Current Affairs of 15 October 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2017)
एक हजार विद्यार्थ्यांचा जीवशास्त्राचा वर्ग :
- एकाचवेळी एक हजार विद्यार्थ्यांचा जीवशास्त्राचा वर्ग घेण्याचा ‘गिनीज बुक’ विक्रम येथील अण्णा विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान मंत्रालय व विज्ञान भारती या दोन संस्थांनी नोंदवला.
- गेल्यावर्षी अशाच प्रकारचा विक्रम रसायनशास्त्राच्या पाठ वर्गासाठी नोंदवला गेला होता.
- केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
- मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. यात मुलांची संख्या, अध्यापनाची अचूकता, प्रयोग, वेळ या सर्व बाबींचे मूल्यमापन केले जाते. गिनीज बुक विक्रमाचा हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन व विज्ञान भारतीचे जयकुमार यांना विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले.
Must Read (नक्की वाचा):
भारतीय लष्कर सीमेवर ऑपरेशनल कमांडची उभारणी करणार :
- डोकलाममधील दोन महिन्यांच्या तणावानंतर आता चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जोरदार तयारी सुरु केली आहे.
- भारतीय लष्कराने चीनलगतच्या सीमेवर ऑपरेशन कमांडची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- लष्कराच्या विभागीय स्तरावरील ऑपरेशनल कमांडची निर्मिती हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड दरम्यानच्या भारत-चीन सीमेजवळ करण्यात येईल.
- चीनच्या आक्रमक पवित्र्यामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्याने लष्कराने ऑपरेशनल कमांडची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- हिमाचल प्रदेश आणि उत्तरखंड दरम्यानची भारत-चीन वास्तविक नियंत्रण रेषा 344 किलोमीटर लांबीची आहे. या भागाच्या सुरक्षेसाठी नव्या ऑपरेशनल कमांडची उभारणी केली जाणार आहे.
गायींना लवकरच मिळणार ‘हेल्थ कार्ड’ :
- गायींच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘पशुधन संजीवनी’ योजनेंतर्गत 15 लाखांहून अधिक गायींचे लवकरच हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे.
- केंद्राच्या पशुधन योजनेंतर्गत प्रत्येक गायी आणि म्हशींची प्रजनन क्षमतेची नोंद ठेवली जाणार आहे.
- ही योजना राबणारे झारखंड हे पहिल राज्य असल्याचे Jharkhand State Implement Agency for Cattle and Buffalo (JSIACB) चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद प्रसाद यांनी सांगितले.
- या पशुधन संजीवनी योजनेसाठी केंद्र सरकारने यापूर्वी 1.57 कोटी रुपयांची तरतुद केली होती.
- तर झारखंड सरकारने या योजनेसाठी 1.04 कोटी रुपये दिले आहेत.
- यामध्ये या जनावरांना आधार क्रमांकाप्रमाणे 12 आकडी क्रमांक देण्यात येणार आहेत.
- केंद्राच्या information network for animal productivity and health (INAPH) या योजनेंतर्गत हे क्रमांक देण्यात आले आहेत. गोवंशाची अवैध वाहतुक रोखण्यासाठी, त्यांची दूध क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी राज्यात यापूर्वीच 70 हजार गायींना या क्रमांकांचे टॅग लावण्यात आले आहेत.
सोशल मीडियावर कमेंट करताना सावधान :
- सोशल मीडियावरील तुमच्या हालचालींवर लवकरच सरकारची नजर असणार आहे.
- तुम्ही केलेल्या एखाद्या कमेंटमुळे जर कोणाच्या भावना दुखावणार असतील, किंवा दंगल आणि अफवा पसरण्याची शक्यता वाटल्यास ते कमेंट अथवा कंटेंट लिहीणा-याला कमाल तीन वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो.
- तसेच ते कमेंट किंवा कंटेंट शेअर, फॉरवर्ड किंवा रिट्विट करणा-यांनाही हीच शिक्षा होऊ शकते.
- केंद्र सरकारने सोशल मीडियावरील अशा कंटेंटला लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
- यासाठी वेगळा कायदा बनवण्याऐवजी सध्याच्या इंडियन पीनल कोड (IPC) आणि आयटी ऐक्ट 2000 च्या कलमांमध्ये बदल केला जाणार आहे.
- यासाठी कोणत्या बदलांची आवश्यकता आहे याबाबतचा अहवाल 10 तज्ञांच्या समितीने सरकारला सुपूर्द केला आहे.
- आयपीसी 153सी अंतर्गत ऑनलाइन हेट किंवा अफवा पसवणा-या कंटेंटवर कारवाई होईल.
- जाती, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारे कोणाला धमकी अथवा कोणाबाबत चुकीची माहिती पसरवल्यास तीन वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो.
- आयपीसी 505 ए अंतर्गत दंगे भडकवणारे कमेंट केल्यास एक वर्ष जेल अथववा 5 हजार रूपयांचा दंड होऊ शकतो.
देशातील विद्यापीठे जागतिक दर्जाची बनविणार :
- जगातील प्रमुख 500 विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशातील 10 खासगी आणि 10 सरकारी अशा 20 विद्यापीठांना सरकारी बंधनातून स्वतंत्र करून, ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्यात येतील.
डॉ. मनमोहनसिंग यांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार :
- मोहन धारियांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपूरच्या वनराई फौंडेशन तर्फे दिला जाणारा राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉ. सिंग यांना ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपद व विविध भूमिका जबाबदारीने, प्रामाणिकपणे व निष्ठेने बजावल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा