Current Affairs (चालू घडामोडी) of 18 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | आर.आर.पाटील यांचे निधन |
2. | मंगळावर जाणार तीन भारतीय |
3. | भारत-श्रीलंका अणुकरार |
4. | ‘मातृभाषा दिन’ 21 फेब्रुवारीला साजरा |
आर.आर.पाटील यांचे निधन :
- राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले.
- त्यांचे मंगळवारी दुपारी तासगाव तालुक्यातील अंजनी या गावी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
- 16 ऑगस्ट 1957 रोजी अंजली या गावी त्यांचा जन्म झाला पाटील हे 58 वर्षाचे होते.
- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तसेच महात्मा गांधी तंटामुक्त अभियान यांसारख्या अभियानात त्यांचा मोठा वाटा होता.
मंगळावर जाणार तीन भारतीय :
- मंगळावर जाणार्या 100 जणांत तीन भारतीय आहेत.
- मंगळावर कायमचे जाण्याची तयारी असणार्या भारतीय नागरिकात तरणजित सिंग भाटिय (29), रितिका सिंग (29) तसेच श्रद्धा प्रसाद (19)या तिघांचा समावेश आहे.
- मार्स वन तर्फे ही योजना राबवण्यात येत आहे.
भारत-श्रीलंका अणुकरार :
- भारत-श्रीलंका यांच्यात नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यात आल्या असून संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
‘मातृभाषा दिन’ 21 फेब्रुवारीला साजरा :
- राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये 21 फेब्रुवारी ‘मातृभाषा दिन’ साजरा करण्यात येणार आहे.