चालू घडामोडी (15 फेब्रुवारी 2017)
भारतीय अभिनेता देव पटेलला ‘बाफ्टा’ पुरस्कार :
- 70 व्या ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार (बाफ्टा) सोहळ्यात दिग्दर्शक डेमियन शजैल यांच्या ‘ला ला लँड’ चित्रपटाला सर्वाधिक पाच पुरस्कार मिळाले. तर, भारतीय अभिनेता देव पटेलला ‘लायन’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
- बाफ्टा पुरस्कारांमध्ये बाजी मारणाऱ्या ला ला लँड हा चित्रपट 26 फेब्रुवारीला घोषणा होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांतही मजबूत दावेदार आहे.
- तसेच या पुरस्कार सोहळ्यात एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ‘मॅचेस्टर बाय द सी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी केसी अफ्लेकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
- तर ‘फेसिस’ या चित्रपटासाठी वियोला डेव्हिस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची विश्वविक्रम नोंद :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम केला आहे.
-
- PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत.
-
- चेन्नईपासून 125 कि.मी. अंतरावरील श्रीहरिकोटा येथून 15 फेब्रुवारी रोजी सकाळी एकाच वेळी 104 उपग्रह पाठवून भारत अशा प्रकारची कामगिरी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येणार आहे.
-
- रशियाच्या अंतराळ संस्थेने एका वेळी 37 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्या तुलनेत भारताचे हे यश मोठे आहे. यापूर्वी भारताने जून 2015 मध्ये 23 उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण केले होते.
-
- भारतीय शास्त्रज्ञांनी एक्सएल व्हॅरिएंट या रॉकेटचा वापर केला असून सर्वांत शक्तिशाली या रॉकेटचा वापर यापूर्वी भारताने महत्त्वाकांक्षी चांद्रयान व मंगळ मोहिमेसाठी केला होता.
शशिकला नटराजन यांना 4 वर्षांची शिक्षा :
- तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला नटराजन यांना 14 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा झटका बसला असून, त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे.
- न्यायालयाने त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनाविली आहे. तसेच त्यांना दहा वर्षे निवडणूकही लढविता येणार नाही.
- बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना शिक्षा सुनाविताना, लगेच आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
- शशिकला यांना किमान अजून तीन वर्षे तुरुंगात रहावे लागणार आहे. न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष आणि अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने 7 जून 2016 ला सुनाविलेल्या निकालावर 14 फेब्रुवारी रोजी निकाल सुनाविण्यात आला. या प्रकरणात दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या सुद्धा आरोपी होत्या.
खगोल वैज्ञानिकांकडून बाह्य़ग्रहांचा शोध :
- वैज्ञानिकांनी 100 संभाव्य बाह्य़ग्रह शोधून काढले असून त्यात 8.1 प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा समावेश आहे.
- खगोल वैज्ञानिकांनी रॅडिअल व्हेलॉसिटी पद्धतीच्या वापरातून घेतलेली निरीक्षणे सादर केली आहेत.
- ग्रहाचे गुरूत्व हे ताऱ्यावर परिणाम करत असते या तत्त्वावर आधारित ही निरीक्षण पद्धत आहे.
- खगोलवैज्ञानिकांच्या मते ग्रहाची थरथर अभ्यासून ताऱ्यात निर्माण होणारे गुरूत्वाचे बदल लक्षात येतात.
- दोन दशके रॅडिअल व्हेलॉसिटी तंत्राने ग्रहशोधनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात हवाईतील मोना किया येथे डब्ल्यू एम केक वेधशाळेच्या ‘केक 1’ या दहा मीटरच्या दुर्बिणीवरील वर्णपंक्तीमापी वापरण्यात आला आहे.
- तसेच या माहितीत एकूण 61 हजार मापने असून 1600 ताऱ्यांचा त्यात समावेश आहे. ही माहिती जाहीर करून वैज्ञानिकांनी संभाव्य बाह्य़ग्रहांच्या संशोधनासाठी आणखी संधी उपलब्ध करून दिली आहे.
दिनविशेष :
- इ.स.पूर्व 564 मध्ये प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांचा जन्म झाला.
- भारतात 15 फेब्रुवारी हा दिवस श्री. विश्वकर्मा जयंती म्हणून साजरा करतात.
- 5 फेब्रुवारी 1950 हा सरदार वल्लभाई पटेल यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा