Current Affairs of 13 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 फेब्रुवारी 2016)

‘मेक इन इंडिया सप्ताह’ मुंबईत :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे सुरुवात केली.
  • उत्पादनाला चालना देताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्‍यक असून, यातून कोट्यवधी रोजगार उपलब्ध होणार आहेत.
  • उद्योगांना जागतिक संधी निर्माण करणारा देशातील पहिलावहिला ‘मेक इन इंडिया सप्ताह’ मुंबईत सुरू होत आहे.
  • आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या आणि जगातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला आयोजनाचा बहुमान मिळाला आहे.
  • गुंतवणूकदारांची पहिली पसंती असलेल्या महाराष्ट्रात हे जागतिक दर्जाचे भव्यदिव्य व्यापारी प्रदर्शन 13 ते 18 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.
  • तसेच यामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्वच प्रमुख क्षेत्रांची कवाडे गुंतवणूकदारांसाठी खुली केली जाणार आहेत.
  • ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’, ‘स्टार्ट अप स्टॅंड अप’ उपक्रमांबरोबरच आर्थिक सुधारणांची झलक या सोहळ्यात दाखवली जाणार आहे.
  • वांद्रे-कुर्ला संकुलनातील एमएमआरडीए मैदान, गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी या सप्ताहातील कार्यक्रम होणार आहेत.

‘आयएनएस विराट’चा शेवटचा प्रवास :

  • भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट‘चा शेवटचा प्रवास सुरू झाला असून, या युद्धनौकेचे रूपांतर साहसी पर्यटन केंद्रात केले जाणार आहे.
  • ओडिशातील परादीप बंदरात ‘आयएनएस विराट’ दाखल झाली.
  • तसेच येथून ही युद्धनौका काकिनाडा बंदराकडे जाणार आहे, त्यानंतर ती चेन्नई बंदरात आणि त्यानंतर शेवटी मुंबई बंदरात दाखल होणार आहे.
  • जगातील सर्वांधिक जुन्या युद्धनौकांपैकी एक असलेली ‘आयएनएस विराट’ थोड्याच दिवसांत निवृत्त होणार आहे.
  • विशाखापट्टणम येथे मागील आठवड्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय नौदलाच्या ताफा पाहणीमध्ये ‘आयएनएस विराट’ने सहभाग घेतला होता.
  • मुंबई बंदरात पोचल्यानंतर ‘आयएनएस विराट’ नौदलातून निवृत्त होणार आहे.
  • 1987मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली होती.
  • तीस वर्षे ब्रिटिश नौदलात सेवा दिल्यानंतर भारताने ही युद्धनौका खरेदी केली होती.

‘स्टार्ट अप’ना मिळणार पुरस्कार :

  • नवउद्योजकांमधील नावीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात ‘स्टार्ट अप’ योजनांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे.
  • ‘क्‍यू प्राइज मेक इन इंडिया’ या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ‘स्टार्ट अप’ना कारखाना उत्पादन आणि पुरवठ्यात नवनवीन संकल्पना आणि बिझनेस मॉडेल विकसित करणाऱ्या ‘स्टार्ट अप’ना दोन कोटींचे पुरस्कार दिले जातील.
  • वर्षभरात देशात ‘स्टार्ट अप्स’ कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे, दररोज तीन ते चार ‘स्टार्ट अप’ तयार होत आहेत.
  • वर्षभरात ‘स्टार्ट अप’मध्ये पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.
  • ‘मेक इन इंडिया सप्ताह’ हे ‘स्टार्ट अप’साठी जागतिक व्यासपीठ म्हणून देण्यात आले आहे.

12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत प्रथम क्रमांकावर  :

  • 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा विजय प्राप्त केला, लांब पल्ल्याची धावपटू कविता राऊतने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.
  • भारताने पदक तालिकेतील अव्वल स्थान स्थापित केले आहे.
  • भारताने या स्पर्धेत 146 सुवर्ण, 79 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह एकूण 248 पदकांची कमाई केली.
  • तसेच दुसऱ्या स्थानावरील श्रीलंका 157 पदकांची कमाई केली आहे, त्यात 25 सुवर्ण, 53 रौप्य आणि 79 कांस्यपदकांचा समावेश आहे.
  • पाकिस्तानाने 7 सुवर्ण, 23 रौप्य व 43 कांस्यपदकांसह एकूण 73 पदकांची कमाई करीत तिसरे स्थान पटकावले आहे.

हिंदू विवाह विधेयक पाकच्या संसदीय समितीमध्ये मंजूर :

  • सरकारच्या अनुत्साहामुळे अनेक दशकांपासून लांबणीवर पडलेले हिंदू विवाह विधेयक पाकिस्तानमधील संसदीय समितीने एकमताने मंजूर केले आहे.
  • कायदा आणि न्याय विषयावरील स्थायी समितीने ‘हिंदू विवाह विधेयक, 2015’चा मसुदा मंजूर केला.
  • तसेच या वेळी पाच हिंदू खासदारांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
  • या विधेयकाला शेवटपर्यंत काहींचा विरोध असतानाही स्थायी समितीने विवाहासाठी किमान वय 18 करण्याची दुरुस्ती करत एकमताने हा मसुदा मंजूर केला.
  • तसेच या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर तो संपूर्ण देशभरासाठी लागू असेल.

पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी :

  • भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने पाचवर्षांसाठी बंदी घातली आहे.
  • तसेच या शिक्षेमुळे रौफ यांना बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत पंच म्हणून काम करता येणार नाही.
  • आयपीएल 2013 मधील सट्टेबाजी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात रौफ यांचा वॉंटेड आरोपी म्हणून समावेश केला आहे.
  • मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत हा बंदीच्या शिक्षेचा निर्णय घेण्यात आला.
  • रौफ भ्रष्टाचार आणि गैरवर्तणूक प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

दिनविशेष :

  • 1879 – सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन.
  • 1922 – गायक पं भीमसेन जोशी यांचा जन्मदिन.
  • 1984 – भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago