चालू घडामोडी 14 जुलै 2015
सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात :
- सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंख आज (मंगळवार) पहाटे सहा वाजून 16 मिनिटांनी धर्मध्वजारोहणाने फुंकला गेल्यानंतर कुंभमेळ्याला सुरवात झाली.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण झाले.
मलाला युसुफझाईने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासित मुलींसाठी केली शाळा सुरू :
- नोबेल पुरस्कार मिळवणारी जगातील सर्वांत लहान वयाची व्यक्ती ठरलेल्या मलाला युसुफझाई हिने आपला अठरावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
- हा वाढदिवस तिने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासितांबरोबर साजरा करत तेथील मुलींसाठी शाळा सुरू केली आहे.
- द मलाला फंड या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शाळा सीरियाच्या सीमेनजीक असलेल्या लेबनॉनमधील निर्वासितांच्या छावणीत सुरू झाली आहे.
- या शाळेचा सर्व खर्च मलालानेच सुरू केलेल्या द मलाला फंड उचलणार आहे.
- तसेच या शाळेमध्ये 14 ते 18 या वयोगटातील दोनशे मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सची अवकाश वाहनातून उड्डाणासाठी निवड :
- नासाच्या पहिल्या व्यावसायिक अवकाश वाहनातून उड्डाणासाठी चार अवकाशयात्रींची निवड करण्यात आली असून त्यात भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स हिचा समावेश करण्यात आला आहे.
- सुनीता विल्यम्स हिच्याबरोबर रॉबर्ट बेनकेन, एरिक बो व डग्लस हर्ले यांची निवड झाली असून त्यांना व्यावसायिक उड्डाणासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
- खासगी क्षेत्राने तयार केलेल्या अवकाश वाहनातून हे अवकाशयात्री अंतराळात जातील.
- पृथ्वीनिकटच्या कक्षेत सामान घेऊन जाण्यासाठी हे वाहन उपयोगी पडणार असून 2030 पर्यंत मंगळावर जाण्याचे उद्दिष्ट गाठण्याची ती पहिली पायरी मानली जात आहे.
- तसेच हे चारही अवकाशयात्री बोईंग कंपनी व स्पेस एक्स यांच्याबरोबर काम करणार आहेत.
‘तिआनहे-2’ हा महासंगणक लागोपाठ पाचव्यांदा जगातील सर्वात वेगवान संगणक ठरला :
- चीनचा ‘तिआनहे-2’ हा महासंगणक लागोपाठ पाचव्यांदा जगातील सर्वात वेगवान संगणक ठरला आहे.
- फ्रँकफर्ट येथे घेण्यात आलेल्या सुपरकॉम्प्युटिंग विषयावरील परिषदेच्या वेळी या महासंगणकाने 2013 पासून पाचव्यांदा जगातील वेगवान महासंगणक म्हणून मान मिळाला आहे.
- चांगसा येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी या संस्थेने हा महासंगणक तयार केला असून 2013 मध्ये हा महासंगणक ग्वांगझाऊ येथील नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर येथे हलवण्यात आला आहे.
-
वायुप्रदूषणाची अचूक माहिती मिळणार आता एका कॉलवर :
- वाढत्या वायुप्रदूषणाची अचूक माहिती मुंबईकरांना देण्यासाठी आता एका कॉलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- मुंबई शहर-उपनगरातील कोणत्याही भागातील वायुप्रदूषणाची मात्रा सामान्यांना टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
- ही सेवा येत्या 10 दिवसांत मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे.
- यापूर्वी पुणे, दिल्ली शहरांत ही सेवा 2013 पासून सुरू झाली आहे.
- भारतीय भू विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, प्रादेशिक हवामान खाते (पुणे) यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
दिनविशेष :
- 1856 – थोर समाजसेवक गोपाळ गणेश आगरकर यांचा सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी जन्म.