चालू घडामोडी 13 ऑक्टोंबर 2015
प्रा. अँगस डेटन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर :
खड्गप्रसाद शर्मा ओली देशाचे 38 वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण :
- नेपाळमधील ज्येष्ठ साम्यवादी नेते खड्गप्रसाद शर्मा ओली यांनी आज देशाचे 38 वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केली.
- नेपाळच्या संसदेत 11 तारखेला झालेल्या मतदानात ओली यांनी अनेक छोट्या पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव केला होता.
- नेपाळचे अध्यक्ष रामबरन यादव यांनी ओली यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- ओली यांनी आपले छोटेखानी मंत्रिमंडळही तयार केले असून, यामध्ये दोन उपपंतप्रधान आणि पाच मंत्री आहेत.
- बिजयकुमार गच्छधर आणि कमाल थापा यांनी उपपंतप्रधानपदाची शपथ घेतली.
सहा साहित्यिकांनी पुरस्कार केंद्र सरकारला केले परत :
- देशातील जातीय वादाचे वातावरण आणि वाढत्या असहिष्णुतेचे कारण देत काश्मिरी लेखक गुलाम नबी खयाल यांच्यासह डी. एन. श्रीनाथ, राजेश जोशी, मंगलेश दबराल, वरियम संधू आणि जी. एन. रंगनाथन या सहा साहित्यिकांनी आपले पुरस्कार केंद्र सरकारला परत केले आहेत.
- कलबुर्गीच्या हत्येचा निषेधार्थ म्हणून हे साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करीत आहे.
15 ऑक्टोबर ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय :
- भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जयंती दिन 15 ऑक्टोबर हा संपूर्ण महाराष्ट्रात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


- या निमित्त्ताने शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक कार्यालये या ठिकाणी डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.
- त्याचप्रमाणे एकमेकांना पुस्तक भेट देऊन डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
- राज्यातील शाळा, महाविद्यालयीन ग्रंथालये, सार्वजनिक ग्रंथालये, व्यावसायिक कार्यालये यांच्यासह अनेक साहित्य-सांस्कृतिक संस्थाही या उपक्र मात सहभागी होणार आहेत.
शिक्षकांसाठी ‘मदत’ नावाची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय :
- शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
- ‘लोकमत’च्या बातम्यांची दखल घेत राज्य शासनाने शिक्षकांसाठी ‘मदत’ नावाची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्याआधारेच शिक्षकांच्या गावाजवळ नियमित आणि आंतरजिल्हा बदल्या करण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
- राज्यातील जवळपास 12 हजार शिक्षक सध्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत.
दिनविशेष :
- 1792 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जार्ज वॉशिग्टन यांच्या हस्ते ‘व्हाइट हाऊस’ची पायाभरणी.


- 1884 : ग्रीनीच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानण्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याने जगाची वेळ निश्चित केली गेली.
- 1911 : पूर्वाश्रमीच्या मागरिट नोबेल, स्वामी विवेकानंदाच्या शिष्या निवेदिता यांचे निर्वाळ