चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2016)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 66वा वाढदिवस :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 66वा वाढदिवस आहे.
- आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करण्याचे मोदींनी ठरवले आहे.
- आज सकाळी गांधीनगरमध्ये जाऊन मोदींनी आपली आई हिराबा यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतला.
- वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी एक टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवण्यात आला आहे.
- प्रशासन, विज्ञान, क्रीडा आणि कलेसह विविध क्षेत्रात भरीव योगदान देत देशाला गौरवान्वित करणाऱ्या देशातील सुकन्यांना सन्मानित करण्यासाठी ‘एम्पॉवरिंग डॉटर्स : एम्पॉवरिंग इंडिया’ असा अनोखा संदेशही या केकवर कोरला जाणार आहे.
- विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या मुलींच्या कामगिरीचा उल्लेखही त्यावर असेल.
- गुजरातची प्रसिद्ध अतुल बेकरी, शक्ती ही स्वयंसेवी संस्था तसेच देशभरात 30 पेक्षा जास्त गिटार केंद्र संचालित करणाऱ्या ‘गिटार मॉन्क’ या संस्थेने मोदींचा अनोखा वाढदिवस साजरा करण्याची तयारी चालविली आहे.
हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय :
- भारताला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर पोचवणाऱ्या प्रियंका चोप्रा विषयी सर्वांना अभिमान वाटायला हवा असा पराक्रम प्रियंका चोप्राच्या नावावर झाला आहे.
- टेलव्हिजनवर जगातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत प्रियंकाला आठवे स्थान मिळाले आहे.
- तसेच हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे.
- फोर्ब्सकडून जाहीर करण्यात येणाऱ्या जगात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टिव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियांका आठव्या स्थानावर आहे.
- गेल्यावर्षी एबीसीच्या क्वांटिकोमधून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने या मालिकेतून 1.1 कोटी डॉलर एवढी कमाई केली आहे.
- विक्रमी 73 कोटी रुपयांच्या मानधनासह बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंकाने आठवे स्थान मिळवले आहे.
- जगात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या हायपेड अभिनेत्रींची यादी फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आली.
- सोफिया वर्जारा ही हॉलिवूड अभिनेत्री 288 कोटी रुपये एवढ्या मानधनासह पहिल्या स्थानावर आहे.
क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर :
- क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी (दि.16) क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना अर्जुन पुरस्कारने गौरवले.
- अजिंक्य रहाणेला या वर्षीचा तर रोहित शर्माला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
- जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आयोजित एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे.
- पुरस्कार खेळाडूंना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख देण्यात आले.
चीनने अवकाश प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले :
- अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या दुसऱ्या अवकाश प्रयोगशाळेचे (दि.16) चीनने प्रक्षेपण केले.
- 2022 पर्यंत कायमस्वरूपी अवकाश स्थानक तयार करण्यासाठीच्या दूरगामी आराखड्याचा हा एक भाग असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
- अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या या अवकाश कार्यक्रमाला प्राधान्य दिले असून चीन आगामी काळात ‘स्पेस पॉवर’ म्हणून उदयास येईल.
आता सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड अनिवार्य :
- घरगुती गॅसची सबसिडी, मनरेगा, पेन्शन इत्यादींसह केंद्र आणि राज्य सरकारच्या तमाम सरकारी योजनांचे लाभ व सवलती मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
- लवकरच त्यासाठी युनिक आयडेंटिटी अधिनियम अधिसूचित करण्यात येणार आहेत.
- सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी एका निकालपत्रात सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही, असे म्हटले होते.
- तरीही प्रत्येक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करणारा नवा कायदा करण्याचे केंद्राने ठरवले आहे.
- घरगुती गॅसशी संबंधित पेट्रोलियम मंत्रालय असो की सरकारी शिष्यवृत्यांशी संबंधित मनुष्यबळ विकास मंत्रालय, आधार कार्ड नसलेला एकही लाभार्थी योजनेच्या अंमलबजावणीतून सुटू नये, यासाठी युनिक आयडेंटिटी अधिनियमानुसार नोंदणी रजिस्ट्रारशी संलग्न यंत्रणा प्रस्थापित करून त्यांची रितसर नोंदणी करण्याची जबाबदारी संबंधित मंत्रालयांवर सोपवण्यात आली आहे.
- तसेच याखेरीज आधार कार्ड कोणत्या सरकारी योजनांसाठी अनिवार्य आहे, त्याची यादीही संबंधित मंत्रालयांतर्फे वेळोवेळी अधिसूचित केली जाईल.
दिनविशेष :
- भारतात राष्ट्रीय श्रम दिवस व विश्वकर्मा जयंती.
- 1879 : भारतीय समाजसुधारक पेरियार ई.व्ही. रामसामी यांचा जन्मदिन.
- 1950 : भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन.
- 1960 : डेमन हिल, इंग्लिश एफ-1 विश्वविजेता यांचा जन्मदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा