Current Affairs of 17 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 जून 2016)

मनस्विनी लता रवींद्र यांना 2016 चा युवा पुरस्कार :

  • साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या (दि.16) इंफाळ येथे झालेल्या बैठकीत 2016 साठीच्या युवा पुरस्कार आणि बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
  • मराठी भाषेतील युवा पुरस्कारासाठी मनस्विनी लता रवींद्र यांच्या “ब्लॉगच्या आरश्‍यापल्याड” या लघुकथासंग्रहाची निवड करण्यात आली.
  • तसेच बालसाहित्य पुरस्कारासाठी राजीव तांबे यांची निवड करण्यात आली.
  • कोंकणी भाषेतील युवा पुरस्कारासाठी अन्वेषा अरुण सिंगबाळ यांच्या ‘सुलुस’ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली, तर बालसाहित्य पुरस्कारासाठी दिलीप बोरकर यांच्या ‘पिंटूची कल्लभोनवड्डी’ या लघुकादंबरीची निवड करण्यात आली.
  • राजीव तांबे यांना बालसाहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या एकंदर कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे.
  • तसेच पन्नास हजार रुपयांचा धनादेश आणि गौरवचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
  • बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिनी केले जाते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 जून 2016)

आता टंकलेखन परीक्षेला ‘पूर्णविराम’ :

  • टाईप रायटरची परीक्षा (दि.19) अखेरची असणार आहे. कारण टंकलेखनाच्या परीक्षांना आता फुलस्टॉप मिळाला आहे.
  • राज्यभरातील टंकलेखन परीक्षा बंद होणार असून, त्याची जागा आता संगणक घेणार आहे.
  • पूर्वी नोकरी करायची म्हटली की, टायपिंग येणे आवश्यक असायचे. पण बदलत्या काळानुसार मोठाल्या टाईपरायटरची जागा संगणकाने घेतली.
  • संगणक अनेकांच्या पसंतीस उतरु लागला आणि कालांतराने टाईपरायटर मागे पडला.
  • तसेच संगणकाचे वाढते महत्त्व लक्षात घेत राज्य शासनाने टंकलेखन परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलका लांबा प्रवक्ते पदावरून निलंबित :

  • दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) नियमांचे उल्लंघन केल्याने अलका लांबा यांना प्रवक्ते पदावरून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.
  • दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अलका लांबा यांनी वक्तव्य केले होते.
  • त्या म्हणाल्या होत्या की, परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सत्येंद्र जैन यांच्याकडे देण्यात यावी. यामुळे झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होईल.
  • तसेच या वक्तव्यावरून त्यांच्या पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत प्रवक्ते पदावरून निलंबित करण्यात आले आहे.

भारत व घानामध्ये संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढणार :

  • भारत व घानाला दहशतवादाचा समान धोका असल्याने सुरक्षा व संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे या दोन्ही देशांनी जाहीर केले.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पश्चिम आफ्रिकी देशांच्या दौऱ्यात घानाला भेट दिली.
  • तसेच घानाचे अध्यक्ष जॉन द्रमाणी महामा यांच्याशी मुखर्जी यांची विविध विषयांवर चर्चा झाली.
  • आंतरराष्ट्रीय दहशतवाद ही एक आपत्ती असून, दोन्ही देश त्याच्या छायेखाली आहे. त्यामुळेच अधिक सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यात येणार आहे.
  • घानाच्या विकासासाठी सवलतीच्या दरातील कर्जरूपाने भारतातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल घानाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
  • तसेच कॉन्टिनंट कोमेंडा साखर कारखाना व एलमिना मत्स्यप्रक्रिया प्रकल्पांसारख्या आर्थिक-सामाजिक योजनांमध्ये भारताच्या सहकार्याबद्दल घानाच्या अध्यक्षांनी मुखर्जी यांचे आभार मानले.

लष्करी सहकार्यवाढीस अमेरिकी सिनेटची मंजुरी :

  • भारताबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्यास अमेरिकी सिनेटने (दि.16) एकमताने मंजुरी दिली.
  • तसेच त्यानुसार दोन्ही देशांत आता लष्करी नियोजन, संभाव्य धोक्‍याचे विश्‍लेषण, लष्करी दस्सावेज, गुप्त माहितीची देवाणघेवाण, लॉजिस्टिकल प्रतिसाद अशा क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यात येणार आहे.
  • अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकार कायद्यातील सुधारणेला सिनेटने या आठवड्याच्या सुरवातीलाच 85-13 अशा मतांनी संमती दिली होती.
  • तसेच त्यातील सुधारणेला सिनेटने आवाजी मतांनी मंजुरी दिली. सिनेटर जान सुलिव्हॅन यांनी हे दुरुस्ती विधेयक सादर केले.
  • अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी भारत-अमेरिकेतील सहकार्य वाढविण्यासाठी योग्य पातळीवर प्रयत्न करावेत, असे सिनेटने संमत केलेल्या विधेयकात म्हटले आहे.

दिनविशेष :

  • 1867 : जॉन रॉबर्ट ग्रेग, लघुलेखन पद्धतीचा शोधक यांचा जन्म.
  • 1898 : कार्ल हेर्मान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1920 : फ्रांस्वा जेकब, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 जून 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago