चालू घडामोडी (17 ऑक्टोंबर 2015)
राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत असल्याची घोषणा :
- राज्यातील पाऊसपाण्याची सद्यःस्थिती विचारात घेऊन राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी केली.
- राज्यातील 14 हजार 708 गावांत दुष्काळासंबंधीच्या उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- दरम्यान, या गावांसाठी दुष्काळी भागात पुरविण्यात येणाऱ्या उपाययोजनांऐवजी दुष्काळसदृश परिस्थितीतीलच उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.
- दुष्काळी भागातील गावांसाठी द्यावयाच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.
- राज्यातील 14,708 गावांची पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
- या गावांत दुष्काळसदृश उपाययोजना केल्या जातील.
- या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्कल किंवा तालुक्याऐवजी गाव हा घटक मानण्यात येणार आहे.
- केंद्राने जाहीर केलेल्या या वर्षीच्या प्रतिक्विंटल आधारभूत किमती :
धान – 1410 रुपये, ज्वारी – 1570, बाजरी – 1275, मका – 1325, तूर – 4625, मूग – 4850, उडीद – 4625, भूईमूग – 4030, सोयाबीन – 2600, सूर्यफूल – 3800, तीळ – 4700, कापूस (लांब धागा) – 4100, कापूस (मध्यम धागा) – 3800, गहू – 1450, हरभरा – 3175, करडई – 3050
- जाहीर झालेली जिल्हानिहाय गावे :
- नाशिक – 1577, धुळे – 614, नंदुरबार – 885, जळगाव – 1258, नगर – 535, पुणे – 76, सातारा – 343, सांगली – 363, औरंगाबाद – 1353, जालना – 969, परभणी – 848, हिंगोली – 707, नांदेड – 1562, बीड – 1403, लातूर – 943, उस्मानाबाद – 737, अकोला – 55, यवतमाळ – 2, नागपूर – 111, गडचिरोली – 367.
- उपाययोजना :
- कृषी पंपांच्या चालू वीजबिलामध्ये 33.5 टक्के सवलत
- शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
- जमीन महसुलात सूट
- आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्स
- टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज खंडित न करणे
- कापूस, सोयाबीन, ज्वारी, मका खरेदी केंद्रे सुरू होणार
“पीएफ” काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन :
- “पीएफ” काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन करून “आधार“संलग्न बॅंक खात्यामध्ये “पीएफ” जमा केला जाणार आहे.
- मार्च महिन्याच्या अखेरीस याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
- ऑनलाइन प्रणालीमुळे अवघ्या तीन तासांत “पीएफ”चे पैसे खातेधारकाला मिळणार आहेत.
- “पीएफ”चे दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (ईपीएफओ) प्रयत्न केले जात आहेत.
- सर्वोच्च न्यायालयाने निवृत्तिवेतन, “जन-धन” यासारख्या सरकारी योजनांसाठी आधार कार्ड वापरण्यास मुभा दिल्यानंतर “पीएफ” संघटनेने “पीएफ” खाती आधार कार्डाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडिया-आफ्रिका फोरम समिटची तिसरी परिषद ऑक्टोबर मध्ये होणार :
- ‘इंडिया-आफ्रिका फोरम समिट’ची तिसरी परिषद येथे 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होत असून, त्यात भारत व आफ्रिकेदरम्यानच्या परंपरागत संबंधांना उजाळा देण्याबरोबर बदलती जागतिक परिस्थिती असेल.
- तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या मुद्द्यांवर सहकार्याची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
- भारताने आफ्रिका खंडातील सर्व (54) देशांना निमंत्रित केले आहे.
- भारताच्या पुढाकाराने भारत व आफ्रिका सहकार्याचे हे व्यासपीठ सुरू करण्यात आले.
- 2008 मध्ये याची सुरवात झाली.
- तसेच या परिषदेच्या निमित्ताने भारतातर्फे “ब्लू इकॉनॉमी”ची संकल्पना मांडण्यात येणार आहे.
- “ब्लू इकॉनॉमी” म्हणजे सागरी संपत्तीशी निगडित अर्थव्यवस्था. यामध्ये मत्स्योद्योगाखेरीज सागरी संपत्तीशी निगडित अनेक व्यवसाय, अगदी ऊर्जानिर्मिती, सागरातून मिळणारी खनिजे यांचाही समावेश होतो.
- यासंदर्भात मॉरिशस, सेशेल्स, केनिया, मोझांबिक या देशांबरोबर चर्चा केली जाईल.
जनतेचे प्रश्न मार्गी लागणे सुलभ व्हावे यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय :
- पत्र किंवा निवेदने घेऊन मंत्रालयात येणाऱ्या जनतेचे प्रश्न मार्गी लागणे सुलभ व्हावे, यासाठी वेगळे सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.
- त्यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेल्या या सॉफ्टवेअरचे गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी सादरीकरण करण्यात आले.
- या सॉफ्टवेअरमध्ये राज्यातील सर्व प्रमुख कार्यालयांचे ई-मेल, फॅक्स क्रमांक, अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक माहितीचा समावेश असेल.
- एखाद्या तक्रारदाराच्या पत्रावर मंत्र्यांची सही झाल्यानंतर ते पत्र या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यास ई-मेल करण्यात येईल.
- हा ई-मेल कुणाला पाठविला, कधी पाठविला याची इत्थंभूत माहिती संबंधित अभ्यागतास लगेच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे आपोआप कळविली जाईल.
- याशिवाय पंकजा मुंडे यांच्या आवाजातील एक व्हॉइस मेसेजही संबंधित अभ्यागतास पाठविला जाईल. या प्रक्रियेमुळे पत्रव्यवहार हा सुरळीत, सुलभ, गतिमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
- हे सॉफ्टवेअर मोबाईलवर वापरण्याच्या दृष्टीने ऍपच्या स्वरूपातही विकसित करण्यात येत आहे.
“महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख” या नावाने मराठी अनुवाद :
- प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची 30 ऑगस्टला त्यांच्या घरात घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
- डॉ. कलबुर्गी यांनी कन्नडमधून लेखन केले.
- मराठी आणि इंग्रजीतील एक-दोन पुस्तके वगळता त्यांच्या पुस्तकांचे फारसे अनुवाद झाले नाहीत.
- डॉ. कलबुर्गी यांची कन्नडमधील अनेक पुस्तके आज “आउट ऑफ प्रिंट” आहेत.
- त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद करून, अनोखी श्रद्धांजली वाहण्याचे “आंतरभारती”ने ठरवले आहे.
- त्यांनी 103 पुस्तके लिहिली. सुमारे 400 विषयांवर शोधनिबंध सादर केले. मातृभाषेविषयीच्या अभिमानामुळे त्यांनी सर्व लेखन कन्नडमध्येच केले.
- “महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख” या नावाने त्यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे.
- डॉ. कलबुर्गी यांची इतर पुस्तकेही आज समाजाला उपयोगी ठरतील, या विचारातून “आंतरभारती” अनुवाद केंद्राद्वारे त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद केला जाणार आहे.
- यासाठी मुंबई विद्यापीठातील कन्नड विभागाची मदत घेण्यात येणार आहे.
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबरला भारतात येणार :
- सोशल मीडियातील अग्रगण्य नेटवर्किंग साइट फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबरला भारतात येत आहेत.
- झुकेरबर्ग यांनी शुक्रवारी फेसबुक पोस्टवरून ही घोषणा केली.
- मार्क झुकेरबर्ग येत्या 28 ऑक्टोबरला दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेला (आयआयटी दिल्ली) भेट देणार आहेत.
- मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झुकेरबर्ग यांचा हा दुसरा भारत दौरा आहे.
- गेल्या वर्षी याच महिन्यात झुकेरबर्ग येथे झालेल्या इंटरनेट डॉट ओआरजी संमेलनात सहभागी झाले होते.
- भारत सोशल नेटवर्किंगसाठी जगात दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे.
मॅगी पुन्हा नव्या जोमाने बाजारात उतरण्यास सज्ज :
- मॅगी पुन्हा नव्या जोमाने बाजारात उतरण्यास सज्ज झाली आहे.
- निश्चित मात्रेपेक्षा अधिक शिसे आढळून आल्याने बाजारातून गायब झालेल्या मॅगीचे 90 नमुने तीन प्रयोगशाळांमधील तपासणीत ‘पास’ झाले आहेत.
- मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तीन वेगवेगळ्या प्रयोगशाळेतील तपासणीतील मॅगीचे नमुने सुरक्षित आढळून आले आहेत.
- या सर्व नमुन्यांत शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण निर्धारित मात्रेनुसार आढळले आहे.
- कुठलाही घातक पदार्थ आढळून न आल्याने प्रयोगशाळांनी मॅगीचे सर्व नमुने सुरक्षित ठरवले आहेत.
- दरम्यान, मॅगीचा विद्यमान फॉर्म्युला कायम राहील.
वैज्ञानिकांना अवकाशात खोलवर विचित्र आकाराची प्रकाशमान वस्तू दिसली :