Current Affairs of 13 October 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2016)
विष्णुदास भावे यांना नाट्य गौरव पदक पुरस्कार जाहीर :
- अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिले जाणारे ‘विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार जयंत सावरकर यांना जाहीर करण्यात आले आहे.
- तसेच येत्या 5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते हे पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
- समितीचे अध्यक्ष डॉ. कराळे म्हणाले की, प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकारास ‘विष्णुदास भावे गौरव पदका’ने सन्मानित करण्यात येते.
- यंदाचे 51 वे पदक जयंत सावरकर यांना जाहीर करण्यात आले आहे.
- रंगभूमी क्षेत्रातील हे मानाचे पदक असून, आजवर बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे यांच्यापासून ते विक्रम गोखले यांच्यापर्यंत अनेक दिग्गज रंगकर्मी, नाटककार, लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 11 हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
Must Read (नक्की वाचा):
डिजिटल महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी योजना :
- डिजिटल धारावी अंतर्गत तेथील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळवून देणे, उद्योजकता वाढविणे, राज्यभर 25 सिस्को नेटवर्क अकॅडमीची उभारणी, ब्रॉडबॅन्ड सुविधांची निर्मिती, नागपूर येथे स्मार्ट सिटी प्रकल्पास सहकार्य व फेटरी (जि.नागपूर) या गावात वायफाय, स्मार्ट एज्युकेशन व स्मार्ट हेल्थकेअर सुविधा उभारणे आदींसाठी सिस्को कंपनी सहकार्य करणार आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 ऑक्टोबर रोजी येथे आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. यावेळी त्यांनी धारावी व फेटरीतील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनमोकळा संवाद साधला.
- शासनाचे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव नेटवर्कने जोडण्याचे नियोजन असून, महाराष्ट्र हे ‘डिजीटल इंडिया’च्या अंमलबजावणीत अग्रेसर राज्य ठरेल. ‘सिस्को’च्या पुणे येथील प्रकल्पाचे ई-उद्घाटन यावेळी झाले.
- नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन, सिस्को सिस्टीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स, सिस्को इंडियाचे अध्यक्ष दिनेश मलकानी आदी यावेळी उपस्थित होते.
- नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा सहजपणे मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे, आता राज्यातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात येतील. त्यामुळे खेड्यातही आरोग्य व शिक्षणाच्या उत्तम सुविधा मिळतील.
कसोटी क्रमवारीत अश्विन प्रथम स्थानी :
- न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगीरी करत 30 बळी मिळवणारा आर. अश्विन कसोटी क्रमवारी अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
- आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार अश्विनने तिसऱ्या क्रमांकवूर पहिल्यास्थावर झेप घेतली आहे. त्याच्या नावावर आता 900 गुण आहेत.
- 38 कसोटी सान्यात अश्विनने 7 वेळा सामनावीर पुरस्कार आपल्या नावावर केला आहे.
- विशेष म्हणजे आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूमध्येही आर.अश्विन प्रथम क्रमांकावर आहे.
- गोलंदाजी क्रमवारीत अश्विननंतर द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (878) तिसऱ्या क्रमांकावर इंग्लडचा जेम्स अँडरस्न (870) आहे.
- गोलंदाजीमध्ये 10 टेनमध्ये रविंद्र जाडेजालाही स्थान मिळाले आहे. जाडेजा आठव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
‘सकाळ समूहा’चा आंतरराष्ट्रीय सन्मान :
- ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ 12 ऑक्टोबर रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
- ‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील यांनी वॅन-इफ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट पेरेग्ने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेअरफेल आणि मुख्य कार्यपालन अधिकारी थॉमस जेकब यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला.
- ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार तसेच वॅन-इफ्राच्या रिसर्च अँड मटेरियल टेस्टिंग सेंटरचे प्रमुख आनंद श्रीनिवासन समारंभाला उपस्थित होते.
- तसेच सध्या येथे सुरू असलेल्या वर्ल्ड पब्लिशिंग एक्स्पो 2016 दरम्यान हा कार्यक्रम झाला. या एक्स्पोमध्ये प्रिंट वर्ल्ड 2016 आणि डिजिटल वर्ल्ड 2016 अशी दोन सत्रे होत आहेत.
- या पुरस्कारामुळे जगभरातील उत्कृष्ट छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांच्या समूहात ‘सकाळ’चा समावेश झाला आहे.
- जगभरातील 26 देशांतील 128 वृत्तपत्रांचा या स्पर्धेत सहभाग होता. भारतातून 31 वृत्तपत्रांचा सहभाग होता.
- प्रादेशिक भाषेत ‘सकाळ’ने हा मानाचा पुरस्कार मिळविला.
- आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्लब 2016 ते 2018 या वर्षासाठी एकूण 64 प्रकाशनांच्या 85 वृत्तपत्रांनी हे सदस्यत्व पटकावला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा