चालू घडामोडी (17 डिसेंबर 2015)
भारताची दुसरी चंद्रयान मोहीम पुढील वर्षी :
- भारताची दुसरी चंद्रयान मोहीम पुढील वर्षी हाती घेतली जाणार असल्याची माहिती सरकारतर्फे लोकसभेत देण्यात आली. तर “अदित्य एल-1”या देशाच्या पहिल्यावहिल्या “सोलर मिशन”ला 2019 मध्ये सुरवात होणार आहे.
- ‘चांद्रयान-2’ पुढील वर्षी (2017) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.
- तसेच 2019-20 मध्ये पहिल्या “सोलर मिशन” अंतर्गत “अदित्य एल-1”चे प्रक्षेपण केले जाणार आहे.
- या “सोलर मिशन”साठी 378.53 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
स्वीस बॅंकेकडून भारतीयांची नवे जाहीर :
- गेल्या 60 वर्षांपासून निष्क्रिय असलेली बॅंक खात्यांची यादी आणि त्या खातेधारकांची नावे खुली करण्यात आली आहेत.
- तसेच या यादीत चार भारतीयांचीही नावे स्वीस बॅंकेत गेल्या 60 वर्षांपासून निष्क्रिय असलेली बॅंक खात्यांची यादी आणि त्या खातेधारकांची नावे खुली करण्यात आली आहेत.
- स्वित्झर्लंडने जारी केलेल्या या यादीत 2 हजार 600 हून अधिक निष्क्रिय खाते आणि 80 सेफ डिपॉझिट बॉक्स यांची माहिती देण्यात आली आहे.
- जगातील जवळपास सर्व खंडातील नागरिक हे स्वीस बॅंकेचे खातेधारक राहिले असल्याचे या यादीवरून स्पष्ट होते.
“एसयूव्ही” वाहनांच्या नोंदणीस नवी दिल्ली व परिसरात बंदी :
- डिझेलवर चालणाऱ्या दोन हजार सी.सी. क्षमतेच्या मोटर व “एसयूव्ही” वाहनांच्या नोंदणीस नवी दिल्ली व परिसरात बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यालयाने दिला. ही बंदी 31 मार्च 2016 पर्यंत लागू असेल.
- दिल्लीतील प्रदूषण धोक्याच्या पातळीपर्यंत पोचले आहे. त्यावर उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.
- दिल्लीतून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा आदेश मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला.
- दिल्लीतील रस्त्यांचा वापर करणाऱ्या हलक्या व जड वाहनांवर 100 टक्के पर्यावरण कर लादण्यासही त्यांनी सांगितले आहे.
- तसेच 2005 पूर्वीच्या जुन्या वाहनांना दिल्लीत प्रवेश बंदी असेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या आदेशानुसार दिल्लीत येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी 700, तर जड वाहनांसाठी तेराशे रुपये पर्यावरण कर 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आला होता.
- आता नव्या आदेशानुसार हलक्या वाहनांकडून चौदाशे रुपये, तर जड वाहनांकडून दोन हजार 600 रुपये वसूल करण्यात येणार आहेत.
“गुगल”ची भारतात “प्रोजेक्ट लून” राबविण्याची घोषणा :
- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या “गुगल”ने भारतात “प्रोजेक्ट लून” राबविण्याची घोषणा केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतात परवडणाऱ्या दरात इंटरनेट कनेक्टीव्हीटी उपलब्ध करून देण्याचा “गुगल”चा मानस आहे.
- भारताच्या दौऱ्यावर आलेले गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी आज केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांची भेट घेतली. या वेळी “गुगल” भारतात “प्रोजेक्ट लून” राबविणार असल्याची घोषणा पिचाई यांनी केली.
- देशातील ग्रामीण भागांत मोठ्या बलूनच्या साहाय्याने इंटरनेट सेवा पुरविण्याचा “गुगल”चा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. “गुगल फॉर इंडिया” कार्यक्रमात पिचाई बोलत होते.
- तसेच पुढील वर्षी डिसेंबरअखेर देशातील शंभर रेल्वे स्थानकांवर “गुगल” वाय-फाय सेवा उपलब्ध करून देणार आहे. याची सुरवात मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकापासून होणार आहे.
सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात :
- भारताने आज पन्नासावे यशस्वी उड्डाण साजरे करताना सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडले.
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) ही मोठी कामगिरी असून त्यातून आपल्या देशाला परकीय चलनही प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे.
- सिंगापूरचे हे उपग्रह त्या देशात आपत्ती निरीक्षण व शहर नियोजनासाठी वापरले जाणार आहेत.
- इस्रोने या वर्षी व्यावसायिक उड्डाणांची हॅटट्रिक केली असून जुलै व सप्टेंबरमध्ये अमेरिका व ब्रिटनसह काही देशांचे एकूण 11 उपग्रह सोडण्यात आले होते.
- सायंकाळी सहा वाजता सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसएलव्ही सी 29 प्रक्षेपकाने हे उपग्रह 550 कि.मी.च्या कक्षेत नेऊन सोडले. सायंकाळी सहा वाजता हे उड्डाण झाले व त्यानंतर 21 मिनिटांत हे उपग्रह अपेक्षित कक्षेत सोडले गेले.
- 2016 मध्ये संदेशवहन व निरीक्षण उपग्रह सोडणार आहेत व आणखी चांगली कामगिरी करून दाखवू, असे इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले.