Current Affairs of 16 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 जानेवारी 2017)
एक दिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरूद्ध भारताचा विजय :
- विराट कोहली आणि केदार जाधवच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्रजांच्या 351 धावांच्या बलाढ्य आव्हानाला भारतीय खेळाडूंनी सडेतोड उत्तर देत 3 गडी आणि 11 चेंडू राखून जबरदस्त विजय मिळविला.
- भारताच्या 48 षटकांत 350 धावा. एक धाव आवश्यक होती. हार्दिक पंड्याने षटकार ठोकून 350 धावांटा टप्पा गाठला आणि पुन्हा षटकारच ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
- आवश्यक गतीने धावा होत असतानाच भारताचे गडीदेखील एकामागून एक बाद होत गेल्याने शेवटपर्यंत काय होणार याची उत्सुकता प्रक्षकांना लागली होती.
- तसेच 47 षटकांनंतर 7 बाद 339 अशी स्थिती होती. हार्दिक पंड्या आणि अश्विननेही सावध खेळी करीत विजय मिळवून दिला.
Must Read (नक्की वाचा):
62 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा :
- बॉक्स ऑफिस कमाईने दंगल निर्माण करणाऱ्या आमीर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाने यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली.
- आमीर खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर आलिया भट्टला ‘उडता पंजाब’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
- मुंबईत 14 जानेवारी रोजी रात्री 62 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. ‘उडता पंजाब’ या चिञपटात बिहारी स्थलांतरिताची भुमिका करणाऱ्या आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेञीचा पुरस्कार मिळाला.
- कुस्तीपटु महावीरसिंग फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता आणि बबीता यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ या चित्रपटाने पुरस्कारांमध्ये बाजी मारली. मानाच्या चारपैकी तीन पुरस्कार पटकावले. तर, दिग्दर्शक नितेश तिवारी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
- सोनम कपूरला समिक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘निरजा’ आणि ‘कपूर अँड सन्स’ या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी पाच पुरस्कार पटकावले.
- तसेच यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना देण्यात आला.
मराष्ट्रात आठ आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती :
- भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) महाराष्ट्र केडर मिळालेल्या आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची प्रक्षिणासाठी राज्यातील विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
- सहायक पोलीस अधीक्षक/उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांना सहा महिने 18 दिवस प्रशिक्षण घ्यावयाचे आहे.
- प्रियंका मीना यांची रायगड जिल्ह्यात पोस्टिंग करण्यात आली आहे. सर्वांच्या नियुक्तीचे आदेश नुकतेच गृहविभागाकडून काढण्यात आले आहेत.
- आयपीएसच्या 68 व्या तुकडीतील 8 अधिकाऱ्यांना महाराष्ट्र केडर मिळाले आहे. त्यापैकी संदीप घुगे यांची रायगडला, तर भाग्यश्री नवटके व अतुल कुलकर्णी यांची अनुक्रमे कोल्हापूर व सोलापूर ग्रामीणला नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच प्रियंका मीना (रायगड), नुरल हसन (बीड), रगासुधा आर (सातारा), मनीष कलवानिया (जळगाव), जी विजया कृष्णा यादव (अमरावती ग्रामीण) साडेसहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रथमच गुजरात रणजी करंडक स्पर्धेत विजयी :
- 42व्या रणजी करंडक स्पर्धेत पार्थिव पटेलच्या 143 धावांच्या खेळीमुळे गुजरातने मुंबईचे 312 धावांचे आव्हान पाच गडी राखून पूर्ण करत रणजी करंडक पटकाविला.
- नकारात्मक मारा व वेळकाढू धोरण अवलंबणाऱ्या गुजरातला पहिल्यांदा रणजी करंडक जिंकण्याची संधी मिळाली होती.
- तसेच 14 जानेवारी रोजी खेळण्यात आलेल्या सामन्याच्या अखेरच्या दिवशी गुजरातच्या फलंदाजांनी ती पूर्ण केली.
चंद्राचे वयोमान 4.51 अब्ज वर्षांपूर्वीचे :
- पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्राचे वयोमान नेहमीच संशोधकांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असते. काही संशोधकांच्या मते चंद्र हा पृथ्वीपेक्षा पुरातन आहे. आता नव्या संशोधनातून पूर्वीच्या अनेक समजुतींना आणि तर्कांना तडा गेला आहे.
- चंद्राचे वयोमान हे 4.51 अब्ज वर्षे एवढे असावे, असा दावा संशोधकांनी अभ्यासाअंती केला आहे.
- ‘अपोलो-14’ या मोहिमेच्या माध्यमातून 1971 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरून झिरकॉन्स नावाचा धातू आणण्यात आला होता. त्याचा अभ्यास करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे.
- चंद्राचे किमान वयोमान किती असावे, हे आम्हाला अधिक अचूकरीत्या शोधता आले असल्याचे “युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया” मधील भूरसायनशास्त्रज्ञ मेलेनाय बारबोनी यांनी सांगितले.
- अवकाशातील एखाद्या अवाढव्य वस्तूचा पृथ्वीवर आघात झाल्याने चंद्राची निर्मिती झाली असावी, असाही एक सिद्धांत संशोधकांकडून मांडला जातो.
दिनविशेष :
- 16 जानेवारी हा दिवस अमेरिकेत मार्टिन लुथर किंग दिन म्हणून साजरा करतात.
- 16 जानेवारी 1955 रोजी नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले.
- 16 जानेवारी 1901 हा सुप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ व न्यायमुर्ती महादेव रानडे यांचे स्मृतीदिन.
- टाटा मोटर्सच्या, ‘नॅनो’ या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे 16 जानेवारी 2008 रोजी अनावरण करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा