चालू घडामोडी (13 जानेवारी 2018)
मुद्रा योजनेत महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय :
- प्रधानमंत्री मुद्रा योजनेत महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय ठरली. तीन वर्षांत राज्यात 42 हजार 860 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले.
- मुद्रा योजनेत 40 हजार कोटींहून अधिक कर्ज वितरित करणाऱ्या देशातील टॉप तीन राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे.
- देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासासाठी वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना एप्रिल 2015 रोजी सुरू केली.
- तसेच या योजनेत शिशु, किशोर व तरुण कर्ज अशा तीन टप्प्यात 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत बॅंकांमार्फत कर्जपुरवठा करण्यात येतो.
ऐतिहासिक निकालांचे प्रचारी विस्मरण :
- सरन्यायाधीशांविरोधात चार मुख्य न्यायाधीशांनी विरोधाचा सूर उमटवताच समाजमाध्यमांवर नेहमीप्रमाणे अर्धज्ञानी, अतिज्ञानी आणि अज्ञानी अशा सर्वानीच या चौघांविरोधात टीकेचा भडिमार सुरू केला.
- न्या. दीपक मिश्रा हे अयोध्येचा निकाल देणार असतानाच हे ‘बंड’ झाल्याचे तारेही तोडण्यात आले. त्यामुळे न्या. जस्ती चेमलेश्वर, न्या. मदन लोकूर, न्या. जोसेफ कुरियन आणि न्या. रंगन गोगाई या चौघाही न्यायाधीशांनी आजवर दिलेल्या अनेक ऐतिहासिक निकालांचे प्रचारी विस्मरणही झाले.
- विशेष म्हणजे इंटरनेटवर उपरोधिक वा विरोधी प्रतिक्रिया देणाऱ्याला अटक करण्याचा पाशवी अधिकार माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 66अ या कलमाने पोलिसांना लाभला होता.
- तसेच हे कलम न्या. चेलमेश्वर यांनीच रद्द केल्याने आपण आज त्यांच्याविरोधात प्रचारी प्रतिक्रिया देऊ शकत आहोत, याचेही विस्मरण अनेकांना घडले. या न्यायाधीशांच्या काही खटल्यांचे त्यामुळेच पुन्हा स्मरण झाले.
देशाकडून शंभरावा उपग्रहाचा यशस्वी प्रेक्षेपण :
- भारताने 12 जानेवारी रोजी पीएसएलव्ही सी-40 या प्रक्षेपकाच्या साह्याने ‘कार्टोसॅट 2’ हा आपला शंभरावा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले सामर्थ्य सिद्ध केले.
- ‘कार्टोसॅट’बरोबरच भारताचे आणखी दोन आणि इतर देशांचेही एकूण 28 उपग्रह अवकाशात सोडत आपली व्यापारी क्षमता दाखवून दिली.
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही सी-40 चे नियोजित वेळेवर उड्डाण झाले. ही ‘पीएसएलव्ही’ची आजवरची सर्वांत मोठी मोहीम होती.
- यंदाच्या मोहिमेच्या धवल यशाने चारच महिन्यांपूर्वी पीएसएलव्ही- 39 च्या मोहिमेचे अपयश धुऊन निघाले. या मागील मोहिमेदरम्यान उड्डाणानंतर प्रक्षेपकाचे उष्णताकवच अखेरच्या टप्प्यात विलग न झाल्याने उपग्रहाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला नाही आणि मोहीम अपयशी ठरली होती. मात्र, यंदाच्या यशामुळे मागील वेळेसचे अपयश दुर्मीळ होते, हे सिद्ध झाले.
- ‘इस्रो’चे अध्यक्ष ए.एस. किरणकुमार हे लवकरच निवृत्त होणार असल्याने त्यांनीही कारकिर्दीतील ही अखेरची मोहीम यशस्वी ठरल्याने आनंद व्यक्त केला. ही मोहीम ‘इस्रो’च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली.
गीता वर्मांची आंतरराष्ट्रीय भरारी :
- एखाद्या क्षेत्राकडे असलेला कल, एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी आत्मियता या सर्व गोष्टी अनेकांनाच झपाटल्यासारखे काम करण्यास प्रोत्साहित करतात.
- ‘कर्म करो, फल की चिंता मत करो’ अशा मंत्राच्या जोडीने चालणाऱ्यांच्या कार्याची वेगवेगळ्या स्तरांवर दखलही घेतली जाते.
- हिमाचल प्रदेशातील मनाली जिल्ह्यातील गीता वर्मा यांना सध्या असाच अनुभव आला आहे. कारण, दुचाकीवर स्वार होऊन दुर्गम भागातील खेड्यात राहणाऱ्या लोकांपर्यंत महत्त्वाच्या लसी पोहोचवण्याऱ्या गीता यांच्या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घेतली आहे.
- गीता यांनी 2017 मध्ये डोंगराळ भागात असणाऱ्या सेरज घाटी परिसरातील खडतर रस्त्यांवरुन दुचाकी चालवत एका अभियानाअंतर्गत त्यांनी मिसल्स रुबेल्ला measles rubella (MR)vaccine लसी रायगढ (हिमाचल प्रदेश) पर्यंत पोहोचवल्या होत्या. त्यांच्या याच कामाची दखल घेत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्यांच्या 2018 च्या कॅलेंडरमध्ये गीता यांचा दुचाकी चालवतानाचा फोटो छापला आहे.
जगातील तीन अव्वल नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश :
- जगातील अव्वल (टॉप) तीन नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे.
- Gallup International या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे.
- आगामी दावोस परिषदेसाठी स्विर्त्झलंड दौऱ्यावर जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यामुळे छाप पडणार आहे.
- जगातील 50 देशांतील नेत्यांचा यासाठी सर्वे करण्यात आला होता. यामध्ये जगातील तीन अव्वल नेते निवडण्यात आले.
- तसेच यामध्ये पहिल्या क्रमांकावर जर्मनच्या चांसलर अंजेला मार्केल, दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रोन तर तिसऱ्या स्थानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमांक लागला आहे.
ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब पित्रे यांचे निधन :
- देवरुख येथील ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक बाळासाहेब पित्रे (वय 90 वर्षे) यांचे 12 जानेवारी सायंकाळी पुणे येथे निधन झाले.
- देवरुख येथील जगप्रसिद्ध सुश्रुत-अॅडलर या ओर्थोपेडिक शल्य चिकित्सा उपकरणे तयार करणाऱ्या नामांकित कंपनीचे ते संस्थापक संचालक होते.
- 1973 पासून सुश्रुत कंपनीच्या कारभाराची सूत्रे सांभाळत त्यांनी अनेक सामाजिक कार्यातही आपला सहयोग दिला.
- बाळासाहेबांनी हिंदुस्थान लिव्हर, टाटा यांच्या सारख्या नामांकित कंपन्यांमध्येही मानव संसाधन क्षेत्रात ज्येष्ठ पदावर काम केले होते. त्यांच्या कामाच्या पद्धतीने आणि सृजनशील वृत्तीने त्यांनी औद्योगिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याकार्तुत्वाने ठसा उमटवला होता.
- सिद्धी ट्रस्ट, सेंटर फॉर रुरल आंतर्प्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट अँड रिसर्च (CREDAR), देवरुख ललित कला अॅकॅडमी, आकार ऑर्गनायझेशन, अशा विविध माध्यमात कार्यरत सामाजिक संस्थांची स्थापना करून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनाही सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन केले होते. देवरुख मधील अग्रगण्य अशा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचेही ते मानद अध्यक्ष होते.
दिनविशेष :
- सन 1610 मध्ये 13 जानेवारी रोजी गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
- 13 जानेवारी 1957 मध्ये हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.
- पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेस हि रेल्वेगाडी 13 जानेवारी 1996 रोजी सुरु झाली.
- के.जी. बालकृष्णन यांनी 13 जानेवारी 2007 रोजी भारताचे 37वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा