Current Affairs of 14 August 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2015)
पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांचा भारताचा दौरा :
- भारताशी होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनएसए) पातळीवरील चर्चेसाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहारासंबंधीचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ या चर्चेसाठी 23 ऑगस्ट रोजी भारताचा दौरा करतील.
- याविषयी नवी दिल्लीतून तारखेचा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर याबाबतची घोषणा झाली.
- भारताने नवी दिल्लीत 23-24 ऑगस्टला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अझीझ यांच्या दरम्यान बैठकीचा प्रस्ताव सादर केला होता.
Must Read (नक्की वाचा):
मॅगी नूडल्सवरील बंदी उच्च न्यायालयाने केली रद्द :
- मॅगी नूडल्सवर बंदी घालण्याचा सरकारचा आदेश आज उच्च न्यायालयाने रद्द केला.
- मात्र, मॅगीच्या उत्पादनांची पुन्हा चाचणी होईपर्यंत म्हणजे सहा आठवडेतरी त्यांना विक्रीची परवानगी मिळणार नाही.
- आता मॅगीच्या नऊ उत्पदनांचे प्रत्येकी पाच नमुने पंजाब, जयपूर व हैदराबाद येथील स्वतंत्र प्रयोगशाळांमध्ये (लॅबोरेटरी) तपासणीसाठी पाठवावे लागतील.
- त्यात मॅगी उत्तीर्ण झाली तरच त्यांना पुन्हा उत्पादन आणि विक्री सुरू करण्याची परवानगी मिळेल.
- मॅगीच्या नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण ठरलेल्या मानकांपेक्षा जास्त असल्याचे कारण देऊन ही बंदी लादण्यात आली होती.
- फूड सेफ्टी स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने पाच जून रोजी ही बंदी लादली होती.
- मॅगीच्या विविध प्रकारच्या नऊ उत्पादनांवर ही बंदी लादण्यात आली होती.
ट्विटरच्या “डायरेक्ट मेसेज सर्व्हिस”च्या कॅरॅक्टर मर्यादेत वाढ :
- जगातील आघाडीची मायक्रोब्लॉगिंग साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरच्या “डायरेक्ट मेसेज सर्व्हिस”च्या (डीएमएस) कॅरॅक्टर मर्यादेत आज मोठी वाढ करण्यात आली आहे.
- आता ही मर्यादा 140 कॅरेक्टरवरून दहा हजारांवर नेण्यात आली आहे.
- यामुळे युजर्सना त्यांच्या मित्रांना खासगी संदेश पाठविणे सहज शक्य होईल.
- “डायरेक्ट मेसेज सर्व्हिस लिमिटलेस” असावी म्हणून हा बदल करण्यात आला आहे.
- तत्पूर्वी जून महिन्यामध्येच कंपनीने कॅरॅक्टर लिमिटच्या मर्यादेत वाढ करण्याची घोषणा केली होती.
आधार कार्ड असलेच पाहिजे अशी कोणतीही सक्ती नाही :
- केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असलेच पाहिजे, अशी कोणतीही सक्ती नाही असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 11 ऑगस्ट रोजी दिला आहे.
- तसेच “आधार कार्ड आवश्यक आहे परंतु सक्तीचे नाही” हे सामान्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
- एका याचिकेद्वारे आधार कार्ड आणि व्यक्तीच्या खासगीपणाच्या मूलभूत हक्कालाच न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होते.
- या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्या. जे. केलामेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने आधार कार्ड सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले.
उत्तराखंडमध्ये प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी :
- उत्तराखंडमधील नदीकिनाऱ्याच्या भागात प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे.
- गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आणि सभोवतालच्या परिसरातील प्लॅस्टिक प्रदूषणाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- भाविक आणि पर्यटक पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन येथे येतात, आणि नदीकिनारी फेकून देतात.
- हा प्लॅस्टिक कचरा नदी पात्रातच राहतो, त्यामुळे नदीची मोठ्या प्रमाणावर हानी होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिनविशेष :
- पाकिस्तान स्वातंत्र्य दिन
- पेराग्वे ध्वज दिन
- 1921 : तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना.
- 1947 : पाकिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- 1971 : बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- 2006 : इस्रायेल व लेबेनॉनमध्ये युद्धबंदी लागू.