Current Affairs of 14 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 मे 2016)

आयसीसीच्या क्रिकेट समितीवर राहुल द्रविडची निवड :

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांची क्रिकेट समितीवर निवड केली.
  • तसेच या समितीच्या कार्याध्यक्षपदी अनिल कुंबळेची फेरनिवड करण्यात आली.
  • आयसीसीने (दि.13) प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे निर्णय जाहीर केले. या समितीत ऍण्ड्रयू स्ट्रॉस, केविन ओब्रायन आणि डॅरेन लीमन यांचाही समावेश आहे.
  • द्रविडने श्रीलंकेच्या कुमार संगकारा, तर जयवर्धने याने मार्क टेलर यांची जागा घेतली.
  • तीन वर्षांचा कालावधी संपल्यामुळे भारताच्या एल. शिवरामकृष्णन हेदेखील समितीतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी टीम मे यांची निवड करण्यात आली.
  • खेळाडूंच्या बरोबरीने रिचर्ड केटलबोरोघ आणि स्टिव्ह डेव्हिस या पंचांचीदेखील पंच प्रतिनिधी म्हणून या समितीत निवड करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मे 2016)

देशातील पहिले बौद्धिक संपदा धोरण मंजूर :  

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने सृजनात्मकता, नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) धोरणाला मंजुरी दिली.
  • राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकाराचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक लाभ समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवत जागरूकता निर्माण करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी (दि.12) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत माहिती देताना सांगितले.
  • तसेच त्यांनी या धोरणाची सात उद्दिष्ट्येही स्पष्ट केली.
  • 2017 पर्यंत ट्रेडमार्क नोंदणीची मुदत केवळ एक महिन्यासाठी राहील.
  • बौद्धिक संपदेच्या प्रत्येक स्वरूपाची माहिती देतानाच त्यासंबंधी नियम आणि संस्थांमधील समन्वयाचा ताळमेळ राखण्यावर भर दिला जाईल.
  • तसेच या धोरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासह प्रोत्साहनासाठी कठोर आणि प्रभावी कायद्याच्या अंमलबजावणीची गरज राहील.
  • धोरणांचे उल्लंघन केले जात असेल तर त्याला तोंड देण्यासाठी अंमलबजावणी व न्यायप्रणालीला बळकटी देण्याचा उद्देशही समाविष्ट असेल.

गोव्यातील कारागृह होणार पर्यटन स्थळ :

  • गोव्याच्या अग्वादा येथील ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृह आता केवळ कैद्यांचे घर राहणार नाही.
  • तसेच या कारागृहाचे पर्यटन स्थळात रूपांतर केले जाणार आहे.
  • राज्य पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या कारागृहात मोठा बदल केला जाणार आहे.
  • 30 मे 2015 पासून हे कारागृह कैद्यांचे आवास राहिलेले नाही.
  • सर्व कैद्यांना नव्या कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे.
  • तसेच या कारागृहाचे हिमाचल प्रदेशच्या धागशाई कारागृह आणि अंदमानच्या सेल्युलर कारागृहाप्रमाणेच संग्रहालयात रूपांतर केले जाईल.
  • धागशाई कारागृह आणि अंदमानचे सेल्युलर कारागृह ही ब्रिटिश काळातील कारागृहे आहेत.

दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी अतुलचंद्र कुलकर्णी :

  • दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.
  • नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली.
  • नवी मुंबईचे विद्यमान आयुक्त प्रभात रंजन यांना पदोन्नती देऊन विधी आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक म्हणून, तर पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या महासंचालकपदावर विष्णू देव मिश्रा यांना पदोन्नती देण्यात आली.
  • राज्य पोलिस दलातील विशेष पोलिस महानिरीक्षकांपासून महासंचालक दर्जाच्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने (दि.13) जाहीर केल्या.
  • विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या दिल्लीत झालेल्या प्रतिनियुक्तीनंतर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट अपेक्षित होते.
  • मुंबईसह राज्य पोलिस दलात काही दिवसांत आणखी काही बदल्या अपेक्षित आहेत.
  • ‘एटीएस’चे सध्याचे प्रमुख विवेक फणसळकर यांची लाचलुचपत विरोधी पथकाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राज्य पोलिस महासंचालक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक के. एल. बिष्णोई यांची पोलिस गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदावर नियुक्ती झाली आहे.

निरंकारी संप्रदायाचे प्रमुख हरदेवसिंग यांचे निधन :

  • आध्यात्मिक नेते व निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंग (वय 62 वर्ष) यांचे कॅनडात माँट्रियल येथे (दि.13) अपघाती निधन झाले.
  • बाबा हरदेव सिंग हे कारने प्रवास करीत असताना (दि.13) भारतीय वेळेनुसार पहाटे 5 च्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. ते कॅनडामध्ये आध्यात्मिक बैठका घेण्यासाठी गेले होते.
  • टोरोंटोमध्ये जून महिन्यात दुसरे निरंकारी आंतरराष्ट्रीय संगम आयोजित करण्यात आले आहे.
  • बाबा हरदेव सिंग हे ‘निरंकारी बाबा’ या नावाने ओळखले जात. तसेच ते निरंकारी मिशनचे प्रमुख होते.
  • 1980 मध्ये त्यांनी त्यांचे वडील गुरुबचन सिंग यांची हत्या झाल्यानंतर मिशनच्या प्रमुख पदाची जबाबदारी घेतली होती.

जगातील सर्वांत मोठे कार्गो विमान भारतात दाखल :

  • जगातील सर्वांत मोठे कार्गो विमान ‘आंतोंनोव्ह एन – 225 मिर्या’ भारतात दाखल झाले असून, हैदराबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे लॅंडिंग झाले.
  • अवाढव्य आकारमान असणाऱ्या या विमानाची इंजिने देखील तितकीच शक्तिशाली आहेत.
  • सहा टर्बोफॅन इंजिनांचा समावेश असणारे हे जगातील एकमेव विमान असून त्याचे उड्डाणाप्रसंगीचे कमाल वजन हे 640 टन एवढे आहे.
  • सामान्य विमानांच्या तुलनेत या कार्गो जेटच्या पंखांचा विस्तारदेखील मोठा आहे.
  • वजनदार वस्तू आणि माल घेऊन दूरपर्यंत प्रवास करण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो.

    तुर्केमिनिस्तानमधून हे विमान हैदराबादेत दाखल झाले आहे.

  • मध्यंतरी अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या कंपनीने मागील महिन्यामध्ये युक्रेनमधील अँटोनिक कंपनीसोबत रणनितीक करार केला होता.
  • यान्वये विमानांची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या साधनांची जुळवाजुळव, विमानांची देखभाल आणि त्यांच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
  • ‘रिलायन्स डिफेन्स’ आणि ‘आंतोंनोव्ह’ या दोन कंपन्या हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड (एचएएल) या कंपनीसोबत मिळून 50 ते 80 एवढी आसनक्षमता असणाऱ्या विमानांची निर्मिती करणार आहेत.

दिनविशेष :

  • 1657 : धर्मवीर संभाजीराजे यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला.

  • 1982 : ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मे 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago