Current Affairs (चालू घडामोडी) of 15 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ‘इस्त्रो’च्या प्रमुखपदी ए.एस.किरणकुमार |
2. | गुजरात मध्ये 25 लाख कोटींचा गुंतवणूक करार |
3. | दिनविशेष |
‘इस्त्रो’च्या प्रमुखपदी ए.एस.किरणकुमार :
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) प्रमुखपदी केंद्र सरकारने अहमदाबाद येथील स्पेन अॅप्लिकेशन सेंटरचे (सॅक) संचालक ए.एस.किरणकुमार यांचे नाव निश्चित झाले आहे.
- किरणकुमार यांचा कालावधी तीन वर्षाचा असणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली किरणकुमार यांची निवड करण्यात आली आहे.
- ए.एस.किरणकुमार हे इस्त्रोमधील सर्वात वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याने त्यांची निवड करण्यात आलेली आहे.
गुजरात मध्ये 25 लाख कोटींचा गुंतवणूक करार :
- ‘व्हायब्रंट गुजरात‘ परिषदेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळून तब्बल 25 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले.
- 2013 मध्ये 12 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते, यंदा त्यात दुप्पट वाढ झाली.
दिनविशेष :
- 15 जानेवारी – लष्करी दिन
- 1919 – राजर्षि शाहू छत्रपती महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली.
- 1949 – भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम.करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो.
- 1996 – भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरविणार्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस‘ असे केले.
- 2006 – सौरमालेच्या जन्माचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा‘ने अंतराळात पाठविलेली अवकाश कुपी 2.9 अब्ज किलोमीटरचा प्रवास करून अमेरिकेच्या हवाई दलाच्या उटाह तळावर सुखरूप उतरली.