चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2015)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर चित्रपट :
- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित “साहेब” हा चित्रपट येत आहे.
- या चित्रपटाची निर्मिती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे करणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी नातू राहुल ठाकरे सांभाळणार आहेत.
- राहुल ठाकरे यांनी कॅनडा येथे चित्रपट निर्मितीचे धडे घेतले असून बॉलीवूडचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या “पीके” चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले आहे.
- “साहेब” या चित्रपटाची पटकथा अंतिम टप्प्यात असून चित्रीकरण वर्षअखेर सुरू होईल.
- हा चित्रपट बाळासाहेबांच्या जन्मदिनी 23 जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मॅगीच्या नव्याने चाचण्या :
- नेस्लेच्या मॅगी नूडल्स उत्पादनावरची बंदी उच्च न्यायालयाने उठवल्यानंतरही राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नेस्ले कंपनीला 640 कोटी रूपये भरपाई देण्याची नोटीस पाठवली आहे.
- नेस्ले कंपनीने अयोग्य व्यापार पद्धती वापरल्या असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला असून आता आयोगाने केंद्र सरकारला मॅगीच्या नव्याने चाचण्या करण्यास सांगितले आहे.
- राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. व्ही.के.जैन यांच्या नेतृत्वाखालील पीठाने केंद्र सरकारची विनंती मान्य केली आहे.
- मुंबई उच्च न्यायालयाने 13 ऑगस्टच्या निकालात मॅगीवरील बंदी उठवण्याचा आदेश दिला होता व मॅगीचे नमुने प्रमाणित प्रयोगशाळात तपासण्यास सांगितले होते.
आयएसआयचे माजी प्रमुख हमीद गुल यांचे निधन :
- पाकिस्तानचे कट्टर इस्लामवादी जनरल आणि आयएसआयचे (इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स) माजी प्रमुख हमीद गुल यांचे निधन झाले.
- ते 78 वर्षांचे होते.
- गुल हे 1987 ते 1989 या काळात आयएसआयचे प्रमुख होते.
पॉस्को कंपनीची महाराष्ट्रात कोटींची गुंतवणूक :
- स्टील उद्योगातील आघाडीची दक्षिण कोरियन कंपनी पॉस्को ही महाराष्ट्रात 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातरडा येथे स्टील प्रकल्प उभारण्यासाठी पॉस्कोने उत्तम ग्वाला समूहाशी सामंजस्य करार केला आहे.
- या प्रकल्पात ऑटोमोबाइल उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेल्या स्टील कॉईल्सचे उत्पादन केले जाईल.
- निम्न दर्जाचे लोखंड हे स्टीलमध्ये परावर्तित करण्याचे कामही या ठिकाणी होणार आहे.
- जनरल मोटर्स (6400 कोटींची गुंतवणूक) आणि फॉक्सकॉन (35000 कोटींची गुंतवणूक) या नामवंत कंपन्यांनंतर पॉस्कोच्या माध्यमातून तिसरी मोठी गुंतवणूक राज्यात येणार आहे.
- पॉस्को कंपनीने या आधी कर्नाटक आणि ओडिशामध्ये गुंतवणुकीचा केलेला प्रयत्न फलद्रूप झालेला नव्हता.
- ओडिशामध्ये 1990 च्या सुमारास झालेला प्रयत्न, भूसंपादनाला झालेला विरोध आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे फसला होता.
संथारा व्रतावर राजस्थान हायकोर्टाची बंदी :
- अन्न-पाण्याचा त्याग करून स्वेच्छेने देहत्याग करण्याचे जैन धर्मीयांचे संथारा व्रत म्हणजे आत्महत्या असल्याचा निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे.
- यापुढे संथारा ही आत्महत्या मानली जावी आणि हे व्रत करणाऱ्या व्यक्तीवर भादंवि कलम 309 अन्वये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आणि त्यास साथ देणाऱ्यांवर कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदला जावा, असाही आदेश न्यायालयाने दिला.
- हा निकाल राजस्थान राज्यापुरताच मर्यादित असला तरी त्याने देशभरातील जैन समाजात खळबळ उडाली असून, याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी समाजाच्या अनेक संस्थांनी सुरू केली आहे.
- संथारा व्रत जैन समाजात ‘सल्लेखाना वृत्त’ म्हणूनही ओळखले जाते.
- आपला मृत्यू आता जवळ आला आहे, अशी खात्री झालेली व्यक्ती हे व्रत करते.
- यात मोह-मायेपासून मन काढून घेण्यासोबतच अन्न-पाण्याचे सेवन पूर्णपणे बंद करून देहत्यागाने शारीरिक क्लेषांपासूनही मुक्ती मिळविली जाते.
- देशातील जैन धर्मीयांची लोकसंख्या 43 लाखांच्या घरात आहे.
- अधिकृत नोंद नसली तरी भारतात दरवर्षी सरासरी 240 व्यक्ती संथारा व्रत ठेवून देहत्याग करतात.
यावर्षी केसरी टूर्सला ‘बेस्ट डोमेस्टिक टूर ऑपरेटर’ पुरस्कार :
- टुडेज ट्रॅव्हलर या नियतकालिकातर्फे दिला जाणारा ‘बेस्ट डोमेस्टिक टूर ऑपरेटर’ हा पुरस्कार यावर्षी केसरी टूर्सला मिळाला आहे
- नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या विसेष कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या हस्ते केसरी यूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांना प्रदान केला गेला.
- टुडेज ट्रॅव्हलर हे प्रिमियर बिजनेस व ट्रॅव्हल नियतकालिक असून गेली 9 वर्षे या नियतकालिकातर्फे कॉर्पोरेट, आतिथ्य, पर्यटन व मनोरंजन क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या संस्था तसेच कंपन्या यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
दिनविशेष :
- 1920 : अमेरिकेच्या संविधानातील 19वा बदल लागू झाल्याने स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
- 1945 : नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी स्मृतीदिन.