Current Affairs (चालू घडामोडी) of 16 December 2014 For MPSC Exams

अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे |
2. | स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी निवड |
3. | ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार’ |
4. | यूएनईपी सल्लागार मंडळात जयराम रमेश |
5. | क्रिकेट खेळतांना आणखी एका भारतीयाचा मृत्यू |
6. | सिडनी : ओलिस नागरिकांमध्ये भारतीयाचा सामावेश |
- आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
- दुखापत बळावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्कने भारताविरुद्धच्या कसोटीतून मालिकेतून माघार घेतल्यानंतर स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ति करण्यात आली आहे.
- स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा 45वा आणि सर्वात तरुण कप्तान आहे.
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार असे आश्वासन राज्याचे उच्च शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले.
- ठाण्यात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे‘ च्या राज्यस्तरीय ‘प्रतिभा संगम‘ या संमेलनात बोलत होते.
- विकसनशील देशांना पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल तंत्रज्ञानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेला धोरणात्मक सल्ला देणार्या एका मंडळाच्या सदस्यपदी माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- जापानच्या आसोका शहरात असलेल्या या आयईटीसीची स्थापना करण्यात आली आहे.
- 32 वर्षीय प्रमोद थेराईल याचा मृत्यू.
- भारतीय व्यक्तीचा क्रिकेट खेळतांना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
- ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील लिंडेट कॅफे येथे दहशतवाद्यांनी ओलिस धरलेल्या नागरिकांमध्ये एका भारतीय नागरिकाचा सामावेश आहे.
- हा नागरिक इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील कंपनीमध्ये कार्यरत आहे.