चालू घडामोडी (13 जुलै 2017)
अनुराग म्हामल भारताचा 48 वा ग्रॅण्डमास्टर :
- बुद्धिबळातील सर्वोच्च किताब असलेल्या ‘ग्रॅण्डमास्टर’चा मान अपेक्षितपणे अनुराग म्हामल याने पटकाविला.
- ग्रॅण्डमास्टर किताब मिळवणारा अनुराग हा पहिला गोमंतकीय खेळाडू ठरला. भारताचा तो 48 वा ग्रॅण्डमास्टर आहे.
- अनुराग सध्या स्पेन येथे 37व्या बेनास्क्वे आंतरराष्ट्रीय ओपन स्पर्धेत खेळत आहे. त्याने पाच फेऱ्यांत 4.4 एलो गुण मिळवले आणि 2500 रेटिंगचा टप्पा गाठला. या कामगिरीनंतर अनुरागने ‘ग्रॅण्डमास्टर’ किताबाला गवसणी घातली.
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर :
- जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 2017-18 चा 168 कोटी 70 लाख रुपयांचा अर्थसंकल्प अवलोकनार्थ ठेवण्यात आला होता. या अर्थसंकल्पात 42 विषय मांडण्यात आले होते.
- तसेच त्यापैकी महिला व बाल कल्याण समितीचे विषय वगळता अन्य सर्व विषयांमध्ये किरकोळ दुरुस्त्या सुचवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला.
- जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची ही दुसरी सर्वसाधारण सभा होती सदस्य निवडून येऊन तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर त्यांना अर्थसंकल्प कसा असतो, हे पहिल्यांदा अनुभवायला मिळाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बससेवा :
- पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची मागणी लावून धरल्यानंतर पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
- निगडी येथून पीएमपीएमएलची वातानुकूलित बस सुरू केली आहे. 13 जुलै पासून निगडी येथून महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू करण्यात येणार आहे.
- स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहराला पीएमपीएमएलमार्फत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविली जाते. त्या मोबदल्यात या दोन्ही महापालिका पीएमपीएमएलला दरवर्षी कोट्यवधींचा निधी देतात.
- मात्र सेवा पुरविताना पीएमपीएमएलकडून पिंपरी-चिंचवडवर अन्याय होत असल्याबाबत स्थायी समिती सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
- पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी आणि महिलांसाठी स्वतंत्र बसेस सुरू कराव्यात, तोपर्यंत पीएमपीसंदर्भातील कोणताही विषय मंजूर करणार नाही, अशी भूमिका सावळे यांनी घेतली होती.
भारतीय महिला कर्णधार मिताली राजने इतिहास रचला :
- भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज हिने महिला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे.
- तसेच यासह तिने अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. मितालीने केवळ महिला क्रिकेटर नाही तर अनेक दिग्गज पुरूष क्रिकेटपटूंनाही मागे टाकले आहे.
- इंग्लंडमध्ये सध्या महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिताली ब्रिस्टलच्या मैदानावर उतरली त्यावेळी वर्ल्ड रेकॉर्डपासून मिताली केवळ 41 धावा दूर होती. या सामन्यात 114 चेंडूंमध्ये 69 धावा फटकावून मिताली बाद झाली, पण त्याआधी तिने 6 हजार धावांचा टप्पा ओलांडला.
- 183 एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने हा विक्रम केला. यापुर्वी इंग्लंडची खेळाडू शार्ले एडवर्डच्या नावावर हा विक्रम होता. शार्ले एडवर्डने 191 सामन्यांमध्ये 5992 धावा बनवल्या होत्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा