चालू घडामोडी (14 एप्रिल 2017)
राष्ट्रपती कडून साक्षी मलिक, दीपा कर्माकरला पद्मश्री प्रदान :
- प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे 13 एप्रिल रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
- ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला.
- राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. जानेवारीमध्ये या पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती.
- पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे 89 जणांना पुरस्कार घोषित करण्यात आले होते. यात 19 महिला आणि 70 पुरुषांचा समावेश होता.
- कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी “ऑपरेशन दुर्गा” ही मोहिम सुरू :
- महिलांच्या सुरक्षिततेसाठी हरियाना सरकारने महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी “ऑपरेशन दुर्गा” ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत 72 जणांना ताब्यात घेतले आहे.
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांची छेडछाड करणाऱ्या रोमिओंविरूद्ध कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतून प्रेरित होऊन इतर काही राज्यांतही महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
- हरियाणामध्ये ‘ऑपरेशन दुर्गा’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी 24 भरारी पथकांची स्थापना केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
निबंध स्पर्धेत ऐश्वर्या सुतार हिचा देशात प्रथम क्रमांक :
- भारत सरकारच्या समाजकल्याण खात्यातर्फे लखनौ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस संचालित गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या सुनील सुतार हिने देशात प्रथम क्रमांक पटकाविला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या हस्ते तिचा दिल्ली येथे गौरव होणार आहे. गरीब कुटुंबातून आलेल्या ऐश्वर्याने मिळवलेल्या यशामुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
- भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर निबंध स्पर्धा घेतली जाते. मानाची असलेल्या या स्पर्धेत देशभरातील शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला होता.
हुलकावणी देणारा नेपच्यूनसारखा ग्रह सापडला :
- नेपच्यूनच्या आकाराचा हरवलेला ग्रह खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीपासून तीन हजार प्रकाशवर्षे अंतरावर सापडला आहे.
- नवीन ग्रहाचे नाव केप्लर 150 एफ असे असून त्याच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचे लक्ष गेले नव्हते, असे येल विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.
- संगणक अलगॉरिथमच्या मदतीने अनेक बाह्य़ग्रहांचा शोध लागला असून त्यात या ग्रहाचा समावेश आहे.
- काहीवेळा संगणकात काही गोष्टी दृष्टोत्पत्तीस येत नसत, त्यातून केप्लर 150 या ग्रहप्रणालीचा शोध लागला. हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून सूर्यापासून पृथ्वीचे जेवढे अंतर आहे त्यापेक्षा दूर आहे.
- केप्लर 150 एफ या ग्रहाला त्याच्या ताऱ्याभोवती फिरण्यास 637 दिवस लागतात. पाच किंवा आणखी ग्रहांच्या प्रणालीत एवढी लांब कक्षा कुणाचीच नाही. केप्लर मोहिमेत चार ग्रह सापडले असून त्यात केप्लर 150 बी, सी,डी व इ यांचा समावेश आहे. त्यांच्या कक्षा मात्र ताऱ्याच्या जवळ आहेत.
दिनविशेष :
- भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला.
- 14 एप्रिल 1950 हा भारतीय तत्त्वज्ञ श्री रमण महर्षी यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा