चालू घडामोडी (15 एप्रिल 2018)
भारताची राष्ट्रकुल स्पर्धेत 66 पदकांची कमाई :
- गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा 2018 मध्ये भारताने चांगली कामगिरी नोंदवली आहे.
- भारताने या खेळांमध्ये 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदाकांसह एकूण 66 पदकांची कमाई केली आहे.
- 2014 मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेल्या 64 पदकांच्या तुलनेत यंदाची भारतीय खेळाडूंची कामगिरी अव्वल ठरली आहे.
- गोल्ड कोस्टमध्ये भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- तसेच भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण 101 पदकांची कमाई केली होती.
- तर 2002 मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये 69 पदके मिळवली होती.
सायनाने अंतिम फेरीत सुवर्ण जिंकले:
- राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा 2018च्या बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यांत सायनने पी. व्ही. सिंधूचा पराभव करीत सुवर्ण जिंकले. त्यामुळे सिंधूला रौप्य मिळाले आहे.
- तर दुसरीकडे किदांबी श्रीकांतला पुरुषांच्या एकेरीतील अंतिम सामन्यांत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
- भारतीय बॅडमिंटनमधील दोन स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोघी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यांत एकमेकांसमोर उभ्या होत्या.
- या निर्णायक लढतीत सायनाने देशातील अव्वल खेळाडू आणि ऑलंपिक पदक विजेत्या सिंधूला हारवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
राज कपूर जीवनगौरव आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर :
- राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद व राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शकराजकुमार हिराणी यांना तर चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे.
- सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
- मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रातत्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार तसेच राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
- जीवनगौरव पुरस्कार 5 लक्ष रुपयाचा तर विशेष योगदान पुरस्काराचे रु..3 लक्ष रुपयाचा आहे.
आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ :
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला आहे.
- या अंतर्गत त्यांनी देशातील पहिल्या हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे उद्घाटनही त्यांनी केले आहे.
- या याजनेद्वारे महाराष्ट्रात सर्वाधिक 1450 सेंटर्स उभारले जाणार आहेत.
- आयुष्यमान योजनेच्या पहिल्यात 10.74 कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल.
- बजेटमध्ये आयुष्मान भारतमध्ये दोन प्रकारच्या योजना आहेत. पहिली 10.74 लाख कुटुंबांना मोफत 5 लाखांचा आरोग्य विमा आणि दुसरी म्हणजे हेल्थ वेलनेस सेंटर. तयात देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र अपडेट होतील. या सेंटरमध्ये उपचाराबरोबरच आणि मोफत औषधी मिळेल.
दिनविशेष :
- 1892 मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
- 1992 मध्ये आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
- 1923 मध्ये मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा