Current Affairs of 15 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2016)

कुडनकुलम प्रकल्प आराखड्याला अंतिम स्वरूप :

  • अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवत भारत आणि रशियाने कुडनकुलम अणु प्रकल्पाच्या केंद्र क्रमांक पाच आणि सहाची उभारणी करण्याच्या कराराच्या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले आहे.
  • ‘ब्रिक्‍स’ परिषदेदरम्यान भारत आणि रशियातील द्वीपक्षीय चर्चेनंतर या कराराची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.
  • 15 आणि 16 ऑक्‍टोबरला गोव्यामध्ये ब्रिक्‍स परिषद होणार असून, यामध्ये भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
  • या परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची स्वतंत्रपणे भेट होणार आहे.
  • तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणु प्रकल्पामध्ये केंद्र 5 आणि 6 उभारणीसाठीच्या रशियाबरोबरील कराराच्या मसुद्याला दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे.
  • तसेच या अणु प्रकल्पातील केंद्र क्रमांक दोनचे उद्‌घाटन आणि केंद्र तीन आणि चारचे भूमिपूजन करण्याचाही दोन्ही देशांचा विचार आहे.
  • कुडनकुलम अणु प्रकल्पातील केंद्र क्रमांक एकची उभारणी भारत आणि रशियाने संयुक्तपणे केली असून, या प्रकल्पातून 2013 पासून वीजनिर्मितीला सुरवात झाली आहे.

15 ऑक्‍टोबर हा जागतिक हात धुणे दिन :

  • अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर हात साबणाने धुणे आवश्‍यकच आहे. अनेक आजारांचे मूळ हे अस्वच्छतेत असते.
  • खाण्यासाठी आपण हातांचा वापर करतो, ते हातच अस्वच्छ असतील तर त्यांच्या माध्यमातून रोगजंतूंचा पोटात शिरकाव होतो. यातून अनेक आजारांना ते निमंत्रण मिळते.
  • तसेच या पार्श्‍वभूमीवर हात धुण्याचे महत्त्व अधोरेखित करणे व त्याच्या जनजागृतीसाठी 15 ऑक्‍टोबर हा जागतिक हात धुणे दिन म्हणून पाळला जातो.
  • हातांची स्वच्छता म्हणजे निरोगी आयुष्याच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा भाग असल्याचे सिद्ध झाले आहे.
  • लहान मुलांना त्याचे महत्त्व समजावून सांगणे ही मोठ्यांची जबाबदारी आहे. जेवणापूर्वी तर स्वच्छ हात धुणे याला पर्यायच नाही.

देशाच्या करसंकलनात 26 टक्के वाढ :

  • चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशाच्या अप्रत्यक्ष कर संकलनात 26 टक्के तर प्रत्यक्ष कर संकलनात 9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
  • प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलन रु. 7.35 लाख कोटी झाले आहे.
  • एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन रु. 4.08 लाख कोटींवर पोचले आहे.
  • प्रत्यक्ष कर संकलन रु. 3.27 कोटी झाले आहे.
  • उत्पादन शुल्कात 46 टक्के वाढ झाल्याने यंदा एकूण अप्रत्यक्ष करांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
  • एकूण चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारने अप्रत्यक्ष कर संकलनाचे रु. 7.79 लाख कोटी तर प्रत्यक्ष कर संकलनाचे रु. 8.47 लाख कोटी ध्येय राखले आहे.
  • केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2016-17 साठी रु. 16.26 लाख कोटी एकूण कर संकलनाचे लक्ष्य ठेवले आहे.

दिनविशेष :

  • 15 ऑक्टोबर 1896 रोजी स्वातंत्र्यसैनिक, सेठ गोविंद दास यांचा जन्म झाला होता.
  • हरगोविंद खुराना यांना 15 ऑक्टोबर 1968 रोजी नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago