Current Affairs of 13 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 जुलै 2016)

मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रकिया जाहीर :

  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला 21 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
  • मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, म्हणून विविध ठिकाणी अभ्यास केंद्रातूनही माहिती दिली जाणार आहे.
  • पदवी, पदव्युत्तरच्या ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे निकाल मिळालेले नाहीत, त्यांनी पुढील वर्षासाठी कायम नोंदणी क्रमांकाचा वापर करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले आहे.
  • साळुंखे म्हणाले की, मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठीचे नियमित प्रवेश हे 21 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन नोंदणी करून घेता येतील.
  • तसेच विलंब शुल्कासह 1 ते 15 सप्टेंबर आणि अतिविलंब शुल्कासह 16 ते 30 सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी असेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 जुलै 2016)

ऑलिंपिकसाठी हॉकी गोलरक्षक श्रीजेश भारताचा कर्णधार :

  • पुढील महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची धुरा अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे सोपविण्याची घोषणा (दि.12) करण्यात आली.
  • गेल्या महिन्यात चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने उपविजेतेपद पटकाविले होते.
  • तसेच गेल्या काही महिन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हरमनप्रित सिम्ग आणि सुरेंदर कुमार या तरुण खेळाडूंना ऑलिंपिकसाठी निवड समितीने संधी दिली आहे.
  • या संघामध्ये श्रीजेश हाच एकमेव गोलरक्षक असेल. मात्र ऑलिंपिक स्पर्धेच्या नियमांनुसार, संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची जागा घेण्यासाठी दोन अतिरिक्त राखीव खेळाडूंचा समावेश करण्याची मुभा देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपदी राज बब्बर :

  • विधानसभा निवडणूक होणार असलेल्या उत्तर प्रदेशात राज्य काँग्रेसच्या अध्यक्षपदी अभिनेता व खासदार राज बब्बर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी (दि.12) ही माहिती दिली.
  • प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात प्रचार करणार का? या प्रश्नाचे थट उत्तर न देता, आझाद म्हणाले की, ‘काँग्रेसमध्ये प्रत्येक जण ठरावीक भूमिका बजावत असतो व यापुढेही तेच कायम राहील.’
  • आग्रा येथे जन्मलेले राज बब्बर त्या राज्यातून तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले. सध्या ते उत्तराखंडमधून राज्यसभा सदस्य आहेत.

जेरोम टेलरची क्रिकेट कसोटीतून निवृत्ती :

  • भारताविरुद्धच्या आगामी क्रिकेट कसोटी मालिकेपूर्वीच वेगवान गोलंदाज जेरोम टेलर याने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्याने वेस्ट इंडीजच्या संघाला धक्का बसला आहे.
  • भारताविरुद्धच्या मालिकेसाठीच्या मूळ संघात टेलरची निवड झाली होती; मात्र निवृत्तीची त्याने अधिकृतरित्या कल्पना दिल्यानंतर त्याला या संघातून वगळण्यात आले.
  • एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील कारकिर्द वाढविण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
  • वेस्ट इंडीजच्या कसोटी संघामध्ये टेलरची जागा पक्की नव्हती. गेल्या 13 वर्षांत तो 46 कसोटी सामने खेळला आहे, त्यात त्याने 130 बळी मिळविले.

युरो 2016 चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू अँटोनी ग्रिझमन :

  • यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल करणाऱ्या ग्रिझमनला युरो 2016 चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले.
  • पोर्तुगालच्या रुई पॅट्रिशियोला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा बहुमान देण्यात आला.
  • 25 वर्षीय ग्रिझमनने या स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल केले, तर 2 गोलमध्ये सहायकाची भूमिका पार पाडली.
  • फ्रान्सला विजेतेपदाचा मुकुट मिळवून देण्यात तो अपयशी ठरला असला, तरी संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाण्यात त्याने मोठा वाटा उचलला.
  • ग्रिझमन हा 1984 नंतर पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने युरो स्पर्धेत 6 गोल केले आहेत.

भारत रस्ते सुरक्षेसाठी अमेरिकेचे सहकार्य घेणार :

  • भारतातील वाढते रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • रस्ते सुरक्षेसाठी अमेरिका भारताला सहकार्य करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
  • गडकरी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी (दि.13) भारतीय पत्रकारांशी संवाद साधला.
  • भारतातील वाढते अपघात आणि मृत्युमुखी पडणारे लाखो लोक याविषयी माहिती देतानाच वाढते अपघात रोखण्यासाठी अमेरिकेची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
  • भारतीय वाहतुकीच्या अत्याधुनिकीकरणासाठी सर्व तांत्रिक सहकार्य देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.
  • तसेच अमेरिकेतील सध्याचे वाहतूक नियम, कोडीफिकेशनची अंमलबजावणी भारतात करणार आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 जुलै 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago