Current Affairs (चालू घडामोडी) of 13 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | स्वच्छ भारत अभियानाचे पुढचे पाऊल |
2. | भाग्यश्री योजनेचे उद्घाटन |
3. | प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर |
4. | दिनविशेष |
स्वच्छ भारत अभियानाचे पुढचे पाऊल :
- स्वच्छ भारत अभियानांतर्गत आगामी पाच वर्षात देशभरात 6.84 कोटी शौचालये बांधण्यात येणार आहेत.
- या शौचालयांच्या बांधनीसाठी अंदाजे 1,34,386 कोटी रुपये लागणार आहेत.
- स्वच्छतामंत्री विरेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):
भाग्यश्री योजनेचे उद्घाटन :
- सुकन्या योजनेत बदल करून मुलींसाठी भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचे उद्घाटन केले.
- या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणार्या प्रत्येक मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
- अभिनेत्री भाग्यश्री या योजनेची ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर :
- जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्वाधिक प्रदूषित वीस शहरांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत तेरा शहरे भारतातील आहेत.
- यामध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर तर बीजिंग दुसर्या क्रमांकावर आहे.
दिनविशेष :
- 1781 – सर विल्यम हर्शोल याने युरेनस ग्रहाचा शोध लावला.
- 1997 – कोलकात्यातील मिशनरीज ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांच्या वारसा म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.
- 2003 – मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट.