चालू घडामोडी (14 जून 2018)
चिपळूण पालिका मुख्याधिकारीपदी डॉ. वैभव विधाते :
- चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून डॉ. वैभव विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- 2012 मध्ये ते मुख्याधिकारी म्हणून शासनसेवेत रुजू झाले. यापूर्वी ते जव्हार नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते.
- तसेच डॉ. पंकज पाटील यांच्या जागी आता डॉ. वैभव विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भार हलका करण्यास आता समूह विद्यापीठे :
- राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढती संख्या तसेच सरकारी विद्यापीठांवर वाढलेल्या संलग्न महाविद्यालयांचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकार समूह विद्यापीठ कायदा आणणार आहे. यामध्ये मोठा विस्तार असणाऱ्या अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांनाही ‘क्लस्टर युनिर्व्हर्सिटी‘ होण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
- राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत तीन सरकारी महाविद्यालयांना समूह विद्यापीठ करण्यास मान्यता मिळाली आहे; परंतु त्यासाठी या विद्यापीठाचा कायदा करावा लागेल. या कायद्यात केवळ सरकारी महाविद्यालयांना समूह विद्यापीठ म्हणून मान्यता देण्याबरोबरच ही संधी अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांनादेखील द्यावी, यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे एकमत झाले आहे. त्यादृष्टीने विधेयक तयार करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
- सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधेयकाच्या कच्च्या आराखड्यावर काम झाले आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने म्हणाले, “मुंबई महाविद्यालयांचे समूह विद्यापीठाचे प्रस्ताव मान्य झाले आहेत. त्यांना ‘रुसा’कडून निधीदेखील मिळणार आहे. संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या, विद्यापीठांचा विस्तार याचा विचार करता अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांचे समूह विद्यापीठ करण्यासंबंधी शासन धोरण निश्चित करीत आहे.”
आता संपूर्ण आर्थिक नियोजन केवळ एका मिस्ड कॉलवर :
- कोणत्याही वित्तीय योजनांची विक्री न करता, अर्थ नियोजनविषयक शुद्ध सल्ला आणि अर्थसाक्षरता प्रसारातील सर्वात मोठी कंपनी ‘इंडियनमनी डॉट कॉम‘ने आता केवळ मिस्ड कॉल करून हवे ते अर्थविषयक मार्गदर्शन विनामूल्य मिळविण्याची सोय सर्वसामान्यांना उपलब्ध केली आहे.
- मूळात वित्तीय योजनांसंबंधी अल्पसमज, त्यातच वित्तीय सेवा क्षेत्रात विक्रेत्या-वितरकांकडून गैरमार्गाचा अवलंब आणि दिशाभूल होऊन चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतविला जाण्याने होणारे नुकसान खूप मोठे आणि प्रसंगी कधीही भरून न निघणारे असते.
- पैसा कष्टाने कमावला जातो, त्याचा विनियोग खर्च, बचत, गुंतवणूक आणि उधार अशा मार्गाने केला जातो, या चार विनियोगाच्या पद्धती कशा हाताळल्या जातात, त्यावरून त्या व्यक्तीचे आर्थिक फलित निश्चित होत असते, असे इंडियन मनी डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्याधिकारी सी.एस. सुधीर यांनी स्पष्ट केले.
- कंपनीने ‘वेल्थ डॉक्टर’ नावाचे प्ले स्टोअरवरून विनामूल्य डाऊनलोड करता येणारे मोबाइल अॅपही प्रस्तुत केले आहे. अथवा वित्तविषयक समस्या किंवा विमा, म्युच्युअल फंड, बँक खाते, कर्ज खाते, ठेवी, समभाग अथवा स्थावर मालमत्तेसंबंधी कोणत्याही प्रश्नांचे निराकरण इच्छुक थेट ‘वेल्थ डॉक्टर‘शी संवाद साधून करून शकतील.
गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा विद्यार्थांना सल्ला :
- एकच मूल जन्माला न घालता तरुणांनी किमान दोन मुले जन्माला घालावीत, असा सल्ला गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. एकीकडे सरकार कुटुंब नियोजनासाठी देशव्यापी कार्यक्रम राबवत असतानाच, सिन्हा यांनी हा सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
- केएलई अॅकॅडमीच्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तरुणांनी किमान दोन मुलांना जन्माला घालावे. घरात दोन मुले असतील तर लहानपणापासूनच त्यांना दोघांमध्ये वस्तू वाटून घेण्याची समज येते, असे त्या म्हणाल्या. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही, तसेच आयुष्यभर जोडीदाराची काळजी घेण्याची शपथ त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
दिनविशेष :
- 14 जून हा दिवस ‘जागतिक रक्त दाता दिन‘ म्हणून पाळला जातो.
- भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निळकंथा सोमायाजी‘ यांचा जन्म 14 जून 1444 मध्ये झाला.
- महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम‘ ही संस्था 14 जून 1896 मध्ये स्थापन केली.
- भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची ‘वेव्हेल योजना‘ 14 जून 1945 रोजी जाहीर झाली होती.
- ए.सी. किंवा डी.सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ 14 जून 2001 मध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा