Current Affairs of 15 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2015)

स्मार्ट सिटीचा योजनेत पुण्याचा आराखडा प्रस्ताव एकमताने मंजूर :

  • केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटीचा योजनेत पुण्याचा आराखडा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने तब्बल तेरा तासांच्या चर्चेनंतर एकमताने मंजूर केला. आता हा आराखडा राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला आज पाठविला जाणार आहे.
  • स्मार्ट सिटीचा आराखडा केंद्र सरकारकडे 15 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाठविण्याची मुदत आहे. सर्वसाधारण सभेने नऊ डिसेंबर रोजी आराखड्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव 4 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला होता.

ट्‌विटर आणि स्काइपवर बांगलादेश सरकारची तात्पुरती बंदी :

  • सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्‌विटर आणि स्काइपवर बांगलादेश सरकारने तात्पुरती बंदी घातली आहे. बांगलादेशात दोन युद्ध गुन्हेगार नेत्यांना गेल्या Twitterमहिन्यात फाशी देण्यात आली. त्यामुळे येथे आंदोलन सुरू आहे. सुरक्षेचे कारण पुढे दाखवून सरकारने सोशल नेटवर्किंग साइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तसेच यापूर्वी फेसबुकवरही बंदी घातली होती. मात्र, व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगून बंदी मागे घेण्यास भाग पाडले होते.

फिरकी गोलंदाज मार्लोन सॅम्युएल्स याच्या गोलंदाजीवर 12 महिन्यांची बंदी :

  • वेस्ट इंडीजचा 34 वर्षीय फिरकी गोलंदाज मार्लोन सॅम्युएल्स याच्या गोलंदाजीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 12 महिन्यांची बंदी घातली आहे.
  • आयसीसीच्या पथकाने सॅम्युएल्सची गोलंदाजी शैली तपासल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. सॅम्युएल्सवर आयसीसीकडून दुसऱ्यांदा गोलंदाजीवर बंदी घातली आहे. वेस्ट इंडीजसाठी सॅम्युएल्स पार्ट-टाईम गोलंदाजी करतो.
  • वेस्ट इंडीजचा ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याच्या गोलंदाजी शैलीबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. या नंतर आयसीसीने ब्रिस्बेनमध्ये या महिन्याच्या सुरवातीला त्याच्या गोलंदाजीची तपासणी केली होती. अखेर त्याच्या गोलंदाजीवर वर्षभरासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • सॅम्युएल्सवर यापूर्वी 2008 मध्ये चार वर्षांसाठी गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली होती.

अजय-अतुल ‘फोर्ब्स’ या जगप्रसिध्द मासिकाच्या सेलिब्रेटी यादीत दाखल :

  • आपल्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी रसिक मराठी प्रेक्षकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवणा-या अजय-अतुल या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी संगीत दिग्दर्शकांच्या जोडीला ‘फोर्ब्स’ या जगप्रसिध्द मासिकाच्या सेलिब्रेटी यादीत दाखल होण्याचा मान मिळाला आहे.
  • फोर्ब्सने ‘2015 फोर्ब्स इंडिया 100 सेलिब्रेटी’ची यादी प्रसिध्द केली असून, त्यात अजय-अतुल जोडीला 82 वे स्थान मिळाले आहे.
  • संगीताचे कोणतेही शास्त्रशुध्द प्रशिक्षण न घेता संगीत क्षेत्रात अजय-अतुल जोडीने मोठी झेप घेतल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. अजय-अतुलने मराठीबरोबर हिंदी चित्रपटातही आपला ठसा उमटवला आहे.
  • फोर्ब्सच्या यावेळच्या इंडिया 100 सेलिब्रेटीच्या यादीत 14 नवे चेहरे आहेत.

इस्रो सिंगापूरचे सहा उपग्रह प्रक्षेपित करणार :

  • भारतीय अंतराळ संशोधन संघटना(इस्रो) सिंगापूरचे सहा उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत.

    upagrah

  • पीएसएलव्ही-सी 26/टीईएलईओएस-1 या प्रक्षेपण मोहिमेचे 59 तासांचे काऊंटडाऊन सुरू झाले. येत्या बुधवारी श्रीहरिकोटास्थित धवन अंतराळ केंद्रावरून संध्याकाळी 6 वाजता या उपग्रहांचे प्रक्षेपण होईल.
  • पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकलद्वारे हे उपग्रह अंतराळात सोडले जातील.
  • पीएसएलव्हीचे हे 32 वे उड्डाण असेल. या उड्डाणाद्वारे सहा उपग्रह नियोजित कक्षेत स्थापन केले जातील. या सहा उपग्रहांमध्ये 400 किलोग्रॅम वजनाचा टीईएलईओएस-1 हा प्राथमिक उपग्रह आहे. अन्य पाच उपग्रहांमध्ये दोन मायक्रो आणि तीन नॅनो उपग्रह आहेत.

देशाच्या इतिहासात प्रथमच महिलांना मतदानाची आणि निवडणूक लढविण्याची संधी :

  • सौदी अरेबियात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारांनी 20 महिलांना विजयी केले आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच महिलांना मतदानाची आणि निवडणूक लढविण्याची संधी मिळाली.
  • निवडून आलेल्या महिला या देशाच्या सगळ्यात मोठ्या शहरापासून ते अगदी छोट्या खेड्यातील आहेत.
  • या निवडणुकीत 979 महिलांसह 7000 उमेदवार उभे होते.
  • 2005 व 2011 मध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये केवळ पुरुषांनाच उभे राहण्याची परवानगी होती.

दिनविशेष :

  • 1803 : नागपूरकर भोसलेंनी ओरिसचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.

    Dinvishesh

  • 1941 : जपानी सैन्याचा हॉगकॉगमध्ये प्रवेश.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.