Current Affairs of 18 December 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (18 डिसेंबर 2015)
बीजिंगमध्ये ‘रेड ऍलर्ट’ जाहीर :
- प्रदूषणाची धोक्याची पातळी पुन्हा एकदा ओलांडल्याने चीनची राजधानी बीजिंगमध्ये ‘रेड ऍलर्ट’ जाहीर केला आहे. याच महिन्याच्या सुरवातीस चीनमध्ये अशा स्वरूपाचा पहिला ‘रेड ऍलर्ट’ जाहीर झाला होता.
- धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित परिणामामुळे बीजिंगमधील वातावरण ‘राहण्यास धोकादायक’ या पातळीवर आले आहे.
- बीजिंगमध्ये उद्यापासून येत्या मंगळवारपर्यंत प्रदूषणाची पातळी अशीच धोकादायक राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या इशाऱ्यामुळे बीजिंगमधील चारचाकी वाहनांच्या वापरावर मर्यादा आणि शाळा बंद ठेवण्यासारखे उपाय अंमलात आणले जातील.
- चीनमधील हवा, पाणी आणि जमिनीवरील प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक आहे. त्यातच, चीनमधील बहुतांश महत्त्वाची शहरे सतत ‘स्मॉग’मुळे कोंदट झालेली असतात. त्यामुळे या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
- याच महिन्याच्या सुरवातीस 7 डिसेंबर रोजी बीजिंगमधील पहिला ‘रेड ऍलर्ट’ जाहीर झाला होता. त्यावेळी वाहनांच्या वापरावर आणि बांधकामावर बंदी घालण्यात आली होती.
Must Read (नक्की वाचा):
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचा व्याजदरवाढीचा निर्णय जाहीर
- अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने अखेर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित व्याजदरवाढीचा निर्णय काल मध्यरात्री जाहीर केला. सात वर्षांपूर्वीच्या मंदीनंतर फेडरल रिझर्व्हने पहिल्यांदाच व्याजदरवाढ केली आहे.
- अपेक्षेप्रमाणे पाव टक्का वाढ करण्यात आली असून, यामुळे जगभरातील शेअर बाजार, परकी चलन विनिमय बाजार आणि कमोडिटी बाजारांमध्ये पडसाद उमटले.
- फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनी हा निर्णय जाहीर केला. अमेरिकेतील अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदर सात वर्षे जवळपास शून्याच्या स्तरावर ठेवले होते. मात्र, आता व्याजदरांत वाढ केल्याने गेल्या काही काळात रोजगार वाढल्याच्या, उत्पन्नात वाढ झाल्याच्या आणि अमेरिकी नागरिकांपुढील आर्थिक समस्या कमी झाल्याच्या वस्तुस्थितीवरही शिक्कामोर्तब झाल्याचे येनेट यांनी नमूद केले.
ऑस्कर पुरस्काराठी “हेमलकसा” या हिंदी चित्रपटाचा समावेश :
- ऑस्कर पुरस्काराठी “ओपन कॅटेगरी”मध्ये पात्र ठरलेल्या 305 चित्रपटांमध्ये “हेमलकसा” या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे.
- दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी “डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो” हा चित्रपट मराठीत केल्यानंतर तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी तो हिंदीत पुन्हा “हेमलकसा” नावाने तयार करण्यात आला.
- ऑस्करची नामांकनांची यादी 14 जानेवारीला जाहीर होईल, तर 28 फेब्रुवारीला ऑस्कर सोहळा होणार आहे.
- 88 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी “हेमलकसा” सोबत “नाचोमिया कुम पसार” (कोकणी), “जलम” (मल्याळम), “रंगी तरंग” (कन्नड) असे भारतीय चित्रपटही पात्र ठरले आहेत.
- ऑस्करच्या “परदेशी भाषा विभागासाठी” भारताकडून चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित “कोर्ट” चित्रपट पाठवण्यात आला आहे.
वाराणसीतील गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी अमेरिकेचे सहकार्य :
- वाराणसीतील गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी अमेरिका सहकार्य करेल, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले आहे.
- भारतीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत स्थानिकांचे प्रबोधन करून पवित्र गंगा नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
गुगलवर अभिनेत्री सनी लिओनीने सर्वांत वरचे स्थान :
- लोकप्रिय सर्च इंजिन ‘गुगल’ने 2015 मध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या माहितीचे विश्लेषण प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक शोधलेल्या व्यक्तींमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने सर्वांत वरचे स्थान पटकावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहावे स्थान मिळाले आहे.
- भारतात सर्वाधिक शोधलेल्या पहिल्या दहा व्यक्तींमध्ये लिओनीनंतर सलमान खान, एपीजे अब्दुल कलाम, कतरिना कैफ, दीपिका पदुकोन, यो यो हनी सिंग, काजल अग्रवाल, आलिया भट्ट यांचा क्रमांक आहे. तर मोदींना “टॉप 10” च्या यादीत सर्वांत शेवटच्या स्थान मिळाले आहे.
- मोदींना 2014 मध्ये दुसरा क्रमांक मिळाला होता तर लिओनी पहिल्याच क्रमांकावर होती. यावर्षीही तिने आपले स्थान कायम ठेवले आहे. याशिवाय अन्य गटातील सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांची यादीही ‘गुगल’ने जाहीर केली आहे.
शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा अमेरिकेचा निर्णय :
- महसुलात वाढ करण्यासाठी अमेरिकी संसदेने एच1बी आणि एल-1 या व्हिसांच्या शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- एच 1 बी व ए-1 व्हिसा शुल्कवाढीचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसणार आहे. उल्लेखनीय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत या व्हिसाशुल्कात वाढ न करण्याची शिफारस केली होती.
- अमेरिकी संसदेने 1.1 ट्रिलियन डॉलर खर्चाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यात एच 1 बी व्हिसाच्या काही विशिष्ट श्रेणींच्या तर एल-1 व्हिसाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या व्हिसांसाठी अनुक्रमे चार हजार व साडेचार हजार डॉलर शुल्क मोजावे लागणार आहे. त्यामुळे अमेरिकी सरकारच्या तिजोरीत वार्षिक एक अब्ज डॉलरची भर पडणार आहे.
श्रीकांत बहुलकर यांना भाषा सन्मान :
- अत्त्युच्च प्रतिष्ठेचे कोंदण लाभलेले, परंतु सरत्या वर्षांत देशातील वाढत्या असहिष्णुतेचे निषेधचिन्ह बनलेले साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले.
- चित्रपट दिग्दर्शन, लघुपटनिर्मिती, साहित्य अशा कलेच्या सर्व प्रांतांत अमीट छाप उमटविणारे सव्यसाची प्रतिभेचे धनी अरुण खोपकर यांना त्यांच्या ‘चलत् चित्रव्यूह’ या चरित्रात्मक निबंधसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यातील योगदानाबद्दल प्रा. श्रीकांत बहुलकर यांना ‘भाषा सन्मान’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
- अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 23 भाषांसाठी हे पुरस्कार जाहीर केले.
तक्रारींची चौकशी करण्याची सध्याची पद्धत बदलण्यासाठी नवे विधेयक :
- न्यायिक मूल्ये व उत्तरदायित्त्व विधेयक व्यपगत झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयासह उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांविरुद्धच्या गैरवर्तणुकीच्या व अक्षमतेच्या तक्रारींची चौकशी करण्याची सध्याची पद्धत बदलण्यासाठी नवे विधेयक आणले जाईल, असे संकेत सरकारने दिले.
राजस्थान सरकारचा जल स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय :
- राज्यातील सर्व जलस्रोतांचा सुयोग्य वापर करण्याच्या हेतूने आणि पाण्याच्या समान वाटपासाठी राजस्थान सरकारने जल स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
- ही योजना पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 1500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- राज्याचे वाहतूकमंत्री बाबूलाल वर्मा म्हणाले की, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी यासंबंधी झालेल्या बैठकीत या योजनेला संमती दिली आहे.
- या योजनेला येणारा खर्च मंजूर करण्यात आला आहे. जल योजनेसाठी कॉपरेरेट आणि इतर क्षेत्रातूनही पाठिंबा मिळाला आहे.