Current Affairs of 15 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 सप्टेंबर 2017)

‘एशियन ओशानियन’च्या उपाध्यक्षपदी शिवाजी झावरे यांची निवड :

  • गारगुंडी (ता. पारनेर) येथील सीए शिवाजी झावरे यांची अशिया खंडामधील एशियन ओशानियन स्टँडर्ड सेंटर (एओएसएसजी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अंकोंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) नवी दिल्ली यांचे प्रतिनीधी म्हणून निवड झाली आहे.
  • अशिया खंड सागरी पट्टयामधील 26 देशांमधून 2009 साली प्रस्थापित झालेली संस्था आहे. ही संस्था अद्यावत आंतरराष्ट्रीय हिशोब प्रणाली व आंतरराष्ट्रीय संस्थांना या बाबतीत सल्ला देणारी एकमेव संस्था आहे.
  • शिवाजी झावरे यांना चीन, ऑस्ट्रेलिया या देशांच्या सरकारनेही याबाबत अधिकृत पत्र दिले आहे. या पदासाठी भारतामधुन प्रथमच दोन वर्षे व नंतरची दोन वर्षे अध्यक्षपदी काम करण्याचा मान झावरे यांना मिळाले आहे.
  • तसेच झावरे हे आयसीएआयच्या केंद्रीय मंडळाचे सभासद असून भारताच्या हिशोब नियामक मंडळाचे मानद अध्यक्ष आहेत.

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या हस्ते अहमदाबाद आणि मुंबईदरम्यानच्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ 14 सप्टेंबर रोजी भूमिपूजन झाले.
  • या प्रकल्पाला जपानने 88 हजार कोटी रुपये कर्ज केवळ 0.1 एक टक्के इतक्या कमी व्याजदराने दिले आहे. त्यामुळे एक प्रकारे बुलेट ट्रेन आपल्याला मोफतच मिळाली आहे असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
  • तसेच या प्रकल्पासाठी एक लाख दहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाने दोन शहरांमधील प्रवासाचे सध्याचे सात तासांचे अंतर तीन तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करता येणार आहे.
  • या पुर्वी बुलेट ट्रेनची जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा त्याची खिल्ली उडवली जायची. मात्र विरोधकच आता ही गरज असल्याचे सांगतात त्यावरूनच प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
  • जलदगतीने ठिकाणे जोडण्याचे आमचे ध्येय आहे, त्यातून आर्थिक विकास होईल असे पंतप्रधानांनी सांगितले.
  • जपानने 1964 मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प पहिल्यांदा आणला आता हे तंत्रज्ञान पंधरा देशांमध्ये असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक वेगाने विस्तार करणार :

  • भारतीय टपाल विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) वेगाने विस्तार करणार आहे.
  • देशभरातील 1.55 लाख टपाल कार्यालयांमध्ये पेमेंट बँक सुरू करण्यात येणार असून याद्वारे सर्व आर्थिक सेवा पुरवण्यात येणार आहेत.
  • 2018 अखेरीपर्यंत 1.55 लाख टपाल कार्यालये आणि तीन लाख कर्मचाऱ्यांमार्फत ही सेवा दिली जाईल.
  • इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असेल.
  • मार्च 2018 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात पोस्ट बँक सुरू होईल. सर्व 1.55 लाख टपाल कार्यालयांत पेमेंट बँकची सुविधा देण्यात येईल.
  • तसेच पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांकडे पेमेंट सुविधा देणारी उपकरणे असणार आहेत.
  • इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.पी. सिंह यांनी संयुक्त राष्ट्र संघात आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

दहशतवादी गटांविरुद्ध भारत-जपान सहकार्य अधिक बळकट :

  • अल्-कायदा त्याचप्रमाणे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एकमेकांना अधिकाधिक सहकार्य करण्याचा निर्धार भारत आणि जपानने केला. दहशतवाद कोणत्याही स्थितीत सहन केले जाणार नाही, असेही दोन्ही देशांनी स्पष्ट केले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी, मुंबईवरील दहशतवादी हल्ला त्याचप्रमाणे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांवर पाकिस्तानने कारवाई करावी, असे एका संयुक्त निवेदनांत म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा कडक शब्दांत निषेध केला.
  • दहशतवाद मग तो कोणत्याही स्वरूपातील असो, हे जगापुढील अत्यंत गंभीर संकट आहे आणि त्याचा जागतिक पातळीवरील कारवाईनेच मुकाबला केला पाहिजे, असेही मोदी आणि अबे म्हणाले.
  • दहशतवाद्यांची आश्रयस्थाने आणि दहशतवादी संघटनांचे जाळे, त्यांना मिळणारी आर्थिक मदत आणि सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया मुळासकट उखडून टाकण्याचे आवाहन दोन्ही पंतप्रधानांनी पाकिस्तानकडे अंगुलिनिर्देश करीत सर्व देशांना केले.
  • दहशतवादाच्या समस्येबाबत सल्लामसलत करण्यासाठी पाचवी भारत-जपान परिषद आयोजित करण्याचे आणि अल्-कायदा, आयसिस, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि त्यांच्याशी संलग्न संघटनाविरुद्ध एकमेकांना अधिकाधिक सहकार्य करण्याकडे दोन्ही देशांचा कल आहे.

दिनविशेष :

  • मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 मध्ये झाला. तसेच भारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस (15 सप्टेंबर) हा अभियंता दिन म्हणून पाळला जातो.
  • सन 1935 मध्ये 15 सप्टेंबर रोजी भारतातील दून स्कूलची स्थापना झाली.
  • 15 सप्टेंबर 2013 मध्ये ‘नीना दावुलुरी’ पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago