Current Affairs (चालू घडामोडी)

Current Affairs of 14 July 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 जुलै 2018)

दुर्गम भागांतील रुग्णांना मिळणार अद्ययावत सेवा :

  • औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची वानवा पाहता शहराकडे धावणाऱ्या गरजू रुग्णांची पळापळ आता थांबणार आहे.
  • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या वतीने (एनआरएचएम) जिल्ह्यातील दुर्गम भागांत सात प्राथमिक अद्ययावत आरोग्य केंद्रांच्या उभारणीला मंजुरी मिळाली आहे.
  • सोयगाव तालुक्‍यातील सावळदबारा व जरंडी या दुर्गम भागांसह औरंगाबाद तालुक्‍यातील चौका, फुलंब्री तालुक्‍यातील पिंपळगाव, खुलताबाद तालुक्‍यातील बाजारसावंगी, गंगापूर तालुक्‍यातील सिद्धनाथ वडगाव, तर सिल्लोड तालुक्‍यातील भराडी येथील आरोग्य केंद्रांची दुरवस्था झाल्याने रुग्णांना शहराची वाट धरण्याशिवाय पर्याय नव्हता.
  • आरोग्यसेवेचे आयुक्त व अभियानाच्या संचालकांनी दिलेल्या पत्रात या सात आरोग्य केंद्रांसाठी प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत 37.25 कोटींचा प्रस्ताव एनआरएचएममधून केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला होता.
  • तसेच त्यातील पहिल्या टप्प्यात पाच कोटी 83 लाखांचा निधी 2018-19 साठी अंशतः मंजूर झाला आहे. या केंद्रावरील मनुष्यबळासाठी परिसरातच निवासस्थाने उभारण्याचे नियोजन प्रस्तावात असून, प्राथमिक आरोग्य केंद्रही अद्ययावत असेल. त्यामुळे रुग्ण, कर्मचाऱ्यांना सोयीचे होणार असल्याचे जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जुलै 2018)

नॅटवेस्टच्या विजयाचा शिल्पकार मोहम्मद कैफ क्रिकेटमधून निवृत्त :

  • भारताचा फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफने सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने तब्बल 12 वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
  • योगायोगची गोष्ट म्हणजे 2002 साली झालेल्या ऐतिहासिक नॅटवेस्ट मालिकेला 16 वर्षे पूर्ण झाली. या मालिकेत इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी दमदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता.
  • कैफ नेहमी त्याने नॅटवेस्ट मालिकेत लॉर्ड्सवर केलेल्या 87 धावांसाठी लोकांच्या स्मरणात राहील. या मालिकेतील विजयानंतर गांगुलीने टी-शर्ट काढून विजय साजरा केला होता ज्याची देशभर फार चर्चा झाली होती.
  • या विजयाला 16 वर्षे पूर्ण होत असतानाच कैफने निवृत्तीची घोषणा केली. 37 वर्षीय कैफने 13 कसोटी आणि 125 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सी.के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांना इमेलद्वारे निवृत्तीचा निर्णय कळवला.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी :

  • भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी चीनचे जॅक मा यांना श्रींमतीमध्ये मागे टाकले आहे. जॅक मा हे अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आहेत.
  • मागच्या दोन दिवसात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने दोन महत्वाचे टप्पे गाठले आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बाजारातील भांडवली हिस्सा 100 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला तर दुसऱ्या बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मुल्य सात लाख कोटीच्या पुढे गेले. आता स्वत:हा मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.
  • मुकेश अंबानी यांनी याआधी सुद्धा चिनी उद्योगपतीवर मात केली आहे. यापूर्वी त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये अंबानी यांनी हुई का यान या चिनी उद्योगपतीला श्रीमंतीमध्ये मागे टाकले होते. तेलापासून ते मोबाईलपर्यंत मुकेश अंबांनी यांच्या कंपन्यांचे साम्राज्य विस्तारलेले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे.

विनायक सामंत मुंबई रणजी संघाचे नवीन प्रशिक्षक :

  • मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी माजी यष्टीरक्षक फलंदाज विनायक सामंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनने विल्कीन मोटा यांची मुंबईच्या 19 वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे.
  • आगामी रणजी हंगामापर्यंत विनायक सामंत मुंबईचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर एमसीएचे सह सचिव उन्मेश खानविलकर यांनी सामंत व विल्कीन मोटा यांच्या नेमणूकीबद्दलची घोषणा केली आहे.
  • माजी प्रशिक्षक समीर दिघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जागा रिक्त होती. विनायक सामंत यांनी राजस्थानचे माजी खेळाडू प्रदीप सुंदरम आणि मुंबईचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांच्यावर मात करत मानाचे प्रशिक्षकपद मिळवले आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाचा मोठा दबदबा आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेचे सर्वाधीक वेळा विजेतेपद मुंबईने पटकावले आहे.

देशातील 89 टक्के कर्मचारी तणावग्रस्त :

  • जगातील प्रगत राष्ट्रांचा विचार केला आणि त्यांच्याशी तुलना केली तर भारतातील 89 टक्के कर्मचारी तणावग्रस्त आहेत अशी माहिती समोर आली आहे.
  • अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, ब्राझिल, इंडोनेशिया या देशांतील कर्मचाऱ्यांपेक्षा भारतातले 89 टक्के कर्मचारी तणावग्रस्त असल्याचा एक अहवाल समोर आला आहे.
  • विमा क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या सिग्नाने हे सर्वेक्षण समोर आणले आहे. सिग्ना 360 च्या सर्वेक्षण अहवालात 89 टक्के भारतीय कर्मचारी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
  • भारतात तणावाखाली असण्याची दोन प्रमुख कारणे आहेत त्यापैकी पहिले कारण आहे कामाच्या ठिकाणी असलेला दबाव आणि दुसरे कारण आहे ते म्हणजे आर्थिक चणचण. या दोन कारणांमुळे भारतातील 89 टक्के कर्मचारी तणावाखाली काम करतात असेही या सर्वेक्षणात समोर आले आहे. जगाच्या तुलनेत भारतातले कर्मचारी जास्त तणावात काम करतात.

दिनविशेष :

  • थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी झाला.
  • महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म 14 जुलै 1884 मध्ये झाला.
  • सन 2003 या वर्षी जागतिक बुद्धिबळ महासंघ व्दारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
  • डाकतार विभागाची 163 वर्षांपासूनची तार सेवा 14 जुलै 2013 मध्ये बंद झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 जुलै 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago