चालू घडामोडी (14 डिसेंबर 2016)
प्रियंका चोप्राची ‘युनिसेफ’ची अॅम्बेसेडरपडी निवड :
- बॉलिवूडमध्येच नाही तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावरही ठसा उमटवला आहे.
- ‘युनिसेफ’ची ग्लोबल गुडविल अॅम्बेसेडर अर्थात जागतिक सदिच्छादूत म्हणून प्रियांकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
- फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि बारा वर्षीय ब्रिटीश अभिनेत्री मिली बॉबी ब्राऊन यांनी प्रियांकाच्या नियुक्तीची घोषणा केली.
वन संरक्षणाकरिता नवीन हेल्पलाइन :
- राज्यातील वने आणि वन्यजिवांचे संरक्षण आणि संवर्धन, याबरोबरच वनिकी क्षेत्रांशी निगडित सर्वसामान्य जनतेला प्रश्न, अडचणी, तसेच तक्रारी यांच्या निराकरणाकरिता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘हॅलो फॉरेस्ट-1926’ ही नवीन टोलफ्री हेल्पलाइन जनसामान्यांच्या सेवेत रूजू करण्यात येत आहे.
- तसेच या पूर्वी याच सेवेकरिता 155364 आणि 1800225364 अशा दोन टोल फ्री हेल्पलाइन सुरू आहेत.
- ‘हॅलो फॉरेस्ट-1926’ या हेल्पलाइनच्या माध्यमातून एकूण 4 सेवा क्षेत्रे निश्चित करण्यात आल्या आहेत.
- तत्काळकरिता हॅलो फॉरेस्ट-1926-0 अंतर्गत वन वणवा, अवैध वृक्षतोड, अतिक्रमण, वन्यजीव शिकार, अवैध चराई, रहिवासी क्षेत्रात वन्यजीव वावर आणि गोपनीय माहिती यांचा समावेश आहे.
- हरितसेना व हरित महाराष्ट्र अभियानाकरिता हॅलो फॉरेस्ट-1926-1 अंतर्गत वनीकरण, सामाजिक वनीकरण आणि रोपवने यांचा समावेश राहणार आहे.
- निसर्ग पर्यटन सेवेकरिता हॅलो फॉरेस्ट-1926-2 अंतर्गत व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये, अतिथीगृहे व विश्रामगृह आरक्षण यांचा समावेश राहाणार आहे.
हिंदकेसरी हितेंदरसिंहला ‘जनसुराज्य शक्ती श्री’चा किताब :
- वारणेच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात कुस्ती शौकिनांच्या अलोट गर्दीत हिंदकेसरी हितेंदरसिंहने (छात्रसाल आखाडा येथे) हिंदकेसरी रुबलसिंह (खन्ना आखाडा) याच्यावर 30 मिनिटांच्या बरोबरीनंतर (पॅसिव्ह) ताकीद गुणावर 2-1 ने मात करून ‘वारणा जनसुराज्य शक्ती श्री’ किताब पटकावला.
- तर जास्सा पट्टी (आखाडी पिद्दी, अमृतसर)ने महाराष्ट्राच्या किरण भगत (काका पवार तालीम) या मल्लावर अत्यंत अटीतटीच्या कुस्तीत हात लावून घिस्सा डावावर मात करीत ‘तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक संस्था शक्ती’ हा किताब पटकावला.
- दुसऱ्या क्रमांकाच्या ‘वारणा साखर शक्ती’ किताबाच्या कुस्तीत भारत केसरी कृष्णकुमार (सोनपत) व हिंदकेसरी जोगिंदरसिंह (चांदरूप आखाडा) यांच्यात झालेल्या लढतीत जोगिंदरसिंह जखमी झाल्याने कृष्णकुमारला विजयी घोषित करण्यात आले.
- ‘वारणा दूध संघ शक्ती’ किताबासाठी झालेल्या लढतीत हरियाणा केसरी भोलूने हिंदकेसरी सुनील साळोखे (खवसपूर) याच्यावर घुटना डावावर मात केली.
राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये शिवा थापाला सुवर्ण :
- राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकविजेता एल. देवेंद्रो सिंग (52 किलो) याला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या शिवा थापाने लाईटवेट (60 किलो) गटात राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच जेतेपदाचा (सुवर्ण) मान मिळविला.
- स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान एसएससीबीने (सेनादल) मिळविला. त्यांच्या बॉक्सर्सनी चार सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली.
- रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने (आरएसपीबी) दोन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य पदकांसह दुसरे स्थान पटकावले.
रोनाल्डो ठरला चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलर :
- पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो यंदाचा सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटू ठरला आहे.
- अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीला मागे टाकत ख्रिस्तियानो रोनाल्डोने बॅलन डी. ओर पुरस्कार चौथ्यांदा पटकावला आहे.
- फुटबॉलच्या सामन्यात 2016 मध्ये ख्रिस्तियाने रोनाल्डो यांने केलेल्या लक्षवेधक कामगिरीसाठी बॅलन डी. ओर या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले.
- संघ पोर्तुगालचा असो किंवा क्लब रिआल माद्रिदचा रोनाल्डो गोल करण्यात आघाडीवर आहे. त्यांने 2016 मध्ये पोर्तुगाल आणि क्लबसाठी 52 फुटबॉल सामन्यात 48 गोल केले आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा