चालू घडामोडी (15 मे 2018)
राज्य स्तरावर महिला संघटक समिती :
- भारिप बहुजन महासंघाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता पक्षाच्या महिला आघाडीलाही प्रदेश स्तरावर नेतृत्व मिळाले आहे. पक्षाची राज्य महिला संघटन समितीची घोषणा 13 मे रोजी बुलडाणा येथे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केली.
- अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गर्दशनात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या अरुंधती सिरसाट, रेखा ठाकूर, डॉ. निशाताई शेंडे यांचा या समितीमध्ये समावेस करण्यात आला आहे.
- भारिप-बमसंने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसह जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. कारेगाव भीमा प्रकरणानंतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर अॅड. बाळसाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व सर्व मान्य झाल्याने पक्षाने अकोला जिल्ह्याच्या सीमा ओलांडून राज्य स्तरावर पक्ष संघटना बळकट करण्याच्या दिशेने पाऊल टाकले.
- तसेच राज्य कार्यकारिणीची धुरा बुलडाणा येथील भारिप-बमसंचे नेते अशोक सोनोने यांच्याकडे सोपविल्यानंतर आता महिला आघाडीही प्रदेश स्तरावर बळकट करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.
पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात पुढील आठवड्यात अनापैचारिक चर्चा होणार असून, त्यासाठी मोदी 21 मे रोजी मॉस्कोला रवाना होणार आहेत. ही बैठक रशियाच्या सोची येथे शहरात होणार आहे. रशियाचे चौथ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिलीच भेट असणार आहे.
- उभय नेत्यांत द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. ही भेट दोन्ही देशांतील नेत्यांना विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठीची महत्त्वाची संधी असल्याचे सांगितले जात आहे.
- तसेच या भेटीतून व्यूहरचनात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात चीन दौऱ्यात अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत अनौपचारिक चर्चा केली होती. डोकलामवरून निर्माण झालेला तणाव संपल्यानंतर ही भेट महत्त्वाची होती.
महान टेनिसपटू रॉजर फेडरर पुन्हा अव्वलस्थानी :
- माद्रिद मास्टर्समध्ये उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवाचा फटका बसल्याने राफेल नदालने एटीपी जागतिक क्रमवारीतील त्याचे प्रथम स्थान गमावले असून महान टेनिसपटू रॉजर फेडररने पुन्हा अव्वल पटकावले आहे. मार्च महिन्यापासून फेडरर एकही सामना खेळलेला नसतानाही तो पुन्हा सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे.
- दुसरीकडे माजी अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची अजून सहा स्थानांनी घसरण होऊन तो 18व्या स्थानावर पोहोचला आहे. 2006च्या ऑक्टोबरनंतरची ही त्याची सगळ्यात खालची क्रमवारी आहे.
- माद्रिदचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव हा क्रमवारीत तृतीय क्रमांकावर कायम आहे. चौथ्या बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव, पाचव्या स्थानी क्रोएशियाचा मरिन सिलीक आहे. तर भारतीय टेनिसपटू युकी भांब्रीची आठ स्थानांनी घसरण होऊन तो 94व्या स्थानावर तर रामकुमार रामनाथन 124व्या स्थानी आहे.
मोदी सरकारचा जाहिरातीबाजीवर कोटींचा खर्च :
- नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने मागील 46 महिन्यात जाहिरातींवर तब्बल 4343.26 कोटी रूपये खर्च केले आहेत.
- मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर टीका झाल्यानंतर यंदाच्या वर्षी यावर 25 टक्के कमी खर्च करण्यात आला आहे.
- 2016-17 मध्ये मोदी सरकारने एकूण 1263.15 कोटी रूपये जाहिरातीवर खर्च केले होते. माहिती अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.
- माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून आजपर्यंत विविध जाहिरातींवर झालेल्या खर्चाची माहिती मागितली होती.
- केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन विभागाचे आर्थिक सल्लागार तपन सूत्रधर यांनी 1 जून 2014 ते आतापर्यंत देण्यात आलेल्या जाहिरातींची माहिती दिली.
वीज-पाण्यासाठी मेळघाटातील आदिवासींचा सत्याग्रह :
- मेळघाटातील माखला हे एक दुर्गम भागातील गाव. गावात वीज नाही. पण, सरकारच्या लेखी येथे वीज पोहचली आहे. कारण या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे दिवे आहेत. पाण्याची टाकी आहे. पाईपलाईन आहे. पण, लोकांना पाणी मिळवण्यासाठी पहाटे 3-4 वाजेपासून रांगेत उभे रहावे लागत आहे. कित्येक वर्षांपासून हा संघर्ष सुरूच आहे. अखेर या आदिवासी गावकऱ्यांनी आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 15 मे रोजी सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- सर्व गावकरी माखला ग्रामपंचायतीसमोर एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. माखला गावातील महिलांसह गावकरी, लहान मुलांना पिण्याचे तसेच वापरण्याचे पाणी मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. गेल्या एक महिन्यापासून पाण्याचा तुटवडा आहे.
- सोलर पॅनल उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. पाण्याची टाकी, जलवाहिनी गावात आहे. तरीपण लोकांना पाणी मिळवण्यासाठी रात्री जागे रहावे लागते. घरी आलेल्या पाहुण्यांना पिण्याचे पाणी देण्याचीही गावकरी व्यवस्था करू शकत नाही. पाणी भरण्यासाठी जंगलात जावे लागते, असे खोज संस्थेचे अॅड. बंडय़ा साने यांनी सांगितले.
- तसेच या आधी दिवाळीच्या काळात महिनाभर पाणीपुरवठा होत नव्हता. लोकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. तो त्यांचा हक्क आहे. स्थानिक प्रशासनाला या प्रश्नांची माहिती आहे. म्हणून सत्याग्रह आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे बंडय़ा साने यांचे म्हणणे आहे.
- माखला या गावात स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर देखील कायमस्वरूपी वीज पुरवठा नाही. शासनाने सौर दिवे लावले आहेत, पण अपेक्षित उजेड-प्रकाश का मिळत नाही, या प्रश्नाचे उत्तर कुणाकडे नाही. गावात एसटी बस येणे देखील बंद झाले आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
दिनविशेष :
- 15 मे 1350 हा दिवस संत जनाबाई यांचा स्मृतीदिन आहे.
- जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट 15 मे 1718 मध्ये जेम्स पक्कल यांनी घेतले.
- भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक ‘देवेन्द्रनाथ टागोर’ यांचा जन्म 15 मे 1817 मध्ये झाला.
- क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म सन 1907 मध्ये 15 मे रोजी झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा