चालू घडामोडी (15 डिसेंबर 2016)
स्मृती मानधनाची आयसीसी संघात निवड :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या 2016 वर्षाच्या आपल्या महिला संघामध्ये भारताची शानदार फलंदाज स्मृती मानधनाची निवड झाली आहे.
- 13 डिसेंबर रोजी आयसीसीने आपल्या महिला संघाची घोषणा केली. गेल्या 12 महिन्यांमध्ये चमकदार खेळ केलेल्या खेळाडूंची या संघात निवड करण्यात आली आहे.
- वेस्ट इंडीजची शानदार खेळाडू स्टेफनी टेलरकडे या संघाची धुरा सोपविण्यात आली आहे.
- 14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 दरम्यान केलेली कामगिरी लक्षात घेऊन या संघासाठी खेळाडूंची निवड केली आहे.
- विशेष म्हणजे, या कालावधीदरम्यान महिला विश्वचषक टी-20 आणि आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धाही पार पाडली.
पी.व्ही. सिंधूची विजयी सलामी :
- भारताची ऑलिम्पिक रौप्य पदकविजेती स्टार शटलर पी.व्ही. सिंधू हिने दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल स्पर्धेत दिमाखदार विजयी सलामी देताना जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव केला.
- तसेच त्यावेळी, चीनच्या सुन यू हिने पहिल्याच दिवशी खळबळजनक विजय मिळविताना ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनला सलग दोन गेममध्ये पराभूत केले.
- जागतिक क्रमवारीतील अव्वल आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी सिंधूचा समावेश खडतर अशा ‘ब’ गटात आहे.
- सिंधूने अकाने हिला 12-21, 21-8, 21-15 असे नमवून दिमाखात विजयी सलामी दिली.
ए.आर. रहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत :
- बॉलीवूडमधील आघाडीचा संगीतकार ए.आर. रहमान पुन्हा एकदा ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहे.
- पेले:द बर्थ ऑफ अ लिजंड मध्ये दिलेल्या संगीतासाठी रहमान यांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
- तसेच याआधी 2009 साली स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी रहमान यांनी जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार पटकावला.
- आता यंदाच्या 89 अॅकॅडमी पुरस्कारांच्या ओरिजनल स्कोअर गटात रहमान यांना नामांकन देण्यात आले आहे.
- पेले: द बर्थ ऑफ अ लिजंड या चित्रपटाबरोबरच रहमान यांच्या जिंगा या गीतालाही ऑस्करच्या शर्यतीत नामांकन मिळाले आहे.
- आता ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकनाची अंतिम यादी 24 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध होणार आहे.
रेक्स टिलेर्सन अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री :
- अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्झॉन मोबिल या प्रभावी बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेक्स डब्ल्यू टिलेर्सन यांच्याकडे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदाची धुरा सोपविण्यासंदर्भातील औपचारिक घोषणा केली आहे.
- टिलेर्सन हेच अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री असतील, अशा आशयाचे संकेत ट्रम्प यांनी याआधी दिले होते.
- अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदासाठी टिलेर्न यांच्यासह ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मिट रॉमनी, ट्रम्प यांचे निष्ठावंत सहकारी रुडॉल्फ डब्ल्यू जियुलिआनी यांच्यासह अन्य काही प्रभावी नेत्यांची नावेदेखील चर्चेत होती.
- रशियाशी गेली दोन दशके व्यावसायिक संबंध असलेल्या टिलेर्सन यांना रशियाकडून 2013 मध्ये ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप’ पुरस्काराने गौरविण्यातही आले होते.
- टिलेर्सन (वय 64वर्ष) यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संवेदनशील चर्चांचा मोठा अनुभव आहे.
नरेंद्र मोदी फोर्ब्सच्या टॉप टेन शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत :
- फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दहाजणांमध्ये स्थान पटकावले आहे.
- फोर्ब्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सलग चौथ्यांदा पहिला क्रमांक पटकावला असून अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
- जगातील सर्वात शक्तिशाली अशा 74 लोकांच्या यादीत नरेंद्र मोदी यांनी नववे स्थान पटकावले आहे.
- 130 कोटींची लोकसंख्या असलेल्या भारतात नरेंद्र मोदी प्रचंड लोकप्रिय असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा