Current Affairs of 17 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 जुलै 2017)

बकुळ पंडित यांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान :

  • बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित यांना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांना देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याच्या आप्पा बाबलो गावकर तर डॉ. सावळो केणी पुरस्कार डोंबिवलीच्या धनंजय पुराणिक यांना देण्यात आला.
  • गोविंद बल्लाळ पुरस्काराने मुंबईच्या शुभदा दादरकर, काकासाहेब खाडिलकर पुरस्कारने पुण्याच्या कविता टिकेकर, खाऊवाले पाटणकर पुरस्काराने गोव्याच्या राया कोरगावकर, रंगसेवा पुरस्काराने पुण्याचे सयाजी शेंडकर आणि गोव्याचे लक्ष्मण म्हांबरे यांना गौरविण्यात आले.
  • तसेच पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी 5 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 जुलै 2017)

आयफा अवॉर्ड 2017 पुरस्कार सोहळा :

  • आयफा अवॉर्ड 2017 च्या रंगारंग पुरस्कार सोहळ्यात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कार पटकाविले.
  • ‘उडता पंजाब’ साठी शाहिदला बेस्ट अ‍ॅक्टरच्या आयफा ट्रॉफीने गौरविण्यात आले. आलियाला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • ‘पिंक’चे दिग्दर्शक अनिरूद्ध रॉय चौधरी यांना बेस्ट डायरेक्टरची आयफा ट्रॉफी मिळाली. तसेच सोनम कपूरच्या ‘नीरजा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
  • आयफा अवॉर्ड सोहळ्यात तापसी पन्नूला ‘वूमन ऑफ द इयर’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • अभिनेता वरूण धवन याला ‘ढिशूम’मधील भूमिकेसाठी बेस्ट कॉमिक अ‍ॅक्टरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

रोजगारयुक्त महाराष्ट्रासाठी ‘कौशल्य विकास’ कटिबद्ध :

  • राज्यातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून, आगामी काळात रोजगारयुक्त महाराष्ट्र घडावा, यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कौशल्य विकास उद्योजकतामंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी दिली.
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ‘जागतिक युवा कौशल्य दिना’निमित्त 15 जुलै रोजीच्या आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते.
  • कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री निलंगेकर-पाटील म्हणाले की, भारत हा एकमेव देश असेल, जो प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवकांना कुशल प्रशिक्षण देण्यावर आम्ही भर देत आहोत. कामगार व कौशल्य विकास यांचा मेळ घालून अधिकाधिक खासगी उद्योजकांनी राज्य शासनाबरोबर काम करावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
  • ‘मेक इन इंडिया’नंतर कौशल्य विकास विभागाचे 62 सामंजस्य करार झाले असून, त्यापैकी 58 करार कार्यन्वित झाले आहेत.

महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत :

  • शतकवीर मिताली राज (109 धावा, 123 चेंडू, 11 चौकार), वेदा कृष्णमूर्ती (70 धावा, 45 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार ) व हरमनप्रीत कौर (60 धावा, 7 चौकार) यांच्या चमकदार फलंदाजीनंतर राजेश्वरी गायकवाडच्या (5-15) अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला संघाने अखेरच्या साखळी लढतीत न्यूझीलंडचा 186 धावांनी पराभव केला आणि महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
  • भारताने 7 बाद 265 धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाचा डाव 25.3 षटकांत 79 धावांत गुंडाळला. राजेश्वरीला दीप्ती शर्मा (2-26), झुलन गोस्वामी (1-14), शिखा पांडे (1-12) व पूनम यादव (1-12) यांची योग्य साथ लाभली.

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पासाठी फ्रान्स कंपनीचा नवा प्रस्ताव :

  • महाराष्ट्रातील जैतापूर येथे सहा अणुभट्टय़ा उभारण्याचे काम दिलेल्या फ्रान्सच्या आस्थापनेने प्रकल्पाच्या अभियांत्रिकीत आणखी विस्तृत भूमिका पार पाडण्याची तयारी दर्शवणारा नवा प्रस्ताव एनपीसीआयएलला सादर केला आहे.
  • इडीएफ या फ्रान्सच्या कंपनीबरोबर एनपीसीआयएलच्या करारावर वर्षअखेरीस स्वाक्षऱ्या होणार आहे.
  • फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे वर्षअखेरीस भारताला भेट देणार असून तोपर्यंत हा करार अंतिम पातळीवर नेण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी या वाटाघाटी वेगाने सुरू झाल्या आहेत.
  • इडीएफच्या शिष्टमंडळाने परराष्ट्र मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेतली आहे.
  • तसेच इडीएफ एकूण सहा अणुभट्टय़ा उभारणार असून त्यांची क्षमता प्रत्येकी 1650 मेगावॉट आहे. त्या सुरू झाल्यावर देशातील सर्वात मोठा अणुप्रकल्प म्हणून जैतापूरची गणना होणार आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 जुलै 2017)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago