडून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र ‘स्पाइक’ आणि नौदलासाठी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र ‘बराक-8’ची खरेदी करणार आहे.
पाकिस्तान, वेस्ट इंडिज 2019 विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्यात अपयशी :
- पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ 2019 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्यात अपयशी ठरले आहेत.
- आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर राहिल्याने दोन्ही संघांना विश्वचषकासाठी थेट पात्र होता आले नाही.
- तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ विश्वचषक स्पर्धेला थेट पात्र ठरले आहेत.
- तसेच आता पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता स्पर्धेच्या दिव्यातून जावे लागणार आहे.
दिनविशेष :
- 13 एप्रिल 1731 मध्ये इतिहासप्रसिध्द वारणेचा तह होऊन शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याचे दोन भाग झाले.
- भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना 13 एप्रिल 1939 रोजी झाली.
- 13 एप्रिल 1948 मध्ये भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी घोषित करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा