Current Affairs of 13 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 मे 2016)

भारत-बांगलादेश चर्चेला प्रारंभ :

  • भारत-बांगलादेश दरम्यानच्या पाचदिवसीय चर्चेला प्रारंभ झाला.
  • अमली पदार्थ, जनावरांची तस्करी तसेच सीमाभागातून होणारी घुसखोरी आदी विषयांवर उभय देशांमध्ये विचारमंथन होणे अपेक्षित आहे.
  • सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख के. के. शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील 21 सदस्यांचे पथक ढाक्‍यात आले असून, बांगलादेश सीमारक्षक दलाच्या मुख्यालयामध्ये ही चर्चा सुरू आहे.
  • बांगलादेश सीमारक्षक दलाचे प्रमुख मेजर जनरल अझीझ अहमद यांच्या नेतृत्त्वाखालील 23 सदस्यांचे पथक या चर्चेत सहभागी झाले आहे.
  • मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्येच ही चर्चा होणार होती, पण सीमा सुरक्षा दलाच्या विमानास दिल्लीमध्ये अपघात झाल्याने ही चर्चा लांबणीवर पडली होती.
  • तसेच या अपघातामध्ये 10 कर्मचारी मरण पावले होते.
  • सीमेवरील चकमकी पूर्णपणे थांबविण्यात याव्यात आणि सुरक्षाविषयक प्रोटोकॉल्सची कडक अंमलबजावणी केली जावी, अशा मागण्या बांगलादेशकडून केल्या जाऊ शकतात, असे ‘बीएसएफ’च्या सूत्रांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 मे 2016)

जगातील सर्वांत उंच पुतळा गुजरातमध्ये उभारला जाणार :

  • ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार असल्याचा विश्वास 91 वर्षीय पद्मश्री पुरस्कारविजेते राम व्ही. सुतार यांनी व्यक्त केला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा गुजरातमध्ये उभारला जाणार असून, 2014 मध्ये सरकारने हे काम सुतार यांच्याकडे सोपविले आहे.
  • सुतार यांनी साकारलेले महात्मा गांधींचे पुतळे फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बाबार्डोस, रशिया आणि इंग्लंड या देशांना भेट देण्यात आले आहेत.
  • संसद भवनातील 17 फूट उंच महात्मा गांधींचा ध्यानमुद्रेतील लक्ष वेधून घेणारा पुतळाही सुतार यांनी बनविला आहे.
  • मध्य प्रदेशातील गांधीसागर धरणात 45 फूट उंच चंबळचे स्मारक उभारल्यानंतर सुतार प्रसिद्धिझोतात आले होते.
  • देश विघटनाच्या वाटेवर असताना सरदार पटेल यांनी तो एकसंघ ठेवण्याचे काम केले.

महाराष्ट्राचा इतिहास कोशबद्ध होणार :

  • महाराष्ट्राच्या वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांमध्ये 1800 ते 1950 या दीडशे वर्षांच्या कालखंडात कोणकोणत्या घडामोडी घडल्या आणि त्यांचा परस्परांवर नेमका काय परिणाम झाला, याचा धांडोळा घेणाऱ्या पहिल्या मराठी कोशाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
  • मुंबईतील मराठी संशोधन मंडळाच्या या प्रकल्पाला साहित्य संस्कृती मंडळाने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे.
  • विविध क्षेत्रातील तौलनिक नोंदी कालानुक्रमे मांडणारा आणि त्यांचा व्यापक आढावा घेणारा कोश संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी आदींना उपयोगी ठरणार आहे.
  • मध्ययुगीन महाराष्ट्राची पारंपरिक प्रतिमा 19 व्या शतकात मागे पडून आधुनिक महाराष्ट्राची नवी ओळख घडवली जाऊ लागली.
  • ब्रिटिशांविरुद्धचा 1857 चा उठाव, त्याचबरोबर सुरू झालेली सामाजिक प्रबोधनाच्या आणि वैचारिक चळवळींनी महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक जीवनात नवे मन्वंतर घडून आले.
  • वृत्तपत्रे, नियतकालिके यांचा आरंभ, देश-विदेशातील साहित्यकृतींची भाषांतरे, आधुनिक रंगभूमीचा उदय, मूकपट ते बोलपटांचा कालखंड, सार्वत्रिक शिक्षण-संस्था-मंडळांची स्थापना, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील वसाहतवादोत्तर नवभारताच्या पुनर्निर्माणाचा कालखंड आदींच्या नोंदी, त्याचबरोबर
  • त्यांचा परस्परांवर पडलेला प्रभाव आणि परिणामाचा एक प्रकारचा संशोधित संदर्भच या कोशाद्वारे हाती येणार आहे.
  • मराठीत एकत्रित असा एकही कोश नाही. मराठी संशोधन मंडळाने चंद्रकांत भोंजाळ यांच्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

आयसीसीच्या चेअरमनपदी परत शशांक मनोहर :

  • ज्येष्ठ क्रिकेट संघटक अ‍ॅड. शशांक मनोहर (दि.12) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पहिले स्वतंत्र चेअरमन म्हणून बिनविरोध विराजमान झाले आहेत.
  • दोन दिवसांपूर्वीच त्यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
  • आयसीसीच्या पूर्ण सदस्यीय बोर्डाने प्रस्तावित घटनात्मक सुधारणेस मंजुरी प्रदान करताच 58 वर्षांचे मनोहर यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.
  • तसेच ते आयसीसीचे पहिले बिनविरोध स्वतंत्र चेअरमन आहेत. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ लगेच सुरू झाला.
  • आयसीसी निवडणूक प्रक्रियेअंतर्गत सर्व संचालकांना आजी किंवा माजी संचालकांमधून एका व्यक्तीचे नाव सुचविण्याची मुभा असते.
  • निवडणूक लढविण्यासाठी अर्जावर दोन पूर्णकालीन सदस्यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे.
  • मनोहर हे या पदासाठी एकमेव उमेदवार होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  • निवडणूक प्रक्रिया सांभाळणारे ऑडिट समितीचे स्वतंत्र अध्यक्ष अदनान झैदी यांनी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगून मनोहर यांच्या नावाची घोषणा केली.

भारतातील काही रहस्यमय ठिकाणे :

  • भारत देश त्याच्या रहस्यमय गोष्टींमुळे नेहमीच अख्ख्या जगाला भुरळ घालत असतो.
  • भारतात अनेक राजे-रजवाडे होऊन गेले. अनेक महाल आणि रहस्यमय किल्ले इथं आजही स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत.
  • तसेच ते किल्ले आणि ठिकाणांमधील रहस्यमयी गोष्टींचं कोडं उलगडण्यास विज्ञानालाही आजमितीस जमलं नाही.
  • विज्ञानाच्या जोरावर मनुष्यानं चंद्रावर जरी झेप घेतली तरी काही रहस्यमय गोष्टींच्या बाबतीत त्याला झुकावेच लागले आहे.
  • भारतात अशाच काही रहस्यमय जागा आहेत. ज्या आजच्या युगातही रहस्यांनी भारलेल्या आहेत.
  • तसेच या ठिकाणांवरील रहस्य जाणून घेण्यासाठी दररोज देश-विदेशातील पर्यटक इथं आवर्जून भेट देतात.
  • अशीच काही रहस्यमय ठिकाणं पुढील प्रमाणे :-
  • पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या- आसाम
  • उंदरांचं मंदिर – करणी माता मंदिर, राजस्थान
  • लोकतकचा तरंगता तलाव – मणिपूर
  • रुपकुंड तलाव – उत्तराखंड
  • कोलकात्यातील वडाचे झाड
  • चुंबकीय टेकडी – लडाख
  • कोडीन्ही गाव – केरळ
  • पंबन बेटावरचे तरंगते दगड – रामेश्वरम
  • लटकते खांब – लेपक्षी, आंध्र प्रदेश

दिनविशेष :

  • 1857 : मलेरियाबरील जंतूचा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शास्त्रज्ञ सर रोनॉल्ड रॉस यांचा भारतात जन्म झाला.
  • 1962 : डॉ.राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मे 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago