चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2015)
राज्यात नवीन 22 जिल्हे व 49 तालुक्यांची निर्मिती :
- नागरिकांची गैरसोय व प्रशासनाची दिरंगाई टाळण्यासाठी राज्यात नवीन 22 जिल्हे व 49 तालुक्यांची निर्मिती करण्याचा मानस राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
- यासाठीच्या हालचालीही सरकारने सुरू केल्या असून, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे.
- तसेच या समितीमध्ये अर्थ, महसूल, नियोजन विभागाचे सचिव आणि विभागीय आयुक्तांचा समावेश आहे.
- 31 डिसेंबरपर्यंत ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.
- सध्या राज्यात 36 जिल्हे व 288 तालुके आहेत. मात्र, यापैकी अनेक जिल्हा मुख्यालये आणि तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची आहेत.
- प्रस्तावित नवीन जिल्हे :
- बुलडाणा (खामगाव)
- यवतमाळ (पुसद)
- अमरावती (अचलपूर)
- भंडारा (साकोली)
- चंद्रपूर (चिमूर)
- गडचिरोली (अहेरी)
- जळगाव (भुसावळ)
- लातूर (उदगीर)
- बीड (अंबाजोगाई)
- नांदेड (किनवट)
- नगर (शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर)
- नाशिक (मालेगाव, कळवण)
- सातारा (माणदेश)
- पुणे (शिवनेरी)
- पालघर (जव्हार)
- ठाणे (मीरा-भाईंदर, कल्याण)
- रत्नागिरी (मानगड)
- रायगड (महाड)
सचिन तेंडुलकर आणि हेमा मालिनी वन व वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर :
- ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ आता सचिन तेंडुलकर आणि हेमा मालिनी यांनीही वन व वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर होण्याची तयारी दर्शविली आहे.
- राज्यातील वनपर्यटनाला चालना मिळावी, यासाठी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान द्यावे, अशी विनंती केली होती.
- बच्चन यांनी 10 ऑगस्टला व्याघ्रदूत म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला.
- सचिनचाही यास होकार आला असून, हेमा मालिनी राष्ट्रीय पक्षी मोर याची ब्रॅंड ऍम्बेसेडर होण्यास उत्सुक असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई रविवार रवाना :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रविवार रवाना झाले आहेत.
- गेल्या 34 वर्षांमध्ये यूएईचा दौरा करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असतील.
- आज दुपारी चार वाजता मोदी अबुधाबीमध्ये पोहचणार आहेत.
- तसेच मोदी व्यापार आणि सुरक्षेसंदर्भात पंतप्रधान युएईमधील प्रमुख नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
- यापूर्वी यूएईच्या दौऱ्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981 मध्ये गेल्या होत्या.
आसाममध्ये पाच नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीची :
- सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत व्हावी यासाठी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसाममध्ये पाच नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीची घोषणा स्वातंत्र्यादिनाच्या पाश्र्वभूमीवर केली.
- पाच नव्या जिल्ह्य़ांमध्ये बिस्वनाथ, चारायदेव, होजाय, दक्षिण सालमारा-मनकाचार आणि पश्चिम कारबी यांचा समावेश आहे.
- सध्या आसाममध्ये 27 जिल्हे आहेत.