चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2015)
केंद्र सरकारचा “अमृत योजना‘ राबविण्याचा निर्णय :
- टंचाईग्रस्त शहरांसाठी शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने “अमृत योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
- यासाठी राज्यातील 43 शहरांचा समावेश होणार असला तरी, मुंबई, ठाण्यासारख्या शहरापेक्षा सोलापूर, लातूरसह अन्य शहरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 20 ऑगस्टपासून केंद्र सरकारचे पथक राज्याच्या दौऱ्यावर येत असून, तीनदिवसीय कार्यशाळेनंतर शहरांची नावे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
- राज्य सरकारची “जलयुक्त शिवार योजना” यशस्वी झाली असली तरी, ही योजना ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे.
- 2 हजार कोटींची “अमृत योजना” राबविण्यासाठी राज्यातील 43 शहरांची निवड करण्यात आली असली तरी, पाणीटंचाईच्या शहरांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
- अमृत योजनेसाठी निश्चित केलेली शहरे : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, नगर, चंद्रपूर, परभणी, जालना, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, सातारा, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा आणि उदगीर.
फेसबुक लवकरच “ब्रेकिंग न्युज” नवे ऍप सादर करणार :
- लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच “ब्रेकिंग न्युज”बाबत माहिती देण्यासाठी नवे ऍप सादर करणार आहे.
- सध्यातरी या ऍपची चाचणी सुरु असून लवकरच ती सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
- या ऍपद्वारे फेसबुकसोबत करार असलेल्या प्रकाशकांच्या विविध महत्वाच्या बातम्या, लेख आदींबाबत युजरला सूचित करण्यात येणार आहे.
- तसेच सोबत संबंधित संकेलतस्थळाचा पत्ताही (युआरएल) देण्यात येणार आहे.
- ट्विटरने अलिकडेच अशापद्धतीची सुविधा युजर्सना “न्युज टॅब”द्वारे उपलब्ध करून दिली आहे.
बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि एसएस प्रणय विजयी :
- भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि एसएस प्रणय यांनी पुरुष एकेरी गटात सरळ सेटमध्ये विजय मिळावत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
- तसेच पारुपल्ली कश्यप याच्या पराभवाबरोबरच त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
- या वर्षी इंडिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावणारा जगातील तृतीय मानांकित खेळाडू श्रीकांतने चिनी तैपईच्या सू जेन हाओ याचा 21-14, 21-15 असा सरळ सेटस्मध्ये पराभव केला, तर जगातील 12 वा मानांकित खेळाडू प्रणयने युगांडा येथील एडविन एकिरिंग याच्यावर 21-14, 21-19 अशा सेटस्ने मात केली.
बाल्यावस्थेत असलेल्या दीर्घिकेचा शोध:
- आपल्या आकाशगंगेच्या चार पट व्यास असलेली पण बाल्यावस्थेत असलेली 10 अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेली दीर्घिका (गॅलेक्सी) खगोलशास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.
- कॅलटेक म्हणजे कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले असून ही दीर्घिका जन्माला येत असताना तिचा वेध घेण्यात यश आले आहे.
- या दीर्घिकेतील वायू महाविस्फोटाच्या वेळचे असण्याची शक्यता असून ते थंड होत ही दीर्घिका बनत आहे.
- कॅलटेकने बनवलेल्या कॉस्मिक वेब इमेजर या पॅलोमार वेधशाळेतील दुर्बीणीला या बाल दीर्घिकेची छायाचित्रे टिपण्यात यश आले आहे.
- आंतरतारकीय माध्यमांच्या वेटोळ्याला ती जोडली गेली असून दीर्घिकांमध्ये फिरणारा वायू म्हणजे हे आंतरतारकीय माध्यम आहे व ते विश्वात पसरलेले आहे.
- वायूंच्या शीतकरणातून बनणाऱ्या दीर्घिकेचे प्रारूप प्रत्यक्ष शोधण्यात आले असून विश्वाच्या प्रारंभी थंड वायू विश्वाच्या जाळ्यातून दीर्घिकांमध्ये येतो व त्यामुळे ताऱ्यांच्या निर्मितीस चालना मिळते.
- दीर्घेकेची वैशिष्टय़े :
- व्यास– आकाशगंगेच्या चार पट.
- अंतर– 10 अब्ज प्रकाशवर्षे.
- तारे– दोन क्वासार ताऱ्यांचा समावेश.
- निर्मिती– वायूंचे शीतकरण कारणीभूत.
‘मोबाइल डेटा’ची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे बंधनकारक :
बॉबी जिंदाल हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत :
- लुईसयाना प्रांताचे राज्यपाल बॉबी जिंदाल हे रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांपैकी सर्वांत कमी वयाचे उमेदवार आहेत.
- अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.
- ही निवडणूक 2016 मध्ये होणार आहे.
- बॉबी जिंदाल हे वयाच्या 36व्या वर्षी लुईसयानाचे राज्यपाल बनले होते.
- त्या वेळी ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत कमी वयाचे राज्यपाल ठरले होते.
- 2016 मधील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास मात्र ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार नाहीत.
- जॉन एफ केनेडी हे 43 वर्षांचे असताना निवडणूक जिंकून सर्वांत तरुण अध्यक्ष बनले होते. जिंदाल सध्या 44 वर्षांचे आहेत.
दिनविशेष :
- 1961 : ईस्ट जर्मनीने सीमा बंद केल्या. बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरु.
- 2002 : के. के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.
- 1795 : अहल्याबाई होळकर.