चालू घडामोडी (13 जून 2017)
आयएसएसएफ विश्व चषकात भारताला सुवर्णपदक :
- भारताचा जितू राय अणि हीना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्व चषकात दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मिश्र गटात अंतिम फेरीत रशियाला 7-6 ने पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली, तर फ्रान्सने इराणवर विजय मिळवत कांस्यपदक पटकावले.
- या आधी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी जितू आणि हीना दोन्ही पुरुष आणि महिला गटात दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत अनुक्रमे 12वे अणि नववे स्थान मिळवले होते, त्यामुळे दोन्ही खेळाडू अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नव्हते.
- आघाडीचे आठ खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होतात. मिश्र गटात भारत पदक तालिकेत नाही. मात्र, टोकियो ऑलिम्पिक पदक स्पर्धेसाठी भारताला मंजुरी मिळाली आहे.
- भारताच्या या जोडीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी दिल्लीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. गाबालात चीनचा संघ सहा पदकांसह आघाडीवर आहे. त्यात चीनने तीन सुवर्णपदके पटकावली आहेत.
39वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाईमध्ये भरणार :
- मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा अंबाजोगाई येथे होणार, अशी घोषणा 11 जून रोजी अंबाजोगाई येथे झालेल्या बैठकीत मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली.
-
- बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मसाप यांच्या संयुक्त विद्यमाने 39वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे.
- तसेच या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राजेसाहेब यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन आयोजित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. ह्यया संमेलनात शिक्षक साहित्यिकांना अधिक वाव देण्यात येणार आहे.
- गतवर्षी 38वे मराठवाडा साहित्य संमेलन लोकरंग भूमी सोयगाव येथे भरविण्यात आले होते. अंबाजोगाईमध्ये 1982 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर :
- राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल 13 जून रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठवडाभराने लागत आहे.
- गेल्या आठवड्यात लागोपाठ निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकालही लवकरच लागणार आहे.
- सीबीएसई आणि आयसीएसई नंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा (SSC) निकाल प्रलंबित होता. मात्र 13 जूनला दहावीचा निकाल घोषित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिनविशेष :
- थोर क्रांतीकारक गणेश दामोदर सावरकर यांचा जन्म 13 जून 1879 मध्ये झाला.
- 13 जून 1969 हा विविध अंगांनी प्रसिध्द असलेले महाराष्ट्राचे लाडके दैवत ‘आचार्य अत्रे’ (प्रल्हाद केशव अत्रे) यांचा स्मृतीदिन आहे.
- सन 1983 मध्ये 13 जूनला ‘पायोनियर 10’ हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा