Current Affairs of 17 March 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (17 मार्च 2017)
एमपीएससी परीक्षेत भूषण अहिरे राज्यात प्रथम :
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2016 चा अंतिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे याने राज्यात प्रथम कमांक पटकावला.
- तसेच सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील हिने महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
- भूषण अहिरे अभियांत्रिकी विद्याशाखेचा पदवीधर असून त्याची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली आहे. तर पूनम पाटील हिची पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता निवड झाली आहे.
- उपजिल्हाधिकारी पदासाठी भूषण अहिरेसह श्रीकांत गायकवाड, संजयकुमार ढवळे, संदीप भास्के आणि नीलम बाफना यांची निवड झाली आहे. तर पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता पूनमसह अमोल ठाकूर, सागर पवार, अमोल मांडवे हे अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा लुधियानात मेणाचा पुतळा :
- कॅप्टन अमरिंदरसिंग हे दुसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होत असताना लुधियाना येथे त्यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
- पंजाबमध्ये दहा वर्षांनंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवून देत सत्ता प्राप्त करण्यात कॅप्टन अमरिंदरसिंग यांची महत्त्वाची भूमिका होती.
- राजीव गांधी यांनी अमरिंदरसिंग यांना काँग्रेसमध्ये आणले आणि राजकारणात सक्रिय केले. प्रथम 1980 मध्ये ते लोकसभेत निवडून गेले.
- सर्वांत जुना पक्ष असलेला काँग्रेस 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बॅकफूटवर गेला होता. अमरिंदरसिंग यांनी या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याचा हिय्या केला होता. ते पक्षाचे स्टार प्रचारक होते. त्यांनी पटियाला शहर मतदारंसघातून विधानसभा निवडणूक लढवली. येथून त्यांनी सलग तीनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे.
- तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजप, शिरोमणी अकाली दल, आप यांना पराजित केले. पंजाबमध्ये त्यांनी 117 पैकी 77 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला.
ज्वाला गुट्टाची ‘साई’ संचालन संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती :
- भारताची दुहेरीतील बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- 14 वेळेस राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेली ज्वाला गुट्टा म्हणाली, मी ‘साई’ संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्त झाल्याने खूप आनंदीत झाली आहे.
- ‘साई’ केंद्राचे सचिव एस.एस. छाबडा यांनी ज्वालाला लिहिलेल्या पत्रात म्हटले, ‘आपल्याला माहीत करण्यास आनंद होत आहे की, आपल्याला साई संचालन संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्त केले जात आहे.’
- तसेच दोन वेळेस ऑलिम्पियन ज्वालाने 2011 मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
विद्युत पुरवठयासाठी उभारणार कृत्रिम बेट :
- ब्रिटनच्या किनाऱ्याजवळ मानवनिर्मित बेट उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे बेट युरोपच्या काही भागांत अक्षय ऊर्जेचा पुरवठा करण्यास सक्षम असेल.
- पवनचक्की आणि सौर पॅनलचे जाळे असलेले हे बेट ब्रिटन, डेन्मार्क, जर्मनी, द नेदरलॅण्ड नॉर्वे आणि बेल्जियम या सहा देशांचे ऊर्जा केंद्र म्हणून काम करील.
- द नेदरलॅण्ड, डेन्मार्क आणि जर्मनीतील विद्युत कंपन्यांच्या महासंघाने सुचविलेल्या या 1.1 अब्ज पौंडाच्या प्रकल्पाला युरोपियन युनियन प्रमुखांनी यापूर्वीच पाठिंबा दिला असून, ब्रुसेल्स 23 मार्च रोजी त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.
- 25 चौरस कि.मी.च्या या बेटावर कर्मचाऱ्यांसाठी रस्ते, कार्यशाळा, झाडे आणि कृत्रिम सरोवर असेल. याशिवाय 7000 किंवा त्याहून अधिक पवनचक्क्यांसह एक विमानतळ, बंदर, नियंत्रण कक्ष आणि टर्मिनलचीही सोय असणार आहे.
दिनविशेष :
- 17 मार्च 1882 हा दिवस ‘मराठी भाषेचे शिवाजी’ ही पदवी मिळवणारे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा स्मृतीदिन आहे.
- भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय.एन.एस. शिवाजीची लोणावळा येथे 17 मार्च 1944 रोजी स्थापना करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा