चालू घडामोडी (14 जानेवारी 2017)
IPS अधिकारी शिवदीप लांडे यांची महाराष्ट्रात नियुक्ती :
- बिहारमधील कामगिरीमुळे ‘दंबग’ म्हणून ओळखले जाणारे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी (IPS) शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकामध्ये पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- वेशभूषा बदलून छुपे अवैध धंदे उघड करून अनेकवेळा कारवाया केल्याने लांडे यांचा धाक तिथे निर्माण झाला.
- बिहारमधील गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असलेल्या प्रांतात अनेक माफियांवर लांडे यांनी जरब बसवली होती.
- मराठी असून आपल्या कर्तृत्वामुळे लांडे हे बिहारी जनतेत लोकप्रिय अधिकारी बनले आहेत. यापूर्वी बदली होत असताना त्यांना निरोप देण्यासाठी रस्त्याच्या बाजूला लांबच लांब रांग लागली होती.
ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघ नव्या जर्सीत :
- भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघासाठी 2017 हे वर्ष अनेकअर्थाने सर्वकाही नवे असणार आहे.
- भारतीय वनडे संघाचा विराट कोहली हा नवा कर्णधार झाला असून, आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे.
- भारतीय संघासाठी नव्याने बनविण्यात नाईके या कंपनीने ‘4 डी क्युईकनेस’ आणि ‘झिरो डिस्ट्रॅक्शन्स’ यांचा वापर करण्यात आला आहे.
- इंग्लंडविरुद्धच्या आगमी तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे.
- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे, अश्विन व भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर या क्रिकेटपटूंचा नवीन जर्सीतील फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी 2015 मध्ये भारतीय संघाची जर्सी बदलण्यात आली होती.
ईपीएफओकडून ‘माफी योजना’ लागू :
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (ईपीएफओ) लाभ खासगी क्षेत्रातील कामगारांना व्हावा, म्हणून ईपीएफओने ठरावीक अटींवर कंपन्यांना एक संधी देत ‘माफी योजना’ घोषित केली आहे.
- तसेच या योजनेअंतर्गत ज्या कंपन्यांनी ईपीएफओच्या योजनेअंतर्गत कामगारांची नोंदणी केली नसेल, त्यांना तीन महिन्यांत केवळ एक रुपया दंड आकारून कर्मचारी नोंदणी करता येणार आहे.
- विभागीय कार्यालयाच्या उपायुक्त एस. कोमलादेवी यांनी सांगितले की, कामगारांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे. कारण नाममात्र म्हणून केवळ एक रुपया दंड आकारून कंपन्यांना त्यांच्या कामगारांची नोंदणी करण्याची संधी दिली जात आहे.
- 1 जानेवारी 2017 पासून या योजनेला सुरुवात झाली असून 31 मार्च, 2017 पर्यंतच कंपन्यांना ही संधी दिली जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ईपीएफओ कर्मचारी संघटनांसोबतही बैठक घेणार आहे.
- तसेच या योजनेतून प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना आणि प्रधानमंत्री परिधान प्रोत्साहन योजनेच्या फायद्यांबाबत जनजागृती करण्याचा मानस आहे.
- महत्त्वाची बाब म्हणजे नोंदणीस पात्र असलेले मात्र नोंदणीअभावी राहिलेल्या एप्रिल 2009 ते 1 जानेवारी 2017 दरम्यानच्या कामगारांची नोंदणी करण्याची संधीही कंपन्यांना देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेत नवीन सिमेन्स लोकल दाखल :
- पाच वर्षांनंतर मुंबईतील मध्य रेल्वेत सिमेन्स कंपनीची नवीन लोकल दाखल झाली आहे.
- सिमेन्स कंपनीची नवीन लोकल जानेवारी महिन्यात दाखल होणार होती. त्यानुसार लोकल दाखल झाल्यानंतर लवकरच सीएसटी ते कल्याण मार्गावर ही लोकल चालवण्याचे नियोजन आहे.
- सध्या मध्य रेल्वे मार्गावर 122 लोकलच्या दिवसाला जवळपास 1,600 फेऱ्या होतात.
- 122 लोकलपैकी 70 सिमेन्स बनावटीच्या बारा डब्यांच्या लोकल आहेत, तर उर्वरित लोकल या रेट्रोफिटेड आणि बीएचईएलच्या आहेत. आता या लोकलच्या ताफ्यात आणखी एक सिमेन्स कंपनीची लोकल दाखल झाली. आणखी दोन लोकल मार्चपर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल होतील.
दिनविशेष :
- 14 जानेवारी हा मकरसंक्रांत दिन म्हणून साजरा करतात.
- 14 जानेवारी 1926 हा ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका ‘महाश्वेतादेवी’ यांचा जन्मदिन आहे.
- मराठवाडा विद्यापीठाला 14 जानेवारी 1993 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
- एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांची 14 जानेवारी 1999 रोजी ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
MPSC World तर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा