Current Affairs of 14 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 जुलै 2016)

‘स्मार्ट ग्रीड’मध्ये महाराष्ट्र आघाडीवर :

  • ग्राहकांना वीजपुरवठा करताना स्मार्ट सोल्युशनचा वापर असलेला ‘स्मार्ट ग्रीड’ प्रकल्प राबविण्याची तयारी महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
  • इंटरनेटच्या मदतीने वीज यंत्रणा आणि ग्राहकांचा संवाद घडवून आणण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.
  • राज्यात या प्रकल्पासाठी अमरावतीची निवड झाली आहे, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
  • अमरावतीत औद्योगिक, घरगुती, वाणिज्यिक असे संमिश्र स्वरूपाचे सुमारे दीड लाख ग्राहक आहेत.
  • महत्त्वाचे म्हणजे ‘स्काडा’ आणि ‘रिस्ट्रक्‍चर एक्‍सेलरेटेड डेव्हलपमेंट पॉवर रिफॉर्म प्रोग्रॅम’ (आरएडीपीआरपी) हे दोन प्रकल्प या ठिकाणी आधीच राबविण्यात आले आहेत.
  • केंद्रीय ऊर्जा विभागानेही हे प्रकल्प ज्या ठिकाणी राबवले असतील तेथेच ‘स्मार्ट ग्रीड’ प्रकल्प राबवावा असे ठरवले आहे.
  • तसेच ‘नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन’नुसार हा प्रकल्प राबविण्यात येईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जुलै 2016)

29 जुलै रोजी सर्व बँकांचा संप :

  • सरकारच्या जनविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील बँक कर्मचारी 29 जुलै रोजी संपावर जाणार आहेत.
  • तसेच ऑल इंडिया बँक एम्प्लॉयीज असोसिएशनने (एआयबीईए) ही माहिती दिली.
  • युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या शिखर संघटनेच्या झेंड्याखाली हा संप होणार आहे. या शिखर संघटनेत 10 लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी आहेत.
  • सरकारी बँकांतील आपले समभाग विकून त्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला बँक संघटनांचा विरोध आहे.
  • ऑल इंडिया बँक एम्प्लॉयीज असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी एका निवेदनात सांगितले की, क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांचे खाजगीकरण, बँकांचे विलिनीकरण आणि पुनर्गठन या निर्णयांनाही संघटनांचा विरोध आहे.

हैदराबादमध्ये सानिया मिर्झाच्या आत्मचरित्राचे प्रकाशन :

  • भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या आत्मचरित्राचे नुकताच हैदराबाद येथे प्रकाशन झाले.
  • विशेष म्हणजे बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्याने सानियाचा आनंद द्विगुणीत झाला होता.
  • सानियाचे वडिल इमरान मिर्झा यांनी तीच्या ‘ऐस अगेन्स्ट ऑड्स’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाची माहिती देताना सांगितले की, मागील आठवड्यात प्रकाशित झालेल्या या पुस्तकामध्ये तीच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि यशाच्या आलेखाचा समावेश आहे.
  • तसेच या पुस्तकामध्ये योगदान दिलेल्या इमरान मिर्झा यांनी सांगितले की, ‘पुस्तक लिहिण्याचा विचार सानियाचे होते आणि हे पुर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला.’
  • हे पुस्तक सानियाचे असून यामध्ये तीच्या आयुष्यातील घडामोडींचा आणि तीने पटकावलेल्या पुरस्कारांच्या माहितीचा समावेश आहे.

भारतीय हवाई दलाकडून ‘ऑपरेशन संकट मोचन’ :

  • दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या 600 नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी (दि.13) दोन सी-17 विमाने पाठविणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.
  • तसेच या मोहिमेला ‘ऑपरेशन संकट मोचन’ असे नाव देण्यात आले आहे.
  • भारतीय हवाई दलाच्या या मोहिमेमध्ये विमानांमध्ये मदत साहित्यही पाठविणार असल्याचे सांगण्यात आले.
  • दक्षिण सुदानमध्ये सरकार समर्थक व विरोधक गटांमध्ये संघर्ष वाढला असून, त्याचे पर्यवसान हिंसेमध्ये होत आहे.
  • अशी आहे योजना –
  • ‘ऑपरेशन संकट मोचन’ संदर्भात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी हवाई दलाची चर्चा.
  • त्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने दक्षिण सुदानमध्ये हवाई दल दोन विमाने पाठवीत असून, आवश्‍यकता असल्यास आणखी विमाने पाठविणार असल्याचे स्पष्ट केले.
  • ‘ऑपरेशन संकट मोचन’चे परराष्ट्र राज्य मंत्री जनरल व्ही. के. सिंह नेतृत्व करतील.
  • सिंह दो सी-17 विमानांसमवेत (दि.13) दक्षिण सुदानची राजधानी जुबाला रवाना.
  • तसेच तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष पथकही बनविले आहे.

महिलांसाठी पिंक ऑटो सेवा सुरु :

  • गाझियाबाद शहरात रात्रच्यावेळी महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यादृष्टीकोनाने पिंक ऑटो रिक्षा सुरु करण्यात करण्यात आली आहे.
  • तसेच या पिंक ऑटो रिक्षा योजनेला पोलिसांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर पहिल्या टप्प्यात 20 पिंक रिक्षा रस्त्यावर उतरल्या आहेत.
  • शहरात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी पोलिसांनी या पिंक रिक्षा सेवेला मंजूरी दिली आहे.
  • आता पिंक रिक्षा योजना फक्त ट्रान्स हिंडन परिसरात सुरु करण्यात आली आहे.
  • जर ही योजना यशस्वी झाली तर यामध्ये आणखी रिक्षांचा समावेश करण्यात येणार, असे पोलीस अधीक्षक के.एस. इमानुएल यांनी सांगितले.

इंग्लंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान थेरेसा मे :

  • थेरेसा मे यांच्या रुपाने इंग्लंडला दुसऱ्या महिला पंतप्रधान लाभल्या आहेत.
  • आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गारेट थॅचर यांनी 80 चे दशक आपल्या कणखर भूमिकेमुळे गाजवले होते.
  • आता थेरेसा यांच्याकडेही नव्या मार्गारेट थॅचर म्हणूनच पाहिले जाते. थेरेसा यांची तुलना यापूर्वीपासूनच मार्गारेट थॅचर यांच्याशी केली जाते.
  • थेरेसा मे या पंतप्रधान झाल्यामुळे जर्मनीबरोबर युरोपातील आणखी एका महत्वाच्या देशाचे प्रतिनिधित्व महिलेकडे गेले आहे.
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी हिलरी क्लिंटन निवडून आल्या तर तीन मोठ्या आर्थिक सत्तांची सूत्रे महिलांकडे असण्याचा अभूतपूर्व योग पाहायला मिळेल.
  • थेरेसा यांचे पंतप्रधानपदी येणे आणखी वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नेमलेल्या त्या 13 व्या पंतप्रधान आहेत.

दिनविशेष :

  • 1856 : गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक यांचा जन्म.
  • 1920 : शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 जुलै 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago