Current Affairs of 14 October 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (14 ऑक्टोबर 2016)
पंजाबी विश्व साहित्य संमेलन पुण्यात होणार :
- गुरू गोविंदसिंग यांच्या 350व्या जयंतीचे निमित्त साधून पुण्यात ‘पंजाबी विश्व साहित्य संमेलन’ 18 ते 20 नोव्हेंबर असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे.
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाचे मुख्य पुरस्कर्ते आहेत.
- प्रख्यात पंजाबी कवी डॉ. सुरजित पट्टर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.
- पुण्याच्या ‘सरहद’ या संस्थेने या संमेलनासाठी पुढाकार व आयोजनाची जबाबदारी घेतली आहे.
Must Read (नक्की वाचा):
स्वच्छतेच्या जनआंदोलनामुळे महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर :
- लोकसहभागातून स्वच्छतेचे जनआंदोलन उभे राहिल्यामुळेच महाराष्ट्रातील 100 शहरे हागणदारीमुक्त झाली असून हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
- स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांचा प्रातिनिधिक सत्कार सभारंभ नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे पार पडला.
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हागणदारीमुक्त शहरांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
- तसेच या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे जगातील मोठी अर्थव्यवस्था बनणारा आणि मंगळावर यान पाठविणारा अशी भारताची ओळख बनत असताना नागरिकांना उघड्यावर शौचास बसावे लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली.
- राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले आणि अवघ्या दीड वर्षात राज्यातील 100 शहरे हागणदारीमुक्त झाली.
- स्वच्छतेसाठी लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या जनआंदोलनामुळेच हे शक्य झाले आहे.
बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर :
- अमेरिकन गायक बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
- बॉब डिलन यांनी अमेरिकी गायन संस्कृतीत नवे काव्य निर्माण केले असून, त्यांच्या त्या काव्यासाठीच त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- बॉब डिलन हे 75 वर्षांचे असून, 1941 साली त्यांचा जन्म रॉबर्ट अलेन झिमरमनमध्ये झाला.
- डिलन यांनी मिनेसोटा इथल्या कॉफी हाऊसमधून 1959 साली संगीत कारकिर्दीला सुरुवात केली.
- 1960 साली त्याच्या उत्कृष्ट गायन शैलीनं ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
- ‘ब्लोविन इन ड विंड अँड द टाइम्स दे आर चेंजिंग’ या त्यांच्या गाण्यानं मानवाधिकार संघटना आणि युद्ध विरोधी संघटनांमधील यादवी संघर्ष शमवण्यात मोठी मोलाची कामगिरी बजावली आहे.
- तसेच पहिल्यांदाच एका गीतकाराला त्याच्या गाण्यासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
काश्मिरमधील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर टेक्नॉलॉजीसाठी निधी मंजूर :
- जम्मू आणि काश्मिरमधील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) अत्याधुनिकीकरणासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 13 ऑक्टोबर रोजी कॅबिनेट मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली.
- याबाबत बोलताना जावडेकर म्हणाले, ‘जम्मूमध्ये आणखी एक नवे आयआयएम उभे करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे.’ तर श्रीनगरमधील एनआयटीच्या आधुनिकीकरणासाठी 100 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
- तसेच त्यापैकी 50 कोटी रुपये हे जम्मू, काश्मिर आणि लडाख येथे तीन वसतीगृहे उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय :
- डेव्हिड वॉर्नरच्या दणकेबाज शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 31 धावांनी पराभव करून मालिकेत 5-0 असा विजय मिळविला.
- वॉर्नरने 136 चेंडूंत 173 धावांची खेळी केली; परंतु दुसऱ्या बाजूने त्याला तोडीची साथ मिळाली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या 8 बाद 327 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 296 धावांत सर्व बाद झाला.
- दक्षिण आफ्रिकेने याआधी पहिला वनडे सामना 6 गडी राखून, दुसरा सामना 142 धावांनी, तिसरा सामना 4 विकेटनी तर चौथा सामना 6 विकेट राखून जिंकला होता.
- तसेच या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वलस्थानी कायम आहे, तर दक्षिण आफ्रिका 2 गुणांनी पिछाडीवर असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा